Saturday, October 26, 2024
Home ताज्या अनेक कर्तबगार महिलानी आपल्या कार्याचा ठसा निर्माण करून स्त्री शक्तीचा परिचय करुन...

अनेक कर्तबगार महिलानी आपल्या कार्याचा ठसा निर्माण करून स्त्री शक्तीचा परिचय करुन दिला – प्रा. राजश्री पोवार

अनेक कर्तबगार महिलानी
आपल्या कार्याचा ठसा निर्माण करून स्त्री शक्तीचा परिचय करुन दिला – प्रा. राजश्री पोवार

कोल्हापूर/प्रतिनिधी : क्लारा झेटकीन, सावित्रीबाई फुले इंदिरा गांधी,प्रतिभाताई पाटील कमला हॅरीस, आनंदीबाई जोशी, प्रिय सिंघन, कल्पना चावला, फातिमा बेदी यासारख्या कर्तुत्ववान कर्तबगार महिलानी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा निर्माण करून स्त्री शक्तीचा परिचय करुन दिला असून त्यांचे कार्य कौतुकास्पद असून भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल असे मत प्रा. राजश्री पोवार (बिसुरे) यांनी व्यक्त केले.त्या गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयात श्रीमती सुशीलादेवी मल्हाराव देसाई युवती सुचेतना फाउंडेशन आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रशासन अधिकारी व फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रा. डॉ. मंजिरी मोरे होत्या.स्वागत व प्रास्ताविक प्रा. पद्मश्री आवटे यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा.राजश्री पोवार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीमती सुशीलादेवी मल्हारराव देसाई युवती सुचेतना फौंडेशन अध्यक्षा प्रा. डॉ. मंजिरी मोरे यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली आणि प्रा प्रमोद तावडे यांनी सादर केलेली भारतीय कर्तृत्ववान महिलांच्या रुपेरी पडद्यावरील चित्रफीत फिरूनी नवी जन्मेन मी, मदर इंडिया ते मर्दानी चित्रफीत सादर करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ.पी.के. पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती ताराराणी यांचे विचार भावी पिढीसाठी आदर्शवत ठरतील असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्राध्यापक जयकुमार देसाई, पेट्रन कौंसिल मेंबर दौलत देसाई, प्रशासन अधिकारी प्राध्यापक डॉक्टर मंजिरी मोरे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर पी.के पाटील, उपप्राचार्य प्रा. एच. एस. पिसाळ, पर्यवेक्षक प्रा.एस. एन. मोरे, प्रा.संध्या नागन्नावर तसेच सर्व महिला प्राध्यापक,प्राध्यापिका, प्रशासकीय कर्मचारी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा. पद्मश्री आवटे यांनी केले. तर आभार प्रा. संध्या नागन्नावर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे...

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना ‘वेल्डींग, सीएनसी कोर्स’ व ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना 'वेल्डींग, सीएनसी कोर्स' व 'अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या' प्रशिक्षणाची सुवर्णसंधी शिरोली एमआयडीसी/प्रतिनिधी : केंद्रशासना मार्फत व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी...

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

Recent Comments