Thursday, November 21, 2024
Home ताज्या दिल्लीतील शेतकरी आंदोलन हे शेतकऱ्यांच्या हिताचे राहिले नाही - राज्य कृषीमूल्य आयोगाचे...

दिल्लीतील शेतकरी आंदोलन हे शेतकऱ्यांच्या हिताचे राहिले नाही – राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांची माहिती

दिल्लीतील शेतकरी आंदोलन हे शेतकऱ्यांच्या हिताचे राहिले नाही – राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांची माहिती

कोल्हापूर/प्रतिनिधी : दिल्लीतील शेतकरी आंदोलन हे शेतकऱ्यांच्या हिताचे राहिले नाही. हे आंदोलन आता राजकीय बनले आहे. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली नेत्यांचा तमाशा सुरू आहे.’अशी टीका राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले. त्यांनी यावेळी बोलताना शेतकरी आंदोलनाच्या राजकारणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचाही समाचार घेतला.
‘शरद पवार हे स्वत’ला शेतकऱ्यांचा आत्मा समजतात, मग कृषी विधेयकावरील चर्चेदरम्यान ते राज्यसभेत गैरहजर का होते ? ते गैरहजर राहण्यामागे काय चमत्कार घडला, नेमकी काय भानगड आहे ? कृषी कायद्यावरुन सध्या राजकारण सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे स्वतचे अस्तित्व टिकवण्यासाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या मागे शेतकरी आहेत का ? सदाभाऊ खोत फुटले नसते तर ते भाजपसोबत असते. तुमचा माणूस फुटला म्हणून भाजप बेईमान कसा ? अशी विचारणाही पटेल यांनी केली. राजू शेट्टी म्हणजे सेना गेलेले पती असा टोलाही त्यांनी लगावला.
केंद्र सरकार सगळया गोष्टीवर चर्चा करायला तयार आहे. पण शेतकरी आंदोलनातील नेते मंडळी आडमुठेपणाने वागत आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीत. हे आंदोलन शेतकऱ्यांचे हिताचे राहिलेले नाही. त्यामध्ये राजकारणाचा शिरकाव झाला आहे ही राजकीय मंडळी शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली आंदोलनाचा तमाशा करत आहेत. कृषी कायद्यावरुन विरोधक मंडळी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. हा कायदा ऐच्छिक आहे. याचबरोबर शेतकऱ्यांनी आता बांबूचे पीक घेणे आवश्यक आहे. याद्वारे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे असे सांगून जगामध्ये माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजन ची आवश्यकता आहे झाडे तोडली गेली आहेत त्यामुळे पृथ्वीवर कधीही काहीही घडू शकणार आहे जर माणसाला स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर शेतकऱ्यांनी बांबूचे पीक घेऊन बांबू पासून वेगवेगळ्या वस्तू बनविण्यास प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे सांगितले.पत्रकार परिषदेला भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, विजय जाधव, दिलीप मेत्राणी, भगवान काटे, विजय अग्रवाल आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments