Friday, September 20, 2024
Home ताज्या गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ठरली वादळी ,इतिवृत्त वाचलेच गेले नाही

गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ठरली वादळी ,इतिवृत्त वाचलेच गेले नाही

गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ठरली वादळी ,इतिवृत्त वाचलेच गेले नाही

कोल्हापूर/प्रतिनिधी :  गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा परंपरेप्रमाणे वादळी ठरली. मागील वर्षाच्या सभेचे इतिवृत्त वाचतानाच विरोधकांनी आक्षेप घेतला. जी सभा झालीच नाही त्याचं इतिवृत्त कसलं? असा सवाल केला. तर सत्ताधाऱ्यांनी यानंतर काहीच मिनिटात सभा गुंडाळली.गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज महालक्ष्मी खाद्य कारखान्याच्या आवारात पार पडली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सभा वादळी होणार हे स्पष्ट होते. सकाळी आठ वाजल्यापासूनच सभासद सभास्थळी दाखल होत होते.दुपारी एक वाजता संचालक मंडळ व्यासपीठावर आल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. यानंतर विषय वाचन सुरु झाल्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त वाचण्यात सुरुवात झाली आणि विरोधकांनी गोंधळ घातला. मागील वर्षी सभा झाली नाही त्याचं इतिवृत्त कसलं असा सवाल विरोधकांनी केला.याच गोंधळात सभा घेण्यात आली. संचालक रणजीत पाटील यांनी सर्वांचे आभार मानून सभा संपली असे जाहीर केले. ही सभा गुंडालळी असा आरोप विरोधकांनी केला.तर सभा व्यवस्थित झाली असा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. सर्व सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. मात्र, विरोधकांच्या गोंधळामुळे हे करता आले नसल्याचे सभेचे अध्यक्ष अरुण नरके यांनी सांगितले. निवडणुकीमुळे सभा वादळी होणार हे निश्चित होते आणि तसे बोलले जात होते आणि घडले ही तसेच.मात्र,यंदा खुर्चा बांधून ठेवल्याने हाणामारी न होता फक्त गोंधळामध्येच ही सभा गुंडाळण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे “यामिनी” प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे "यामिनी" प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित कोल्हापूर/प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी...

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली इराणी खणीमध्ये सार्वजनिक मंडळाच्या १०३५ व घरगुती व मंडळांच्या लहान ११०१ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन कोल्हापूर/प्रतिनिधी :...

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न जयसिंगपूर/प्रतिनिधी : श्री.सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेची रौप्य महोत्सवी सभा सोसायटीच्या प्रांगणात १५ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभेचे...

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ भक्त कोल्हापूर शहर व जिल्हा या़ंचेवतीने ज्ञानेश महाराव या इसमाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावर...

Recent Comments