Tuesday, July 23, 2024
Home ताज्या कृषी कायद्याबाबत चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार,महाविकास आघाडी सरकारने पुकारलेले भारत बंदचे...

कृषी कायद्याबाबत चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार,महाविकास आघाडी सरकारने पुकारलेले भारत बंदचे आंदोलन अयशस्वी ठरले – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

कृषी कायद्याबाबत चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार,महाविकास आघाडी सरकारने पुकारलेले भारत बंदचे आंदोलन अयशस्वी ठरले – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

कोल्हापूर/प्रतिनिधी : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ ही मोठी आहे ज्या लोकांनी ही चळवळ मोठी केली त्यातील काही कार्यकर्त्यांचे कोरोनाच्या कालावधीत निधन झाले त्यांना माझी आदरांजली असून आता कोणाचा काळ कमी झालेला आहे मात्र महाराष्ट्र हा कोरणा च्या बाबतीत एक नंबर वर आहे मुख्यमंत्र्यांनी चांगले प्रयत्न केले मात्र तरीही महाराष्ट्रात कोणाचे आकडेवारी सर्वाधिक असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मी जगभरात कोरोनाचा गो कोरोनाचा नारा होता याला चांगला प्रतिसाद मिळाला मलाही कोरोना झाला मात्र कोरोना माझ्यापाशी जास्त काळ टिकला नाही कोरोनाला माझा राग आला असावा असे उदगार त्यांनी काढले.
या कोरोनातून मी बारा झालेलो आहे या कोणाच्या कालावधीत ज्या ज्या लोकांनी गोरगरिबांना मदतीचा हात दिला त्या सर्वांचे आठवले यांनी आभार मानले भारत सरकारने आत्मनिर्भर भारतची घोषणा केली आहे त्यातून शेतकऱ्यांसाठी काही मदत केलेली आहे.
केंद्र सरकारने केलेल्या शेतकऱ्यांच्या कायद्याविरोधात शेतकऱ्याने जे काय आंदोलन पुकारले आहे ते आंदोलन अयशस्वी झाले आहे शेतकऱ्यांचा या आंदोलनाला विरोध असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात उतरले नसल्याचे आठवले यांनी सांगितले शिवाय केंद्रसरकार चर्चेला तयार आहे चर्चा करून यातून मार्ग काढणे आवश्यक आहे पूर्ण कायदा रद्द करणे हे चुकीचे आहे त्यामध्ये बदल करावा अशी मागणी केली असती तर चर्चा करून यावर निर्णय घेता आला असता असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण याबाबत माझा पाठिंबा आहे २०२१ ची जनगणना ही जात निहाय होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. आरक्षण हे जातीच्या आधारावर असणे आवश्यक आहे भटक्या-विमुक्तांना ही वेगळे आरक्षण देण्याची मागणी मी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments