“गोकुळ” कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधरण सभा ऑनलाइनने संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : १० लाखा पर्यंत कर्ज मर्यादा बहुमताने मंजुर कोल्हापूरःता.१८. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने काढलेल्या आदेशनुसार दिनांक ११-०३-२०२१ ई.रोजी गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईनने पार पडली. स्वागत व प्रास्ताविक चेअरमन प्रकाश आसुर्लेकर यांनी केले. नियमित कर्ज मर्यादा ७ लाखावरून १० लाख करणेस मंजुरी देणेत आली.
संस्थेची वार्षिक उलाढाल १०० कोटीच्या वर असुन ठेवीस ८ टक्के व्याज दर तर कर्जास ९ टक्के व्याज दर आकारला जातो. सदरच्या सभेस १३० सभासदानी लिंक ओपण करून चर्चेत सहभाग घेतला. संस्थेचे सभासद संभाजी कदम, रामकृष्ण पाटील, प्रकाश माने, सुहास डोंगळे, अनिल पाटील, गिता मोरे यांनी चर्चेत सहभाग घेतला.संस्थेचे चेअरमन प्रकाश आसुर्लेकर, सतिश मदने, पी. आर. पाटील यांनी समाधानकारक उत्तरे दिली. सभा दिड तास खेळीमेळीत चालली आभार पी. आर. पाटील यांनी मानले. यावेळी सभेस चेअरमन प्रकाश आसुर्लेकर, सतिश मदने, पी.आर.पाटील, संभाजी देसाई, शिवाजी पाटील, नंदकुमार गुरव, सुनिल घाटगे, शुभदा पाटील, छाया बेलेकर,राजेंद्र पाटील सरूडकर गणपाती कागनकर व्यवस्थापक संभाजी माळकर उपस्थित होते.