कोल्हापूर मध्ये विकेंड लॉकडाऊनला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यामध्ये पाच दिवस सोमवार ते शुक्रवार जमाबंदी काही कडक निर्बंध यासह सर्व व्यवहार चालू व शनिवार आणि रविवार हे दोन दिवस कडकडीत बंद संचारबंदी घोषित केले होती याला आज कोल्हापूर शहरात व जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला घरातून एकही व्यक्ती आज बाहेर न पडता राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला चौका-चौकात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता वाहनांची कसून चौकशी केली जात होती आपण कोणत्या ठिकाणी जाणार आहे लायसन आहे का कोविड तपासणी केली आहे का आदी सर्व माहिती पोलीस दुचाकी वाहनधारकांना विचारत होते शिवाय व्यापारी उद्योजक भाजीपाला मार्केट सर्व काही बंद ठेवून आज पूर्वीसारखे कडकडीत बंद पाळण्यात आले होते त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेने याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला.
पोलिसांकडून पूर्णपणे बाहेर फिरणार्या लोकांवर नजर होती जिल्हा पूर्ण बंद पाळण्यात आला होता आवश्यक सेवा सोडली तर महाद्वार रोड राजारामपुरी मार्केट यार्ड शिवाजी विद्यापीठ परिसर गोकुळ शिरगाव एमआयडीसी शिरोली एमआयडीसी सर्वकाही उद्योगधंदे शांत बंद होते. सर्वत्र शांतही ही शांतता होती आवश्यक ता सोडली तर कोणीही रस्त्यावर फारसे फिरताना दिसून आले नाहीत.त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुकारलेल्या बंदला प्रतिसाद कोल्हापूर शहरात व जिल्ह्यात मिळाला अत्यावश्यक सेवा म्हणून एसटी बस सुरू ठेवण्यात आली होती. मात्र प्रवासी याठिकाणी फिरकलेच नाहीत त्यामुळे ही सेवाही बंद केली गेली मात्र जनतेने आज कोल्हापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद दिला.