Monday, January 13, 2025
Home ताज्या माती उत्खननासाठी २५ हजाराची लाच घेताना तलाठी रंगेहाथ ताब्यात

माती उत्खननासाठी २५ हजाराची लाच घेताना तलाठी रंगेहाथ ताब्यात

माती उत्खननासाठी २५ हजाराची लाच घेताना तलाठी रंगेहाथ ताब्यात

कोल्हापूर/प्रतिनिधी : वीटभट्टीसाठी माती उत्खनन करण्याकरिता रॉयल्टी भरुन परवाना पाहिजे होता. संबंधित व्यक्तीने रितसर परवाना घेण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील इंगळी येथील तलाठी संतोष सुभाष उपाध्ये यांच्याकडे गेले. तलाठी उपाध्ये यांनी माती उत्खननासंबंधीचा अधिकृत परवाना देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितली. लाचेची रक्कम स्वीकारताना मंगळवारी त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.
वास्तविक तलाठी उपाध्येने अधिकृत परवाना देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. संबंधित तक्रारदार व उपाध्ये यांच्यामध्ये २५ हजार रुपयांचा तोडगा निघाला. दरम्यानच्या कालावधीत त्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागांशी संपर्क साधला. त्यांच्याकडे तक्रार नोंदविली. त्या तक्रारीनुसार पथकाने २४ मार्च रोजी पडताळणी केली व
शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज मंगळवारी (ता. ३० मार्च) रोजी इचलकरंजी येथील अप्पर तहसिलदार कार्यालयाबाहेर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सापळा लावला.यावेळी तक्रारदारांकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना उपाध्ये याला रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलिस निरीक्षक युवराज सरनोबत, पोलिस कर्मचारी सुनील घोसाळकर, कृष्णात पाटील, रुपेश माने आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे नवीन...

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन – गणी आजरेकर यांनी दिली माहिती

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन - गणी आजरेकर यांनी दिली माहिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूर/ (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.आज सोमवार,दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी...

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान कोल्हापूर/प्रतिनिधी : आरोग्य, पर्यावरण, व्यसनाधीनता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन...

Recent Comments