Friday, December 13, 2024
Home ताज्या निवडणूक जनतेनेच हातात घेतल्यामुळे विजय निश्चित - पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

निवडणूक जनतेनेच हातात घेतल्यामुळे विजय निश्चित – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

निवडणूक जनतेनेच हातात घेतल्यामुळे विजय निश्चित – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

जनता जनार्दनासह अबाल वृद्ध व माता-भगिनींचा उठाव मोठा

नानीबाई चिखलीत प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नानीबाई चिखली/प्रतिनिधी : या निवडणुकीत माझ्या समर्थनार्थ जनता जनार्दनाचा उठाव मोठा आहे. ही निवडणूक जनतेनेच हातात घेतल्यामुळे ऐतिहासिक आणि क्रांतिकारी मताधिक्याने आपला विजय होईल, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. जनता जनार्दन व अबाल -वृद्धांसह विशेषता: माता- भगिनी माझ्या विजयासाठी अग्रभागी सरसावल्या आहेत, असेही ते म्हणाले.नानीबाई चिखली ता. कागल येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अरुण भोसले होते.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, जनतेने दिलेली आमदारकी आणि मंत्रिपदाची सत्ता ही गोरगरिबांच्या कल्याणासाठीच वापरली. त्यामुळेच राजसत्ता गोरगरिबांच्या चुलीपर्यंत देण्याचे भाग्य मला मिळाले. मला खात्री आहे की, गेल्या पाच निवडणुकांप्रमाणे सहाव्या निवडणूकीतही ऐतिहासिक मतांच्या फरकाने जनता मला निवडून आणील.गेल्या ३०-३५ वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासात अनेक अडथळे संकट आली गोरगरीब दिन दलित वंचित उपेक्षित लोकांसाठी काम करत असताना तुमच्या पाठबळामुळेच घडत गेलो, आणि ही वाट तुडवत चालत राहिलो.

हा शाश्वत विकास नव्हे काय…?

गेल्या चार-पाच वर्षाच्या कालावधीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी ७ हजार कोटी रुपयांचा निधी आणला आहे. या निधीतून रस्ते, सांस्कृतिक सभागृह, शाळा, अंगणवाडी इमारत, आरोग्य केंद्र, पाझर तलाव, गावातील अंतर्गत रस्ते, गटरी, पाणीपुरवठा योजना अशी एक ना अनेक कामे आपल्यासमोर आहेत. हा शाश्वत विकास नव्हे काय ? असा सवाल गोकुळचे संचालक अमरीश घाटगे यांनी उपस्थित केला.

संकटग्रस्तांचा पाठीराखा

भाषणात बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक प्रवीणसिंह भोसले म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ म्हणजे जनतेच्या अडीअडचणी आणि संकटात धावून जाणारा नेता नव्हे तर कार्यकर्ता आहेत. दरवर्षी येणाऱ्या महापुरात मंत्री हसन मुश्रीफ कमरेहून अधिक उंच पाण्यातून, कधी जेसीबीतून तर कधी ट्रॅक्टर- ट्रॉलीतून पूरग्रस्तांपर्यंत पोहोचले आणि त्यांची चूल पेटवली. खरंतर मंत्री हसन मुश्रीफ म्हणजे संकटग्रस्तांचा पाठीराखाच आहेत.
प्रवीणसिंह भोसले म्हणाले, गावेच्या गावे महापुरात बुडालेली असताना मंत्री हसन मुश्रीफ सोडून कोणीही इकडे फिरकले सुद्धा नाहीत. जनतेला केंद्रस्थानी मानून तळागाळापर्यंत विकास करण्याची धमक फक्त मंत्री मुश्रीफांमध्येच आहे.
स्वागत सदाशिव दुकान यांनी केले. व्यासपीठावर अरुण भोसले माजी जिल्हा परिषद सदस्य शिवानी भोसले, हमिदवाडा कारखाना संचालिका मंगल तुकान, प्रकाश वाडकर, अनिल गुरव, सुरेश गळतगे, स्वप्निल जाधव यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मोफत आरोग्य शिबीरासह अल्पोपहार वाटपाचे आयोजन

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मोफत आरोग्य शिबीरासह अल्पोपहार वाटपाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. सौंदत्ती...

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री...

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश   अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी गुवाहाटी येथे आयोजित 'इंडिया इंटरनॅशनल सायन्स...

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा – हिंदु जनजागृती समिती

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा - हिंदु जनजागृती समिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारच्या कार्यकाळात काश्मीरमध्ये हिंदूंवर जो अत्याचार...

Recent Comments