Sunday, October 27, 2024
Home ताज्या ध्वजदिन निधी संकलनाला मदत करुन सैनिकांप्रती खारीचा वाटा उचलावा -अपर जिल्हाधिकारी किशोर...

ध्वजदिन निधी संकलनाला मदत करुन सैनिकांप्रती खारीचा वाटा उचलावा -अपर जिल्हाधिकारी किशोर पवार

ध्वजदिन निधी संकलनाला मदत करुन सैनिकांप्रती खारीचा वाटा उचलावा
-अपर जिल्हाधिकारी किशोर पवार

कोल्हापूर/(जिल्हा माहिती कार्यालय): देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी हजारो शूर विरांनी प्राणांची आहुती दिली आहे. त्यांची परतफेड कोणत्याही स्वरुपात करु शकत नाही. परंतु, सशस्त्र सेना ध्वजदिन ७ डिसेंबरला साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने निधी संकलनास हातभार लावून खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शिवाजी पवार, संयोजक चंद्रशेखर पांगे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करुन झाली. स्वागत प्रास्ताविकात श्री.पवार यांनी करुन निधी संकलनाबाबत माहिती दिली ते म्हणाले, ७ डिसेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत हा निधी गोळा केला जातो. या निधीतून शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या अडी-अडचणी दूर केल्या जातात. युध्दात किंवा युध्दजन्य परिस्थितीत अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून सेवा निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जातो. गतवर्षी 1 कोटी ६० लाख ७९ हजार इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. कोरोना संक्रमणामुळे उद्भवलेल्या आपत्तीजनक स्थितीतही नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे 90 लाखाचे उद्दिष्ट साध्य केले आहे.
अपर जिल्हाधिकारी श्री. पवार म्हणाले, युध्दभूमीवर तसेच अतिरेक्यांच्या भ्याड कारवायांमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वत:च्या प्राणांची आहुती देणाऱ्या योध्यांच्या बलिदानाची आपण कोणत्याही स्वरुपात परतफेड करु शकत नाही. परंतु,  त्यांचे कुटुंबीय, अवलंबितांचे पुनर्वसन करुन अंशत: का होईना परतफेड करु शकतो. गतवर्षी चा अनुशेष आणि चालू वर्षाचे उद्दिष्ट जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी मदत करुन पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले. शेवटी श्री. पांगे यांनी सर्वाचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे...

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना ‘वेल्डींग, सीएनसी कोर्स’ व ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना 'वेल्डींग, सीएनसी कोर्स' व 'अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या' प्रशिक्षणाची सुवर्णसंधी शिरोली एमआयडीसी/प्रतिनिधी : केंद्रशासना मार्फत व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी...

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

Recent Comments