Friday, September 20, 2024
Home ताज्या भारतीय अर्थव्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था हिंदू पंचांगांवर अवलंबूनअसल्याने पंचांगाचे महत्त्व‘ यावच्चंद्रदिवाकरौ’ राहिल...

भारतीय अर्थव्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था हिंदू पंचांगांवर अवलंबूनअसल्याने पंचांगाचे महत्त्व‘ यावच्चंद्रदिवाकरौ’ राहिल -पंचागकर्ते श्री. मोहन दाते

भारतीय अर्थव्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था हिंदू पंचांगांवर अवलंबूनअसल्याने पंचांगाचे महत्त्व‘ यावच्चंद्रदिवाकरौ’ राहिल -पंचागकर्ते श्री. मोहन दाते

कोल्हापूर/प्रतिनिधी : हिंदूंची कालगणना लाखो वर्षे जुनी असून ती सूर्य-चंद्रयांच्या गतीवर आधरित आहे. तशीच ती निसर्गचक्र आणि ऋतूचक्र यांना अनुकूल आहे. त्यामुळे दरवर्षी सण, ऋतू, व्रते आदी दिवस पालटत नाही; मात्र अन्य पंथीयांची दोन-चार हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेली कालगणना सदोष आहेत. आजही लोक इंग्रजी कॅलेंडर दिनांक पाहण्यासाठी नव्हे ,तर त्या त्या दिवशी असलेली तिथी, नक्षत्र, मुहूर्त, एकादशी, प्रदोष, सण, व्रते आदी सर्व पाहण्यासाठी ते विकत घेतात. भारताची अर्थव्यवस्था ही सण-उत्सवांवरअवलंबून आहे. त्यानुसार खरेदी-विक्री होते. व्यापारात उलाढाल होते. हे सर्व हिंदु पंचांगामुळे होते. त्यामुळे पंचांगाचे महत्त्व येणार्‍या काळात ‘यावच्चंद्रदिवाकरौ’ राहिल, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध पंचांगकर्ते श्री. मोहन धुंडिराज दाते यांनी केले. सनातन संस्थेने अनेक वर्षे गुडीपाडव्यालाच नवीन वर्ष साजरे करण्याचे महत्त्व बिंवबल्यामुळे आज युवा पिढी १ जानेवारीच्या जागी गुडीपाडव्याला मोठ्या प्रमाणावर स्वागत यात्रा काढून नवे वर्ष साजरे करत आहे, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘हिंदू कालगणना आणि सनातन पंचाग यांची विशेषता’ या ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी सनातन संस्था निर्मित मराठी, कन्नड, गुजराती, तेलगू आणि इंग्रजी भाषेतील ‘सनातन पंचांग २०२१’च्या अँड्रॉईड अ‍ॅपचे उद्घाटन करण्यात आले. मराठी भाषेतील अ‍ॅपचे प्रसिद्ध पंचागकर्ते श्री. मोहनदाते यांच्या हस्ते; कन्नड भाषेतील अ‍ॅपचे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते; गुजराती भाषेतील अ‍ॅपचे पटना (बिहार) येथील वर्ल्ड एस्ट्रो फेडरेशनचे प्रा. आचार्य अशोककुमार मिश्र यांच्या हस्ते; तेलगू भाषेतील अ‍ॅपचे ओडिशा येथील सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षक श्री. अरुणकुमार उपाध्याय यांच्या हस्ते; तर इंग्रजी भाषेतील अ‍ॅपचे लोकार्पण नेपाळ येथील विश्‍व ज्योतिष महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. लोकराज पौडेल यांच्या हस्ते करण्यात आले. काही दिवसांपूर्वी हिंदी भाषेतील पंचांगाचे उद्घाटन मध्यप्रदेश येथील श्री गुप्तेश्‍वर धामचे पीठाधीश्‍वर डॉ. मुकुंददास महाराज यांच्या हस्ते करण्यात आले होते.
अँड्रॉईड आणि आयओएस प्रणालीवर असणारी सर्व ‘सनातन पंचांग २०२१’अ‍ॅप https://sanatanpanchang.com/download-apps/ या लिंकवरून डाऊनलोड करावीत,असे आवाहन सनातन संस्थेने केले आहे. हाकार्यक्रम फेसबूक आणि यू-ट्यूब यांच्या माध्यमांतून ३६,०२७ लोकांनी प्रत्यक्ष पाहिला, तर १,३४,९४९लोकांपर्यंत पोहोचला.
या वेळी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी सांगितले की, ‘हिंदुपंचांग’हे हिंदु धर्म आणि संस्कृती यांचा पाया आहे. आपण इंग्रज आणि मोगल यांना या देशातून पळवून लावले;मात्र त्यानंतर आलेल्या राज्यकर्त्यांनी महान हिंदू कालगणनेची उपेक्षा करून इंग्रजी कालगणनेला दिली. ही एक प्रकारे पाश्‍चात्त्यांची सांस्कृतिक गुलामगिरी स्वीकारून देशाची मोठी हानी केली आहे. या गुलामगिरीतून जनतेला बाहेर काढून त्यांच्यात हिंदु धर्म, संस्कृती, भाषा, राष्ट्र आदींविषयी स्वाभिमान अन् प्रेम निर्माण करण्यासाठी सनातन संस्थेचे वर्ष २००५ पासून ‘सनातन पंचांग’चालू केले आहे. या निमित्ताने आपण सर्वांनी निश्‍चय करूया की, आपण स्वतःचा वाढदिवस आणि नवीन वर्ष हे तिथीनुसार साजरे करणार. या वेळी अन्य मान्यवर वक्त्यांनी हिंदु कालगणना आणि पंचांग यांचे जीवनातील महत्त्व बिंबवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे “यामिनी” प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे "यामिनी" प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित कोल्हापूर/प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी...

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली इराणी खणीमध्ये सार्वजनिक मंडळाच्या १०३५ व घरगुती व मंडळांच्या लहान ११०१ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन कोल्हापूर/प्रतिनिधी :...

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न जयसिंगपूर/प्रतिनिधी : श्री.सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेची रौप्य महोत्सवी सभा सोसायटीच्या प्रांगणात १५ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभेचे...

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ भक्त कोल्हापूर शहर व जिल्हा या़ंचेवतीने ज्ञानेश महाराव या इसमाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावर...

Recent Comments