पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करून केला लोकशाहीचा खून हायकोर्टात दाद मागणार -चंद्रकांत दादा पाटील
कोल्हापूर/प्रतिनिधी : दोनच दिवसापूर्वी महाराष्ट्र मधील भाजप सदस्य असणारी समिती राज्य शासनाच्या विधी विभागाने केली हा निर्णय म्हणजे लोकशाहीचा खून केला असल्याचे आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला असून या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले याचा कालावधी असताना अजून सव्वा वर्षाचा कालावधी असताना ही समिती बरखास्त केली आहे याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने दोनच दिवसापूर्वी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त केली होती.भाजप-शिवसेना सरकारच्या कालावधीत ऑगस्ट २०१७ मध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी महेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यासह सहा जणांचा समावेश असलेली समिती नुकतीच बरखास्त केली आहे.अजूनही या देवस्थान समितीचा कालावधी हा सव्वा वर्ष शिल्लक आहे.मात्र या आघाडी सरकारने ही समिती बरखास्त करून लोकशाहीचा खून केला आहे.
सिद्धिविनायक मंदिर मध्ये ज्या शिवसेना पक्षाचा अध्यक्ष असताना त्यांना हक्क दिला आणि कोणताही निर्णय आम्ही घेतला नाही आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष भाजपचे महेश जाधव आहेत व यामध्ये अन्य पाच सदस्य पक्षाचे असल्याने ही समिती बरखास्त करून लोकशाहीचा खून या राज्य सरकारने केला आहे या विरोधात हायकोर्टात आम्ही दाद मागणार असल्याचे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.