कोल्हापूर सराफ संघाच्या वतीने आयोजित
टर्फ क्रिकेटमध्ये सोना चांदी संघ विजेता
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने आयोजित टर्फ प्रीमियम क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये सोना चांदी संघाने विजेतेपद पटकाविले. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने सराफ/सुवर्णकार व्यावसायिकांसाठी टर्फ प्रीमियर क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले होते. १२ संघांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेमध्ये सोना चांदी आणि राठोड रॉयल्स या दोन संघात अंतिम सामना झाला. यावेळी सोना-चांदी संघाने बाजी मारून सामना जिंकला.
दरम्यान, सराफ व्यापारी संघाच्या वतीने विजेत्या संघास रोख २१,०००/- रुपये व चषक आणि उपविजेता संघास ११,०००/- रुपये व चषक बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड,उपाध्यक्ष जितेंद्र राठोड,सचिव अनिल पोतदार (हुपरीकर) यांच्यासह राजेंद्र पोतदार (हुपरीकर), मंगेश शेट्ये,जे. के. गांधी, के. जी. ओसवाल, बिपीन परमार, संचालक मंडळ आणि सामना संयोजक सर्वश्री प्रसाद कालेकर,प्रीतम ओसवाल सुहास जाधव, शेखर पोतदार,सेजल राठोड, विपुल ओसवाल, हर्षल (बंटी) राठोड आदी उपस्थित होते.