नितेश राणे यांच्या माध्यमातून सेवेत दाखल झालेल्या तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण
वैभववाडी/प्रतिनिधी : आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघातील उपजिल्हा रूग्णालय कणकवली, ग्रामीण रूग्णालय देवगड व ग्रामीण रूग्णालय वैभववाडी या रूग्णालयांना तीन नविन एसी अँब्युलन्स देण्यात आल्या. त्यांचे लोकार्पण आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून केला. यावेळी तिन्ही भाजपा तालुका अध्यक्षांकडे अँब्युलन्सच्या चावी देण्यात आल्या. या कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये वेळेत पोचता न आल्याने जीवाला धोका निर्माण होत होता. या अँब्युलन्स मदतीमुळे रुग्णांना आधार मिळाला आहे. रुग्णसेवेत आमदार नितेश राणे यांचे हे योगदान मोलाचे ठरणार आहे.