चाटे शिक्षण समुहाच्या कोल्हापूर विभागातील
३१ विद्यार्थ्यांना मेडिकल आणि ३२७ विद्यार्थ्यांना इंजिनिअरींगच्या विविध शाखांमध्ये प्रवेश
कोल्हापूर/प्रतिनिधी : देश व राज्य पातळीवरील विविध वैद्यकिय आणि अभियांत्रिकी (आयआयटी, एनआयटी, शासकीय अभियांत्रिकी व स्वायत्त कॉलेज) यामधील विविध शाखांमध्ये व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट, जेईई, एमएचटी-सीईटी, आदी स्पर्धा परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांचे प्रवेश नुकतेच निश्चित झाले आहेत. या निश्चित झालेल्या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी चाटे शिक्षण समुहाच्या कोल्हापूर विभागातील क्लासेस, कॉलेज व अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली असून समुहाच्या ३१ विद्यार्थ्यांना एमबीबीएस साठी तर ३२७ विद्यार्थ्यांना आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी, बीटस्, शासकीय अभियांत्रिकी व स्वायत्त कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे, असे समुहाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांनी सांगितले.मेडिकलसाठी प्रवेशप्राप्त आमचे काही विद्यार्थी पुढीलप्रमाणे – कचरे वैभवी, क्षिरसागर सानिका, पाटील तृप्ती, अत्किरे सलोनी, शेटे शिवकीरण, बैरागी सोनल, माने सिमरन, थोरात गायत्री, कांबळे साक्षी, घनवट साक्षी, प्रज्ञासागर विशाखा, कुलकर्णी आर्यन, दुबल वैष्णवी, जसूजा दिया, पाटील निकिता, पोवार श्रद्धा, लोंढे आदिती, राजमाने दिक्षा, निकम पायल, पाटील अवधूत.
आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी व शासकीय, स्वायत्त अभियांत्रिकीच्या विविध शाखांसाठी प्रवेशप्राप्त काही विद्यार्थी पुढीलप्रमाणे – कल्याणकर माही, व्हरांंबळे प्रदिप, म्हातो नीरज, नलवडे हर्षल, शिंदे आयुष, कदम सोहम, चव्हाण अंकित, कणकेकर नेहा, मांडवे स्वप्निल, कुंभार आराध्या, गोडसे ऐनेश, गायकवाड पियुष, मोरे सिद्धी, चौगुले सिद्धी, राजमाने धिरज, लंबे लौकीक.
चाटे शिक्षण समुहाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र चाटे व प्रा. गोपीचंद चाटे, संचालक प्रा. डॉ. भारत खराटे, सर्व शाखा व्यवस्थापक, प्राचार्य, समुहाचे पदाधिकारी, प्राध्यापकवृंद, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील शैक्षणिक भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.