Tuesday, July 23, 2024
Home ताज्या पती-पत्नी यांनी तेरा वर्षाच्या मुलासह कुंभी नदीत उडी टाकून केली आत्महत्या,पन्हाळा तालुक्यातील ...

पती-पत्नी यांनी तेरा वर्षाच्या मुलासह कुंभी नदीत उडी टाकून केली आत्महत्या,पन्हाळा तालुक्यातील  घटना

पती-पत्नी यांनी तेरा वर्षाच्या मुलासह कुंभी नदीत उडी टाकून केली आत्महत्या,पन्हाळा तालुक्यातील  घटना

कोल्हापूर/प्रतिनिधी : पन्हाळा तालुक्यातील गोठे येथे पती-पत्नी यांनी तेरा वर्षाच्या मुलासह कुंभी नदीत उडी टाकून आत्महत्या केली. दीपक शंकर पाटील (४० वर्षे), वैशाली दीपक पाटील (३५ वर्षे) व चि.विघ्नेश पाटील (१३ वर्षे)अशी मृतांची नावे आहेत. जीवनात अपयश आल्यामुळे आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी त्यानी लिहून ठेवली होती.आज शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार समोर आला. या घटनेने साऱ्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
यासंबंधी गावकरी व पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी आहे दीपक पाटील हे गोठे येथील शेतात राहात होते. गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दीपक पाटील, वैशाली पाटील व मुलगा विघ्नेश हे तिघे घरातून बाहेर पडले. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी नदीत उडी टाकली. नदीत उडी घेण्यापूर्वी तिघांनी एकत्र दोरीने बांधून घेतल्याची माहिती समोर आली आहे.शुक्रवारी सकाळी त्यांच्या घराला बाहेरुन कडी असल्याचे शेजारी यांच्या निदर्शनास आले. शेजाऱ्यांनी दार उघडले. तेव्हा घरात त्यांना मोबाइलच्या खाली एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये ‘जीवनात अपयशी ठरलो, आम्हाला माफ करा. कोणालाही जबाबदार धरू नये. स्वखुशीने आम्ही आत्महत्या करत आहे ’अशी आशयाची चिठ्ठी सापडली.
चिठ्ठी वाचून गावकऱ्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. काही जणांना, कुंभी नदी पात्राजवळ त्या तिघांची चप्पले आढळली. गावकऱ्यांनी नदी पात्रात शोध मोहिम राबवली. शोधाशोध करताना त्या तिघांचे दोरीने बांधलेले मृतदेह आढळून आले. आज शुक्रवार सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दीपक पाटील यांची मुलगी साक्षी ही सध्या दहावीत शिकत असून ती आजोळी रहात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments