Wednesday, September 11, 2024
Home ताज्या जम्बो कोव्हिड केंद्र सुविधेतंर्गत गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात ऑक्सिजन जनरेटर कार्यान्वित संभाव्य दुसऱ्या...

जम्बो कोव्हिड केंद्र सुविधेतंर्गत गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात ऑक्सिजन जनरेटर कार्यान्वित संभाव्य दुसऱ्या लाटेसाठी होणार फायदा

जम्बो कोव्हिड केंद्र सुविधेतंर्गत गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात ऑक्सिजन जनरेटर कार्यान्वित संभाव्य दुसऱ्या लाटेसाठी होणार फायदा

कोल्हापूर, दि.८ डिसें बर (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी इतर जिल्ह्यांच्या जम्बो कोव्हिड केंद्र निर्मितीच्या आधीपासून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने जम्बो कोव्हिड केंद्रातील सुविधांवर भर दिला होता. या अंतर्गतच सीपीआर, आयजीएम नंतर संजय घोडावत विद्यापीठात ऑक्सिजन टँक बसवला होता. या सुविधेतंर्गतच आज गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयात प्रतिदिन साधारणपणे १५० नग जम्बो सिलेंडर ऑक्सिजन उत्पादन करणारा ऑक्सिजन जनरेटर बसवण्यात आला आहे. कोरोनाची संभाव्य दुसरी लाट आल्यास निश्चितच याचाफायदा होणार आहे.
जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहून रूग्णांसाठी तात्काळ सोय उपलब्ध व्हावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी युध्दपातळीवर निर्णय घेवून जिल्हा नियोजन समितीमधून ऑक्सिजन जनरेटर खरेदी करण्यास  मंजुरी दिली होती. गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयात ऑक्सिजन उत्पादन करणारे ऑक्सिजन जनरेटर तातडीने बसविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यांत्रिकी मंडळाचे अधीक्षक अभियंता विलास गायकवाड यांना दिल्या होत्या.
ऑक्सिजन जनरेटर प्रती दिन साधारणपणे १५०/१२५ नग जम्बो सिलेंडर इतक्या साधारणपणे १०५० एम ३ लिटर प्रती दिवस ऑक्सिजन उत्पादन होईल, अशा ऑक्सिजन जनरेटर मशिनरीसाठी निविदा काढून पुणे स्थित कंत्राटदारास ई निविदेव्दारे काम वर्ग करण्यात आले.
या कामासाठी ऑक्झायर, चेन्नई या कंपनीने तयार केलेले १५० जम्बो सिलेंडर (१०५० एम ३) क्षमतेचे ऑक्सिजन उत्पादन प्रती दिवस करणारे उपकरण तयार करून २३ नोव्हेंबर रोजी उपजिल्हा रूग्णालय, गडहिंग्लज येथे पुरवठा करण्यात आले.
उपकरणाची उभारणी व कार्यान्वितीकरण पूर्ण करण्यात आले असून दि. ४ डिसेंबर रोजी अधीक्षक अभियंता यांत्रिकी मंडळ, कार्यकारी अभियंता यांत्रिकी विभाग व संबंधित कंत्राटदार त्यांची तांत्रिक टिम व उपजिल्हा रूग्णालय येथील संबंधित वैद्यकीय अधिकारी व त्यांचे सहकारी यांच्या समवेत कंपनीच्या तांत्रिक टिमने या उपकरणांची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. तसेच या उपकरणाव्दारे उत्पादित करण्यात आलेला ऑक्सिजन सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या उपजिल्हा रूग्णालयाच्या ऑक्सिजन पाईप लाईनशी यशस्वीरित्या जोडणी करण्यात आला.
ऑक्सिजन जनरेटर १५० जम्बो सिलेंडर (१०५० एम ३) क्षमता प्रती दिवस ऑक्सिजन उत्पादित करणारे उपकरण निर्मिती करणे, उभारणी, कार्यान्वितीकरण, चाचणी घेणे यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) विलास गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) सुभाष बागेवाडी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळे, कंत्राटदार संजय आडगावकर, डॉ. चंद्रकांत खोत, ऑक्झायर कंपनी व जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहकारी यांनी विशेष परिश्रम घेवून काम पूर्णत्वास नेले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा – ॲड.उज्वल निकम

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा - ॲड.उज्वल निकम घोडावत विद्यापीठात 'लाॅ' विभागाचे उदघाटन अतिग्रे/प्रतिनिधी : कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वाचन आणि कष्टाने कायद्याची...

Recent Comments