राज्यस्तरावरील अन्वेश्ना प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये केआयटीचा संघ द्वितीय
रुपये १५ हजाराच्या पारितोषिकासहित पटकावलीत पहिल्या पाचमधील एकूण ३ बक्षिसे
कोल्हापूर/प्रतिनिधी : शालेय विद्यार्थ्यांच्या चौकस बुद्धीला अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे ज्ञान मदतीला आले तर कल्पकता व ज्ञानाचा उत्तम पूल बांधता येतो.असा विचार घेऊन अन्वेश्ना इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीने दर वर्षी शालेय व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असणारे कल्पक प्रोजेक्टचे प्रदर्शन मुंबई येथे आयोजित केले जाते. यावर्षीही अन्वेश्ना २०२१ चे आयोजन ‘विज्ञान व अभियांत्रिकी संमेलन २०२१’ या नावाने आयोजित केले होते. कोविडच्या काळातही हा उपक्रम अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन व सिनॉप्सीस यांच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाला.
राज्यस्तरावरील फक्त ४० प्रोजेक्ट ची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आलेली होती. कोल्हापूर येथील केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तीन प्रोजेक्ट या अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते. अंतिम फेरीचे परीक्षण हे दि.१ मार्च ते ६ मार्च या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले. डॉ. एस. एन. तेली, श्री. श्रीकांत कुलकर्णी व श्री शिवराज पाटील यांच्यासारख्या मातब्बर परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टचे परीक्षण व अवलोकन केले. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम दि. १० मार्च २०२१ रोजी संध्या.५.३० वाजता संपन्न झाला. सीनोपसिस या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनीचे श्री. हर्ष देसाई श्री.साई चंद्रशेखर व श्री.मिथुन जॉन यांच्या सारख्या मान्यवर उद्योजकांच्या उपस्थित हा सोहळा ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाला.
गत दोन वर्षातील सातत्य राखत यावर्षीही केआयटीच्या अंतिम फेरीत पात्र ठरलेल्या तीनही प्रोजेक्टनी या स्पर्धेतील पहिल्या पाच मधील तीन पारितोषिके पटकावली आहेत. स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार केआयटीच्या मेकॅनिकल विभागातील ‘ऑटोनॉमस वॉटर रोवर’ या प्रोजेक्टला मिळाला.चौथा पुरस्कार उत्पादन विभागाच्या ‘स्मार्ट लॉक’ ला तर अंतिम ५ पुरस्कार ‘ऍग्रो प्रॉडक्ट शेल्फ लाइफ एक्सटेंडर’ या प्रोजेक्टला मिळाला. या प्रोजेक्टमध्ये अनुक्रमे सर्वेश खिरे, अर्जुन खेडेकर, सुशांत मोरे, उबेद शेख, ओमकार वरणे या अभियांत्रिकीच्या मुलांचा सहभाग होता.त्याच बरोबर या विद्यार्थ्यांच्या सोबत शालेय विद्यार्थ्यांचा सुद्धा मोठा सहभाग राहिला. कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूल मधील प्रथमेश टिकले वर्देश नार्वेकर विद्या मंदिर कणेरीवाडी येथील प्रणव पाटील,हर्षद पाटील यशवंतराव भाऊराव पाटील या शाळेतील प्रथमेश पाटील व आदित्य कोष्टी यांचा या यशात मोठा सहभाग राहिला.प्रा.मिहीर कुलकर्णी व प्रा.अमित वैद्य यांनी या ३ ही प्रोजेक्टचे मार्गदर्शक म्हणून काम केले. द्वितीय,चौथा व पाचवा पुरस्कार प्राप्त केलेल्या प्रोजेक्टना अनुक्रमे रोख रक्कम रु.२५०००/- ,१५०००/- व १००००/- व प्रमाणपत्र देवून सन्मानीत करण्यात आले. विभागाचे विभाग प्रमुख डॉ.उदय भापकर,संस्थेचे संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिंन्नी ,संस्थेचे अध्यक्ष श्री भरत पाटील, उपाध्यक्ष श्री सुनील कुलकर्णी, सचिव दिपक चौगुले आणि अन्य विश्वस्त यांचे बहुमोल मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.