गोकुळच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सत्कार
कोल्हापूर/प्रतिनिधी : प्रतिकूल परिस्थितीत काम करुन गोकुळला यशाच्या शिखरावर पोहचविण्यात मोलाचा वाटा असणारे कर्मचारी संघाच्या सेवेतुन निवृत्त होत आहेत. याची मनाला खंत वाटत आहे. तथापि संघ नियमानुसार कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर सर्वांनाच सेवानिवृत्त व्हावे लागते. अशा कर्मचा-यांच्या कष्टाची जाणीव गोकुळ नेहमीच ठेवेल असे प्रतिपादन माजी चेअरमन व जेष्ठ संचालक मा.श्री. अरूण नरकेसाहेब यांनी गोकुळच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या सत्कार प्रसंगी केले. सदरचा कार्यक्रम गोकुळ दूध प्रकल्प कार्यस्थळावरील स्व.आनंदराव पाटील-चुयेकर. यांच्या स्मारकाजवळ आयोजित करण्यात आला होता. पुढे बोलताना श्री.नरकेसो म्हणाले या कर्मचा-यांनी गोकुळसाठी सुरुवातीच्या काळात अल्प पगारावर कष्टाचे काम केलेले असून. कर्मचा-यांच्या सेवेचा जरी समारोप झाला असला तरी त्यांनी पुढील आयुष्यामध्ये जास्तीत जास्त वेळ आपल्या परिवारासाठी द्यावा व प्रामाणिकपणे समाधानी जीवन जगावे असे सांगून या सर्वांना दिर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.
सेवानिवृत्त कर्मचा-यांमध्ये ३२ जणांचा समावेश आहे. त्यांचा माजी चेअरमन व जेष्ठ संचालक मा.श्री.अरूण नरकेसाहेब व उपस्थित संचालकांच्या हस्ते गोकुळच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी चेअरमन व जेष्ठ संचालक मा.श्री.रणजितसिंह पाटील, श्री. विश्वास पाटील(आबाजी), श्री.अरूण डोंगळे, जेष्ठ संचालक श्री.विश्वास जाधव, संचालक श्री.धैर्यशील देसार्इ, श्री.दिपक पाटील, श्री.पी.डी.धुंदरे, श्री.उदय पाटील, श्री.बाळासो खाडे,श्री.विजय तथा बाबा देसाई, श्री.रामराज कुपेकर-देसाई, संचालिका श्रीमती जयश्री पाटील-चुयेकर(माई),सौ.अनुराधा पाटील (वहिणी),कार्यकारी संचालक श्री.डि.व्ही.घाणेकर, बोर्ड सेक्रटरी श्री.एस.एम. पाटील, व्यवस्थापक प्रशासन श्री. डी.के.पाटील व सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते