घर बांधण्याचे स्वप्न राहिले अधुरे निगवे खालसा येथील संग्राम पाटील यास आले वीरमरण,गावावर शोककळा,रविवारी अंत्यसंस्कार
कोल्हापूर/प्रतिनिधी : मागील आठवड्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील एका जवानाला सीमेवर वीरमरण प्राप्त झाले होते. त्यानंतर आज कोल्हापुरातील आणखी एक सुपुत्र सीमेवर हुतात्मा याला वीरमरण आले आहे. संग्राम शिवाजी पाटील (३७) असे या जवानाचे नाव असून, करवीर तालुक्यातील निगवे-खालसा गावचे ते रहिवासी होते. आज पहाटे काश्मीरच्या राजौरीमध्ये पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यांनी केलेल्या हल्ल्यात संग्राम यांना वीरमरण आले.हुतात्मा पाटील हे आपले काम आटोपून रात्री २ वाजता कवाटर्सकडे जात असताना ८१ एमएम मोटर सर्च हल्ल्यात पाटील हे शहीद झाले आहेत.
संग्राम पाटील हे २००२ साली बटालियन मधून भरती झाले होते.बेळगाव येथे प्रशिक्षण घेऊन १८ वर्षे त्यांनी देशसेवा बजावली होती.बारावीचे शिक्षण पूर्ण करून वयाच्या १८ व्या वर्षी दे १७ वर्षे करार बॉण्ड केलेली नोकरी २०१९ मध्ये संपलेली आहे.तरीही गावाकडे कामधंदा न करता देश सेवेसाठी पुन्हा सैन्यात हवालदार म्हणून काम सुरू केले होते.
नुकतेच पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरातल्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावातले ऋषिकेश जोंधळे हे जवान शहीद झाले होते. त्यांनतर लगेचच संग्राम पाटील हे जवान शहीद झाल्याची माहिती मिळताच संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
संग्राम पाटील सैन्यदलात हवालदार पदावर कार्यरत होते. त्यांच्या पाठिमागे आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. एकाच महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील जवान हुतात्मा झाल्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
संग्राम पाटील यांची कुटुंबियांशी शेवटची भेट फेब्रुवारी महिन्यात झाली होती. त्यानंतर ते ड्युटीवर गेले होते. त्यानंतर ते परतले नव्हते. पुढच्या महिन्यात ते आपल्या गावी परतणार होते. याबाबत त्यांनी गावातील मित्रांना आणि भावांना फोनवरून माहिती दिली होती. मात्र पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात त्यांना वीरमरण आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
संग्राम ने आपले गावाकडील घर बांधण्यासाठीचे स्वप्न पाहिले होते ते त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले.येत्या रविवारी त्याच्यावर ग्राम पंचायत क्रीडांगणावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.