Thursday, November 21, 2024
Home ताज्या ज्येष्ठ सिने व नाट्य अभिनेते मोहन जोशी यांना धनदायी जीवन गौरव पुरस्कार

ज्येष्ठ सिने व नाट्य अभिनेते मोहन जोशी यांना धनदायी जीवन गौरव पुरस्कार

ज्येष्ठ सिने व नाट्य अभिनेते मोहन जोशी यांना धनदायी जीवन गौरव पुरस्कार

कोल्हापूर / प्रतिनिधी : धनदायी नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त प्रख्यात ज्येष्ठ सिने व नाट्य अभिनेते मोहन जोशी यांना धनदायी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. करवीर पिठाचे जगद्गुरु श्री श्री विद्यानृसिंह भारती शंकराचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या बुधवारी १० एप्रिल २०२४ रोजी दुपारी ४.०० वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष ऍड.शिवराम जोशी (मुडशिंगीकर) आणि उपाध्यक्ष रामदास रेवणकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
खाजगी सावकारीकडून मध्यमवर्गीयांची आर्थिक पिळवणूक होऊ नये तसेच त्यांना त्वरित आणि सुलभ पद्धतीने आर्थिक मदत करता यावी, चार लोकांना रोजगार मिळावा या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली. आणि गेली २५ वर्षे या संस्थेची घोडदौड या उद्देशाने सुरू आहे. सन २००० पासून बिनविरोध निवडणुकीची परंपरा सुरू आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेसाठी योगदान दिलेल्या ज्येष्ठ सभासद व मान्यवरांचा सत्कार होणार असून मोहन जोशी यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे. त्यानंतर ‘ती’ या सुश्राव्य मराठी गीतांची मैफिल असे भरगच्च कार्यक्रम यावेळी होणार आहेत.
पत्रकार परिषदेस संचालक लता कदम, व्यवस्थापक संजय जमदग्नी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments