अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात २,०२८ लाभार्थ्यांना १५७ कोटींचे कर्ज वाटप
कोल्हापूर/प्रतिनिधी : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत आत्तापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात २,०२७ कर्ज प्रकरणे बॅंके मार्फेत मंजूर झाली असून बॅंकानी लाभार्थ्यांना १५७ कोटींचे कर्ज वितरीत केले आहे. तसेच त्यातील १,७१९ जणांना महामंडळामार्फेत १० कोटी ६० लाख ६ हजार ६७८ रुपयांचा व्याज परतावा प्राप्त झाला आहे.महामंडाळाच्या या योजनांचा मराठा लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, महामंडळाच्या अर्थसहाय्यामुळे आज कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण मोठा उद्योजक होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. नियमीत कर्जाची परत फेड करणा-यांना नियमीत व्याज परतावा मिळत आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत आत्तापर्यंत राज्यातील २३ हजार १४० लाभार्थ्यांना बॅकांनी १८९९ कोटी ८८ लाख ८८ हजार ६९७ रुपये इतके कर्ज वाटप केले आहे. त्यातील १८ हजार ६४६ लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरु झाला असून ९७ कोटी ६१ लाख ७० हजार १४७ रुपये व्याज परताव्याची रक्कम देण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे आजतागात एकही कर्ज खाते एन.पी.ए मध्ये गेले नसल्यामुळे व नियमीत व्याज परतावा मिळत असल्याने प्रारंभी अनुकुल नसणा-या बॅकांचा दृष्टिकोन बदलत आहे. या माध्यमातून शहरी ग्रामीण भागातील युवक आणि महिलांना स्वयंमरोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. महामंडळाच्या योजनेत कर्ज प्रकरणे मंजूर करणा-या मध्ये राष्ट्रीयकृत बॅंकासह सहकारी बॅंकेचे सुध्दा मोठे योगदान आहे. लाभार्थ्यांना नियमीत व्याज परतावा सुरु झाल्यामुळे बॅकांनमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नवाब मलिक, शंभूराज देसाई, महामंडळाचे माजी अध्यक्ष श्री. नरेंद्र पाटील व माजी उपाध्यक्ष श्री. संजय पवार यांच्या यासाठी मोठे योगदान आहे. जिल्हाधिकारी श्री. दौलत देसाई, व्यावस्थापकीय संचालक अनिल पाटील, अग्रणी जिल्हा बॅंक प्रंबधक राहूल माने, सहायक आयुक्त श्री. माळी महामंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी व विषेशतः सध्याचे समन्वयक श्रीमती शुभांगी जाधव, सतिश माने, पुष्पक पालव, ऋषिकेश आंग्रे या सर्वांचे महामंडळाच्या कामकाजात सहकार्य लाभत आहे.
भविष्यात सुध्दा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिद्दीने काम करणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत- जास्त मराठा समाजातील लोकांनी लाभ घ्यावा असे महामंडळामार्फत आवाहन करण्यात आले आहे.