Sunday, July 14, 2024
Home ताज्या 'गोकुळ दूध संघास उच्चतम गुणवत्तेचे आय.एस.ओ.२२०००:२०१८' मानांकन प्राप्त

‘गोकुळ दूध संघास उच्चतम गुणवत्तेचे आय.एस.ओ.२२०००:२०१८’ मानांकन प्राप्त

‘गोकुळ दूध संघास उच्चतम गुणवत्तेचे आय.एस.ओ.२२०००:२०१८’ मानांकन प्राप्त

कोल्‍हापूर/प्रतिनिधी : उच्चतम गुणवत्ता त्याच बरोबर उत्पादकांसोबत ग्राहकांचे हित व आधुनिकतेची जोड या मध्ये गोकुळ नेहमीच अग्रेसर राहिला आहे. यापूर्वी गोकुळकडे शाखा व मुख्य दुग्धशाळेकडे सुरवातीस आय. एस. ओ ९००२,आय.एस. ओ ९००१:२००८  (अन्न व सुरक्षा कार्यप्रणाली) व त्यानंतर आय. एस. ओ २२०००:२००५  या कार्यप्रणालीनुसार कामकाज होत होते. याचीच पूढील सुधारीत कार्यप्रणाली म्हणून आय. एस.ओ २२००० : २०१८  हे मानांकन प्राप्त करणेचा प्रयत्न गेल्या दोन वर्षांपासून संघामार्फत सुरू होता. याचाच भाग म्हणून आंतरराष्ट्रीय  पातळीवर सर्टीफिकेशनचे काम करणारी जर्मनमधील एजन्सी टी.यु.व्ही. नॉंर्ड यांचे वरिष्ठ पातळीवरचे अधिका-यांनी दि.१ मार्च २०२१ ते दि. ६ मार्च, २०२१ या काळांत मुख्य दुग्धशाळेबरोबर विविध शाखांना भेटी देवून गोकुळच्या कामकाजाची तपासणी केली. सदरच्या तपासणीमध्ये विशेषतः उत्पादीत होणारे गुणवत्तायुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थ, अन्न सुरक्षा कार्यप्रणालीनुसार होणारे कामकाज, प्लॅंट स्वच्छता, दूध व दुग्धजन्य पदार्थ पॅकींगसाठी वापरणेत येणारे पॅकींग मटेरीयल व पॅकींगवेळी निघणारे वाया गेलेल्या पॅकींग मटेरीयलची केली जाणारी निर्गत इत्यादी बाबींचा विचार करून आय. एस. ओ. २२०००:२०१८ हे मानांकन देण्याचे जाहीर केले आहे. सदरचे मानांकन मिळविणारा महाराष्ट्राच्या सहकारी दुग्धव्यवसाय क्षेत्रातील गोकुळ दुध संघ हा एकमेव व पहिला दुध संघ आहे. याचबरोबर एनडीडीबीच्या मामार्गदर्शनाखाली  मुख्य दुग्धशाळेकडे क्यु मार्क (गुणवत्ता व्यवस्थापन) ही कार्यप्रणाली देखील राबविली जात आहे. ही गुणवत्तेची मानांकने मिळाल्यामुळे दुध उत्पादक व ग्राहकांचा गोकुळवर असलेला विश्वास वृद्धींगत होण्यास मदत होणार आहे. तसेच गोकुळची उत्पादने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गुणवत्तेच्या जोरावर विक्रीस उपलब्ध करता येणार आहेत. ही भूषणावह बाब आहे. कोरोना विषानुसारखा खडतर काळ असूनदेखील गोकुळचे अधिकारी व कर्मचारी यांचे सदरचे मानांकन प्राप्त करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे तसेच जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादकांनी चांगल्याप्रकारचे दूध घातल्यामुळे हे मानांकन मिळवणे शक्य झाले आहे. यामुळे गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनांना मुंबई, पुणे ,गोवा सारख्या उच्चभ्रू ग्राहकांडून चांगल्या प्रकारे मागणी होणार असलेणे, जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे परतावा देणे शक्य होणार असल्याचे गोकुळचे  चेअरमन रवींद्र आपटे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments