श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा
कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून देत आहेत.त्या खूप पुढे गेल्या आहेत.महिलांकडे प्रचंड बुद्धी आहे त्या कर्तबगार व बुद्धिवान आहेत.त्यामुळेच त्या काहीही करू शकतात. रोटरी क्लब ऑफ गार्गिजच्या माजी अध्यक्षा श्रीमती कल्पना दिलीप घाटगे यांनी पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी गेली ३५ वर्षापासून सुपारीची गणेश पूजन करून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.त्यांचा मुलगा आणि सून यांनीही याचे स्वागत करून याच पद्धतीने गणेश पूजन सुपारीचे करत आहेत.
आपल्यातील आत्मविश्वास श्रीमती कल्पना दिलीप घाटगे यांनी समोर ठेऊन त्यांनी हे एक नवे पाऊल लग्नानंतर उचलले होते त्याला आता ३५ वर्षांचा कालावधी झालेला आहे.काळानुरूप त्यांनी स्वतःची एक नवी ओळख यातून सिद्ध करून दाखविली आहे.
त्या रोटरी क्लब आर्गीच्या २०२४ च्या प्रेसिडेंट आहेत. तर एस एन घाडगे अँड सन्सची डीलरशिप सांभाळत आहेत. एक महिला ही डीलरशिप सांभाळत आहे हे समाजाच्या दृष्टीने महिलांसाठी उत्तम उदाहरण आहे. ३५ वर्षापासून त्या त्यांच्या मुलासोबत उत्तमपणे ही डीलरशिप सांभाळत असून आज ७२ वर्ष असणाऱ्या कल्पना घाटगे यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकामुनिकेशन्सची उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबाद येथे पदवी घेतली आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना त्यांनी कंपनीत १९७४ साली ई सी आय एल कंपनीत त्यांनी नोकरी केली आहे. संगणक तयार करणारी ही कंपनी होती.नोकरी करत असताना सुरुवातीचा काळ त्यांनी हैदराबाद येथे घालविला आहे. त्यामुळे संगणक सुरू झाला त्यावेळी संगणकाची त्यांना माहिती नोकरीच्या निमित्ताने मिळाली. कोल्हापूरच्या के. आय. टी कॉलेजमध्येही सुरुवातीला त्यांनी विद्यार्थ्यांना इले्ट्रॉनिक्स आणि टेली कम्यूनिकेशन विषयावर मार्गदर्शन केले आहे. त्यांना विद्यार्थ्यांना शिकवायला खूप आवडते.
१९७६ ला लग्न झाल्यानंतर त्यांनी आपल्या स्वतःच्या घरी सुपारीच्या रूपात गणेशाची पूजा केली होती ती आज तागायत त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने परंपरा चालू ठेवलेली आहे.घरगुती गणेश विसर्जन दिवशी विधिवत पद्धतीने त्या बादलीमध्ये या सुपारी गणेशाचे विसर्जन करतात आणि नंतर झाडामध्ये सुपारी ठेवतात.माझ्या घरच्यांनी मला या गणेश पूजनाला कायमच सहकार्य केले आहे असे त्यांनी बोलून दाखविले आहे.सुपारी पुजना बरोबरच घरात गंगा गौरीचेही पूजन त्या करतात.पर्यावरणाचा विचार करून त्यांनी ३५ वर्षापूर्वी हे पाऊल उचलले होते त्याला त्यांचे सर्व कुटुंब सहकार्य करत आहेत. एक विधायक भावनेने घाटगे कुटुंब चालत असून त्यांचा हा विचार समाजाला दिशा देणारा असाच आहे.