घोडावत विद्यापीठात टेडेक्स (TEDx) उपक्रमाचे आयोजन
देश विदेशातील तज्ञांकडून मार्गदर्शन
अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठात ११ नोव्हेंबरला विद्यार्थ्यांसाठी ‘आत्मविश्वास, नवचैतन्य आणि भविष्यातील संधी’ या विषयावर प्रेरणादायी टेडेक्स (TEDx) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कृत्रिम बुद्धिमत्ता कायदेविषयक तज्ञ साक्षर दुग्गल, ईवॉलविंग एक्स चे कार्यकारी व्यवस्थापक अमोल निटवे, सोशल सिंफनीचे संस्थापक नीरज वैद्य, रोबोटिक्स इंजिनीयर शौर्य भासिन, स्पेन देशातील पीपल संस्थेच्या संचालिका साथ्या ल्लूल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तज्ञांकडून विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील संधी, समाजातील बदल आणि तंत्रज्ञानाच्या प्रभाव, शाश्वत विकासाचे महत्व याविषयी मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील आव्हानांशी सामना करण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळणार आहे. या उपक्रमाचा उद्देशच विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना देणे, नवीन दृष्टिकोन विकसित करून प्रेरणा देणे हा आहे.
आधुनिक युगात नेतृत्व, नाविन्य आणि आव्हानांचा स्वीकार करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांना त्या दिशेने मार्गदर्शन करेल असे कुलगुरू,प्रो. उद्धव भोसले म्हणाले.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मास कम्युनिकेशन विभागातील प्रा.प्रियंका पाटील, प्रा.सुमित कदम, ग्लोबल सेलच्या अमृता हंदूर ,विद्यार्थिनी अनुराधा तिबिले व इतर विद्यार्थी प्रतिनिधी मेहनत घेत आहेत. यासाठी अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांचे मार्गदर्शन लाभले.