Friday, December 13, 2024
Home ताज्या आ.ऋतुराज पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य देऊया : खासदार शाहू महाराज

आ.ऋतुराज पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य देऊया : खासदार शाहू महाराज

आ.ऋतुराज पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य देऊया : खासदार शाहू महाराज

कोल्हापूर/प्रतिनिधी : आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदार संघात अतिशय चांगले काम करून आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवली आहे. मतदारसंघाचा विकास आणखी गतीने होण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांना रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य देऊन विजयी करुया असे आवाहन खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केले. आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गोकुळ शिरगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते . यावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाहू महाराज पुढे म्हणाले, ऋतुराज पाटील यांचे काम मी पाच वर्षे जवळून पाहिले आहे. जनहिताच्या अनेक योजना त्यांनी मतदारसंघात यशस्वीपणे राबवल्या.मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना खासदार म्हणून आवश्यक ते सर्व सहकार्य करु.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल घाटगे म्हणाले, खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची संस्कृती असून विधायक काम करणा-यांना आमदार ऋतुराज पाटील यांना पाठबळ देऊया.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत म्हणाले, कणेरीवाडी पाणी योजना रद्द करण्याचे पत्र महाडिकांनी दिले होते. मात्र त्यावर ते काहीच बोलत नाहीत.
शिवसेना उपनेते संजय पवार म्हणाले, सुशिक्षित व सर्वांना सोबत घेऊन जाणा-या आमदार ऋतुराज पाटील यांना पुन्हा निवडून देऊया.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख अवधूत साळुंखे म्हणाले माझे कुटुंब माझी जबाबदारी ही घोषणा महाडिकांनी फारच मनावर घेतली आहे. सगळी पदे आपल्याच घरात पाहिजे असा त्यांचा हट्ट आहे. मुलाला आमदार करण्यासाठी पाहुण्यालाही कट्यावर बसवणाऱ्यांपासून सावध रहा.
आरपीआयच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रुपा वायदंडे, सरपंच चंद्रकांत डवरे आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र संघटक बबन शिंदे डॉ. विशाल पाटील प्रणोती भाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. अर्जुन इंगळे, के डी पाटील, उत्तम आंबवडे, निशीकांत पाटील, टी. के. पाटील, संभाजीराव पाटील, दयानंद शिंदे, डी. डी. पाटील, गणपती कागले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

चौकट
जनसेवेसाठी तत्पर ऋतुराजना साथ द्या – आ.सतेज पाटील

ऋतुराज पाटील यांची विकास कामांच्या माध्यमातून जनतेशी नाळ जोडली आहे. क्रीडांगण विकसित करण्यासाठी गायरान मधील जमीन मंजूर करून घेण्याचा निर्णय आ.ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्यातूनच झाला. सत्ता नसताना जिद्द, कष्ट आणि सचोटीने त्यांनी मोठा निधी आणला आहे. जनसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या ऋतुराज पाटील यांना साथ द्या असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मोफत आरोग्य शिबीरासह अल्पोपहार वाटपाचे आयोजन

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मोफत आरोग्य शिबीरासह अल्पोपहार वाटपाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. सौंदत्ती...

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री...

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश   अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी गुवाहाटी येथे आयोजित 'इंडिया इंटरनॅशनल सायन्स...

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा – हिंदु जनजागृती समिती

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा - हिंदु जनजागृती समिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारच्या कार्यकाळात काश्मीरमध्ये हिंदूंवर जो अत्याचार...

Recent Comments