सेनापती कापशी येथील विविध विकास कामांचा शुभारंभ,नविद मुश्रीफ यांचा शेतकऱ्यांनी आभार मानून केला सत्कार
सेनापती कापशी/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या प्रयत्नातून सेनापती कापशी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ साहेबांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी नायकवाडे मळा पाणंद व आवटे पाणंद १६ लाख, नाईक पाणंद १० लाख, माळी पाणंद १०लाख अशा विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी येथील शेतकऱ्यांनी नविद मुश्रीफ यांचे आभार मानून सत्कार केला.
यावेळी कापशी खोऱ्याचे नेते शशिकांत खोत, दीपक सोनार, राजूकाका भोसले, सूर्यकांत भोसले, सुनील चौगुले, राजेंद्र माळी, प्रवीण नायकवडी, जयसिंग कुंभार व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.