सार्वत्रिक निवडणूक २०२१ चेअनुशंगाने मतदार यादया तयार करण्याचे राज्य निवडणूक आयोगचे आदेश
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२१ करिता मतदार यादी तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूकआयोगाने दिले आहेत. यासाठी दि.१५ जानेवारी २०२१ पर्यन्तची यांचे कडील भारतीय निवडणूक आयोग मतदार यादी ग्राहय धरण्याबाबत आयोगाने आदेश दिलेले आहेत. यामध्ये नोव्हेंबर,२०२० मध्ये मुदत संपलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेची प्रभाग रचनेची कार्यवाही पूर्ण झाली असून त्याकरिता मतदार यादी संदर्भात कार्यक्रम दिलाआहे.
एप्रिल-मे २०२१ मध्येहोणा-या कोल्हापूर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणूक २०२१ करिता राज्यनिवडणूक आयोगाने राज्य निवडणूकआयोगाची अधिसुचने द्वारे दि.१५ जानेवारी, २०२१ ही कट ऑफ डेट जाहीर केली आहे, त्या दिवशी(म्हणजचेच दि.१५ जानेवारी २०२१रोजी) अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादीच सार्वत्रिक निवडणुकीसाठी वापरण्यात येईल असेआदेश देण्यात आलेले आहेत.
तसेच दि.१५ जानेवारी २०२१ मतदार यादी ग्राहय धरुन कोल्हापूरमहानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२१ मतदार यादीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे राहील – प्रभागनिहाय प्रारुपमतदार यादी प्रसिध्दकरणे. १६फेब्रुवारी २०२१, प्रारुप मतदार यादीवरहरकती व सूचन दाखल १६ फेब्रुवारी २०२१ ते करण्याचा कालावधी२३ फेब्रुवारी २०२१, प्रभागनिहाय अंतिममतदार यादी प्रसिध्दकरणे ३ मार्च २०२१, मतदान केंद्रांची यादी प्रसिध्दकरणे. ८ मार्च २०२१ अंतिम प्रभागनिहाय वमतदान केंद्रनिहाय मतदार १२ मार्च २०२१ याद्या अधिप्रमाणित करुनप्रसिध्द करणे.असा कार्यक्रम आहे.