Wednesday, December 25, 2024
Home ताज्या मंत्री मुश्रीफांकडून लोककल्याणाचे कार्य अजूनही बाकी - माजी आमदार संजय घाटगे यांची...

मंत्री मुश्रीफांकडून लोककल्याणाचे कार्य अजूनही बाकी – माजी आमदार संजय घाटगे यांची अपेक्षा

मंत्री मुश्रीफांकडून लोककल्याणाचे कार्य अजूनही बाकी – माजी आमदार संजय घाटगे यांची अपेक्षा

भडगाव/प्रतिनिधी : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजकीय वारसा नसतानाही कर्तुत्वाच्या जोरावर  जनतेला आपलंसं केलं. त्यांच्या हातून अजूनही लोककल्याणाचं बरंच कार्य बाकी आहे, अशी अपेक्षा माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी व्यक्त केली.भडगाव ता. कागल येथे ग्रामदैवत हनुमान मंदिर भूमिपूजन,  मरगुबाई मंदिर वास्तुशांती व विकास कामांची उद्घाटने अशा संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार श्री. घाटगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.  श्री घाटगे पुढे म्हणाले, अल्पसंख्यांक समाजात जन्मूनही केवळ लोकसेवेचे व्रत घेऊन त्यांनी बहुजन समाजाला आपलंस करून नेतृत्व केलं. राजसत्तेच्या माध्यमातुन त्यांनी जनतेचे दुःख, दारिद्र्य, अंधश्रद्धा, गरिबी यावर मात केली गोरगरीबांचे अश्रू पुसले, असेही श्री घाटगे म्हणाले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जनतेने मला एवढे भरभरून दिलं आहे की या जन्मीच काय, सात जन्मी सुद्धा जनतेच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही.  विकास कामांच्या माध्यमातून मी जनतेचा पांग फेडीन. यावेळी मरगूबाई मंदिर वास्तुशांती, ग्रामदैवत हनुमान मंदिर भूमीपूजन, अंगणवाडी इमारत उद्घाटन, नवीन फिल्टर हाऊस उध्दघाटन, गावातील अंतर्गत रस्ते व  गटर्स, हनुमान मंदिरसमोर पेव्हिंग, हायमास्ट पोल उभारणी, माळवाडी रस्ता डांबरीकरण, पाणवठा रस्ता खडीकरण डांबरीकरण,  भडगाव ते भडगाव फाटा रस्ता डांबरीकरण अशा एकूण दीड कोटी  रूपयांच्या कामांचा  लोकार्पण   मान्यवरांच्या हस्ते झाले.

चौकट……..
आम्ही दोघे मित्र…….
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, मी आणि संजय घाटगे आम्ही दोघेही कॉलेजचे मित्र. आम्ही दोघेही क्रिकेटपटू, फास्ट बॉलर, राजकारणातही स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली एकाच गटात काम केले. परंतु; पुढे आमच्या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, एम. एस.पाटील, सरपंच दिलीप चौगले, उपसरपंच बी.एम. पाटील, ज्ञानदेव म्हांगोरे, दत्तात्रय सोनाळकर, देवानंद पाटील, बाबासो चौगले,  समाधान राणे, रखुनाथ पाटील, मधुकर कांबळे, भिकाजी माने, एकनाथ पाटील,  धोंडीराम भांडवले, विश्वनाथ खतकर,  पांडूरंग चौगले, रणजित खतकर  या प्रमुखांसह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार विठ्ठल कुंभार यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम   कोल्हापूर/प्रतिनिधी : मोटोहॉस, केएडब्लू व्हेलोसे मोटर्स प्रा. लि....

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले ईलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने संपूर्ण भारतात ४,००० स्टोअरच्या...

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

Recent Comments