आघाडी सरकार भाजपा यांच्यांतील राजकारणात जनतेचे हाल
कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या तिन्ही पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार राज्य करत आहेत. यातील शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार चालवत आहेत. आता आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या आधी भाजपाचे सरकार या महाराष्ट्रावर आले होते त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून सध्या असलेले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे काम पहात होते. आता मात्र शिवसेनेचे माननीय उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत खरे पाहता महाराष्ट्र राज्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी यांची युती होती आणि भाजप आणि शिवसेना यांची युती होती मात्र या सर्वांच्या मध्ये निवडणुका झाल्यानंतर निवडणुकीच्या वेळी भाजप-शिवसेना यांनी एकत्रित निवडणूक लढवली तर काँग्रेस राष्ट्रवादी यांनी एकत्रित निवडणूक लढवली यामध्ये सर्वांना बऱ्यापैकी जागांवर यश मिळाले.यावेळी मुख्यमंत्री पद भाजपच्या हातात होते भाजप आणि शिवसेनेची युती झाली असती तर उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षाचे मुख्यमंत्रिपद भाजपकडे मागितले होते मात्र त्यांनी त्यावर कोणताही विचार केला नाही पाच वर्ष पद भाजपकडेच राहणार असा निर्णय दिल्याने सध्या असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षाशी हातमिळवणी केली आणि काँग्रेस -राष्ट्रवादी – शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्रित विकास आघाडी महाराष्ट्र राज्यामध्ये उदयाला आली त्यामुळे भाजपच्या मनामध्ये निर्माण झाली सध्या महाराष्ट्रमध्ये भाजप आणि सध्या अस्तित्वात असलेली महाविकास आघाडी सरकार यांच्यामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत वादाचे प्रसंग सुरू आहेत. राजकारण सर्वच बाबतीत केले जात आहे शिवाय सध्या केंद्रामध्ये भाजपचे सरकार यांचे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून संपूर्ण भारत देश चालवत आहेत. सर्वच राज्यांना केंद्राकडून जोपर्यंत निधी अथवा कोणत्याही गोष्टीचा निर्वाळा मिळत नाही तोपर्यंत राज्य कोणताही निर्णय घेऊ शकत नाही अशी स्थिती असते आणि नेमके महाविकास आघाडी सरकार हे टिकू द्यायचे नाही या भावनेने सध्या भाजपकडून टोकाचे राजकारण व टीकेचे राजकारण केले जात आहे. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून या भाजप सरकारची विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना हटवायचे आहे. त्यामुळेच त्यांनी अनेक मुद्द्यांवरून या महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले आहे.मात्र विकास आघाडी सरकार भाजपच्या कोणत्याही गोष्टीला भीक घालत नसून सध्या कोरोना आजाराने महाराष्ट्र राज्याला हैराण करून सोडले आहे अशा परिस्थितीत लोकांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी कोव्हक्सींन ही लस संपूर्ण भारत देशामध्ये सर्वच राज्यांना जनतेला मोफत देण्यासाठी पुरवठा करण्यात आला आहे. मात्र जितक्या प्रमाणात लोकसंख्या असेल तेवढा साठा तरी पुरवठा करणे आवश्यक असते. तो पुरवठा याच राजकारण्यांमध्ये ईर्षेने केंद्र सरकारकडून केला जात नसल्याने सध्या या भाजप आणि महाविकास आघाडी सरकारच्या राजकारणामध्ये जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे नुकसान होत आहे जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशातील सर्व जनतेला बँकेमध्ये खाती कढण्यास सांगितली व गॅसची सबसिडी त्यावर टाकण्यास सुरुवात केली सध्या ८२५ रुपयांना गॅस विकत मिळत आहे मात्र एक रुपयाही बँकेत लोकांच्या सबसिडी म्हणून जमा होत नसल्याने लोक सध्या या कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. त्यामुळे सरळ-सरळ उघड-उघड जनता भाजपा करत असलेल्या कारभार उघड्या डोळ्यांनी पहात आहेत राज्य सरकारला त्यांनी कोंडीत पकडले असून याला राज्य सरकार घाबरत नाही असेही अनेक मंत्री या महा विकास आघाडीचे बोलत आहेत मात्र सध्या केंद्र सरकारकडून कोरोनाची लस महाराष्ट्र राज्याला उपलब्ध केली जात नसल्याने जनता या भाजपसरकार वर नाराज असल्याचेही चित्र दिसून येत आहे. असेच म्हणावे लागेल. मात्र या राजकारणामध्ये जनतेने काही सर्व भोगायचे का हाल सहन करायचे हे चुकीचे असून या दोन्ही सरकारने याबाबत आत्मपरीक्षण करून जनतेचा विचार करणे आवश्यक आहे.