Sunday, October 27, 2024
Home ताज्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील वीर शहिदांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील वीर शहिदांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील वीर शहिदांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

मुंबई/प्रतिनिधी : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी नागरिकांचं रक्षण करताना शहिद झालेल्या मुंबई पोलिस, एनएसजी, गृहरक्षक तसंच अन्य सुरक्षा दलातील अधिकारी, जवानांच्या शौर्य व त्यागाचे स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहिली आहे. या हल्ल्यावेळी प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांनाही उपमुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
मुंबईवरील दहशतवादी हल्यातील शहिद वीरांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुंबईवरील हल्ल्यावेळी मुंबई पोलिस व सुरक्षा दलांनी केलेला दहशतवाद्यांचा मुकाबला हा गौरवशाली इतिहास आहे. त्या हल्ल्यावेळी मुंबईच्या रक्षणासाठी पोलिस दलातील प्रत्येक अधिकारी, जवान स्वयंप्रेरणेने रस्त्यावर उतरला. प्राणांची पर्वा न करता कर्तव्यनिष्ठेने दहशतवाद्यांचा मुकाबला केला. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्यासारख्या वीराने शरीरावर गोळ्या झेलून अजमल कसाबसारखा आत्मघातकी पथकातील दहशतवादी जिवंत पकडून दिला. मुंबई पोलिसांच्या या पराक्रमाला जगाच्या इतिहासात तोड नाही. मुंबई पोलिसांनी देशाच्या रक्षणासाठी बजावलेलं कर्तव्य, केलेला सर्वोच्च त्याग देशवासियांच्या कायम स्मरणात राहील. मुंबई पोलिसांचं हौतात्म्य सर्वांना देशसेवेची, कर्तव्याची जाणीव करुन देईल.
नागरिकांच्या मनातील पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ करील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.दहशतवादी हल्ल्यावेळी मुंबई पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून लढताना भारतीय सैन्यदल, राष्ट्रीय सुरक्षा दल, गृहरक्षक दल, अग्निशमन दल, भारतीय रेल्वे, आरोग्य सेवेचे डॉक्टर-कर्मचारी, रेल्वेचे अधिकारी-कर्मचारी, हॉटेल ताज व ट्रायडंट हॉटेलचे अधिकारी-कर्मचारी यांच्यासह शहरातील नागरिकांनीही एकजुटता, देशभक्ती, साहस, मानवतेचे अलौकिक दर्शन घडवले.
या सर्वांच्या त्याग, कर्तव्यनिष्ठेबद्दलही उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.दहशतवादी हल्यातील शहिद पोलिस वीरांना श्रद्धांजली वाहत असताना मुंबई पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी बांधवांनी शहरासाठी सातत्याने केलेला त्याग तसंच ‘कोरोना’ संकटकाळात बजावलेल्या कामगिरीचंही उपमुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं आहे. ‘कोरोना’शी लढताना प्राण गमावलेल्या पोलिस बांधवांनाही त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहिद वीरांना श्रद्धांजली वाहत असताना यापुढच्या काळात शहराचं पोलिस दल आधुनिक शस्त्रास्त्र, संपर्क यंत्रणा तसंच शारिरिक व मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम असेल. मुंबई पोलिसांचं मनोबल सदैव उंच राहील. जगातील सर्वोत्कृष्ट पोलिल दल ही प्रतिमा अधिक ठळक होईल, यासाठी शासन व नागरिकांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे...

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना ‘वेल्डींग, सीएनसी कोर्स’ व ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना 'वेल्डींग, सीएनसी कोर्स' व 'अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या' प्रशिक्षणाची सुवर्णसंधी शिरोली एमआयडीसी/प्रतिनिधी : केंद्रशासना मार्फत व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी...

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

Recent Comments