Wednesday, October 9, 2024
Home ताज्या दिग्दर्शक शुभम रे यांच्या आगामी सिनेमा ‘गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात’ची...

दिग्दर्शक शुभम रे यांच्या आगामी सिनेमा ‘गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात’ची घोषणा

दिग्दर्शक शुभम रे यांच्या आगामी सिनेमा
‘गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात’ची घोषणा

कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच लक्षवेधी शीर्षक आणि आशयघन कथांवर चित्रपट बनत असतात. याच कारणांमुळे जगभरातील सिनेप्रेमींचं मराठी सिनेसृष्टीकडे लक्ष लागलेलं असतं. शीर्षकापासून कथानकापर्यंत ब-याच गोष्टींमध्ये उजवा असलेला ‘गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात’ हा आणखी मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक शुभम रे यांनी या चित्रपटाची घोषणा करत ‘गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात’चं टायटल क्रिएटिव्ह सोशल मीडियावर प्रदर्शित केलं आहे. शीर्षकावरून या चित्रपटात काहीसं गंमतीशीर कथानक पहायला मिळणार असल्याची चाहूल लागते. चित्रपटाचा चेहरा असलेलं टायटल क्रिएटिव्हही लक्ष वेधून घेणारं आहे.
झिरा फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरअंतर्गत बनवण्यात आलेल्या ‘गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात’ या चित्रपटात प्रेक्षकांना एक सटायर पहायला मिळणार आहे. सिनेसृष्टीला समाजाचा आरसा मानलं जातं. याच कारणामुळे रूपेरी पडद्यावर सादर होणा-या चित्रपटांमध्येही समाजात घडणा-या घडामोडींचं प्रतिबिंब उमटत असतं. ‘गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात’ या चित्रÌपटातही असाच एक प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाद्वारे समाजव्यवस्था आणि जनतेची मानसिकता यावर भाष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं दिग्दर्शक शुभम यांचं म्हणणं आहे. हे एक सामाजिक सटायर असल्याने प्रत्येक वयोगटातील, प्रत्येक स्तरातील प्रेक्षक या चित्रपटाच्या कथेशी एकरूप होईल तसेच पोट धरून हसतीलही असा विश्वास शुभम रे यांनी व्यक्त केला आहे.
या चित्रपटात प्रकाश भागवत, प्रिया गमरे, संजीवनी जाधव, विराग जाखड, डॉ. विलास उजवणे, रंगराव घागरे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. कॅमेरामन निखील कांबळे यांनी या सिनेमाची सिनमॅटोग्राफी केली असून कला दिग्दर्शन विराग जाखड यांनी केलं आहे. संगीतकार समीर सोनू यांनी संगीताची जबाबदारी सांभाळली आहे, तर मेकअप-हेअर डिझाइनचं काम हेमंत पालकर यांनी केलं आहे. अश्विनी चंद्रिकापूरे यांनी या चित्रपटातील गाण्यांची नेत्रदीपक कोरिओग्राफी केली असून, राणी वानखेडे यांनी कॉस्च्युम डिझाईन केलं आहे. ‘गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

कोल्हापुरात साकारत आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री...

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुतळ्याचेही अनावरण कागल विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्तुर येथील...

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा   कोल्हापूर/प्रतिनिधी : दलित मागास वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय याठिकाणी कुठेही फारशी...

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज अश्विन शुक्ल तृतीया. शारदीय नवरात्र महोत्सवाचा तिसरा...

Recent Comments