Thursday, November 21, 2024
Home ताज्या शाहू महाराजांसारखे अभ्यासू नेतृत्व दिल्लीला पाठविण्याची योग्य वेळ : युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

शाहू महाराजांसारखे अभ्यासू नेतृत्व दिल्लीला पाठविण्याची योग्य वेळ : युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

शाहू महाराजांसारखे अभ्यासू नेतृत्व दिल्लीला पाठविण्याची योग्य वेळ : युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : खासदार हे देशाचे प्रतिनिधित्व करत असतात. देशाच्या भवितव्याचे धोरणत्मक निर्णय तेथे होतात. जिल्ह्याचा विकासाला खऱ्या अर्थाने गती त्यांच्या माध्यमातून मिळत असते. मात्र चुकीची व्यक्ती लोकसभेवर निवडून गेली तर विकासाच्या, वैचारिक प्रगल्भतेबाबतीत आपला जिल्हा २० वर्षे मागे पडतो. शाहू छत्रपती महाराज हे अभ्यासू आहेत. जनतेच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. समाजात एकोपा राहावा यासाठी ते नेहमीच पुढे आले आहेत. संभाजीराजेंना दिल्लीतील सर्व कार्यपद्धती माहिती आहे. विकासकामे आणण्यात कोणतीच अडचण नाही. त्यामुळे कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी शाहू महाराजांसारखे अभ्यासू नेतृत्व दिल्लीला पाठविण्याची योग्य वेळ आली असल्याचे प्रतिपादन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे
इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांचा दक्षिण विधानसभा मतदारसंघातील
हणबरवाडी, इस्पुर्ली, नागाव, चुये, कावणे गावात प्रचार दौरा केला. यावेळी गावातील विविध मान्यवरांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्या नियोजनाखाली शाहू महाराज यांना जास्तीत जास्त्त मताधिक्य देणार असल्याचे स्पष्ट केले. इस्पुर्ली येथील सर्वसामान्य कुटुंबातील अंकिता चिंदगे या युवतीने विद्यमान शाहू महाराजांमुळेच मला पुणे येथे लॉ चे शिक्षण पूर्ण करता आल्याचे सांगितले.
युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
म्हणाल्या, ज्या ज्या वेळी समाजाला गरज पडते, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची वेळ येते त्या त्या वेळी आपले सर्वांचे लोकसभेचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांनी रस्त्यावर उतरून समाजहिताला प्राधान्य दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेची मने शाहू छत्रपती महाराज यांनी खऱ्या अर्थाने जिंकली आहेत, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. विजयाबरोबरच ६ जूनला रायगडला शिवराज्याभिषेक सोहळ्यातही जल्लोष करायला सहभागी होण्यासही आवर्जून सांगितले.
दौऱ्याप्रसंगी केडीसीसी बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, सरपंच कुमार कोराणे, उपसरपंच बाबासो वाडकर, गणपती लव्हटे, सर्जेराव ढेंगे, युवराज ढेंगे, उमाजी वाडकर, सुनिता लव्हटे, चंद्रकांत कद्रे, मेघा चौगुले ( हणबरवाडी), माजी जि प सदस्य एकनाथ पाटील, गजानन पाटील, शंकर मगदूम, प्रदीप शेटे, शिवाजी पोवार, संभाजी पोवार, लखन बाबर, सदाशिव कांबळे, सरपंच शुभांगी पोर्लेकर, माजी सरपंच जयश्री चिंदगे, कमल पोवार, मंगल बाबर, नम्रता पाटील, तेजस्विनी शेटे, मंगल मगदूम ( इस्पुर्ली ), एम.एस.कांबळे, सुदाम कांबळे, पांडुरंग कांबळे, सुजाता कांबळे, नंदा कांबळे, आनंदा कराडे आंबेडकरनगर (नागाव), सरपंच सतपाल मगदूम, तंटामुक्त अध्यक्ष अशोक मगदूम, बापुसो खामकर, माजी सरपंच शीतल नाईक, राहुल कोराणे, कृष्णात कारंडे, निवृत्ती कारंडे, वकील सरनाईक, दिनकर मगदूम, तानाजी नीलजे, चेअरमन हनुमान दूध, पांडुरंग सरनाईक, राजू गुरव, नागोजी मगदूम, आनंदा देवकुळे, अतुल सरनाईक (नागाव ), सरपंच विद्या पाटील, उपसरपंच वंदना मगदूम, तेजस्विनी शशिकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिता पानारी, छकुली मगदूम, सविता सरदेसाई, माजी सरपंच राजश्री कांबळे, एच. के. पाटील, माजी उपसरपंच धनाजी मगदूम, पांडुरंग मगदूम, दूधगंगा ऱ्हायकर्स ग्रुप, पांडुरंग विष्णू मगदूम, राजेंद्र पाटील (चुये ), बिद्री कारखाना संचालक संभाजीराव पाटील, एस.के. पाटील, सचिव भीमराव पाटील, यशवंत पाटील, सातापा पाटील, अजित सूर्यवंशी, विलास सूर्यवंशी, जयवंत घाडगे, डी.डी.पाटील, अमर पाटील, जयश्री पाटील, सुनिता पाटील, लता कुंभार, शुभांगी पाटील,अनिता घाटगे,कल्पना पाटील (कावणे ) ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments