गांधी भवन येथे अहमद पटेल यांना आदरांजली
मुंबई/प्रतिनिधी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्यसभा सदस्य अहमद पटेल यांना आज गांधी भवन येथे आदरांजली अर्पण करण्यात आली. प्रांताध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर हे यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने पटेल यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गांधी भवन येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अहमद पटेल यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, सरचिटणीस मा. आ. मोहन जोशी, सचिव राजाराम देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.