पूरस्थिती, कोरोना काळात लाटकर कुठं होते ? : सत्यजित उर्फ नाना कदम यांची लाटकर यांच्यावर टीका
राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ कदमवाडी परिसरात प्रचारफेरी
कोल्हापूर/प्रतिनिधी : फिल्मी स्टाईलने भाषण करून जनतेचे मनोरंजन करणारे कॉंग्रेसचे पुरस्कृत उमेदवार पूरस्थिती आणि कोरोना काळात कुठं होते. संकटसमयी जनतेला वाऱ्यावर सोडून कुठे लपले होते याचा खुलासा करावा. सामाजिक, विकासात्मक कामांच्या आधारावर अपेक्षित निवडणूक मुद्दामहून भावनिक केली जात आहे. पण, विरोधकांच्या हा डाव जनतेने वेळीच ओळखला असून, संकटसमयी कुटुंबप्रमुखाप्रमाणे जनतेच्या पाठीशी उभे राहणाऱ्या राजेश क्षीरसागर यांना लाखोंचे मताधिक्य देतील, असा विश्वास माजी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम यांनी व्यक्त केला. महायुती उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ कदमवाडी परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार फेरीस महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला.ते पुढे म्हणाले कि, राजेश क्षीरसागर हे देखील सर्वसामान्य कार्यकर्तेच आहेत. टोल, एल.बी.टी. थेट पाईपलाईन असे अनेक प्रश्न क्षीरसागर यांच्या पुढाकारानेच मार्गी लागले आहेत. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांची जाणीव त्यांना आहे कारण ते सदैव जनतेमध्येच आणि जनतेसाठीच उपलब्ध असतात. पण, विरोधकांकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने त्यांनी सामान्य कार्यकर्त्याचे कार्ड बाहेर काढले आहे. अशा या फसव्या प्रचारास जनता बळी पडणार नाही. राजेश क्षीरसागर यांच्या कामाची तुलना अशक्य आहे. कोरोनामध्ये गोरगरीब आणि सामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाच्या मदतीसह प्रशासनावर नियंत्रण ठेवून रुग्णसेवेची भूमिका चोखपणे बजावली. पूरस्थितीत बाधित नागरिकांना मदत मिळवून देण्यापासून स्वत: मदतीसाठी पाण्यात उतरून सामान्य कार्यकर्ता कसा असावा याचे उदाहरण दिले. लोकप्रतिनिधी म्हणून आवश्यक असणारे सर्व गुण राजेश क्षीरसागर यांच्या असल्याने त्यांची लोकप्रियता अखंड वाढत आहे. परंतु, विरोधक कॉंग्रेस पुरस्कृत उमेदवार पूरस्थिती, कोरोनात समाजकार्यात होते काय? हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्ता असलेल्या राजेश क्षीरसागर यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.यावेळी माजी नगरसेवक मारुती माने, वैभव माने, स्वरूप कदम, विनय वाणी, यशवंत उर्फ बंडा माने, अनमोल तोरस्कर, बापू खोत, कुणाल क्षीरसागर, संग्राम दुर्गुळे, प्रसन्न माने, अक्षय कुंभार आदी उपस्थित होते.