काळम्मावाडी येथील जॅकवेलच्या कामाची प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केली पाहणी
कोल्हापूर/प्रतिनिधी : काळम्मावाडी थेटपाईप लाईन व धरण क्षेत्रातील कामांची प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांसह पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जल अभियंता (प्रकल्प) हर्षजीत घाडगे, युनिटी कन्सल्टंटचे प्रकल्प सल्लागार विजय मोहिते, जी.के.सी कंपनीचे व्यवस्थापक राजेंद्र माळी उपस्थित होते.
यावेळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी ब्रेक प्रेशर टँकची पाहणी केली. सदरचे काम समाधानकारक असून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. यानंतर जॅकवेल मधील कामाची पाहणी केली असता या ठिकाणचे जे पाणी काढण्यात आले आहे त्याठिकाणचा गाळ त्वरित काढून घ्यावा. यानंतर आठ ते दहा दिवसाच्या आत याठिकाणी काँक्रीटीकरण चालू करण्याचे आदेश प्रशासक यांनी दिले. तसेच जॅकवेल येथील उर्वरीत इन्फेक्शन वेल, इंन्टेकवेल येथील डी वॉटरींगचे काम त्वरीत सुरु करण्याच्या सुचना दिल्या.