मंदिरे सुरु, भाजपा कोल्हापूरच्यावतीने महाद्वार चौक येथे आनंदोत्सव
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोनामुळे राज्यातील मंदिरे, प्रार्थनास्थळे गेली ८ महिने बंद ठेवण्यात आली होती. आता कोरोनाची साथ आटोक्यात आल्यावर मंदिरे, प्रार्थनास्थळे कधी उघडणार याकडे भाविकांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर राज्य सरकारने सोमवार पासून महाराष्ट्रातील मंदिरे, प्रार्थनास्थळे सुरु करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली महाद्वार चौक येथे ढोल ताशांचा गजरात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी अंबा माता की जय, उद ग आई उद, जोतीबाच्या नावांन चांगभल, गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा दिल्या.
याप्रसंगी बोलताना सरचिटणीस विजय जाधव म्हणाले, राज्यात कोरोनाचा संसर्क कमी होत चालला असताना राज्यातील मद्यालये यापूर्वीच सुरु झाली होती परंतु देवालये बंद ठेवण्यात आली होती. मंदिरे सुरु होण्याबाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध आंदोलने करण्यात आली होती. असे असताना देखील या ठाकरे सरकारला जाग येत नव्हती. आई अंबाबाईने या ठाकरे सरकारला उशिरा का होईना सुबुद्धी दिली. त्यामुळे भाजपा संपूर्ण महाराष्ट्रात आज अशा पद्धतीचा आनंदोत्सव साजरा करीत आहेत.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, गेली ८ महिने महाराष्ट्रातील ही मंदिरे बंद होतीत. ही मंदिरे उघडावीत म्हणून भारतीय जनता पार्टीच्यावतीने वारंवार अनेक आंदोलने केली. राज्यात एकीकडे दारूची दुकाने सुरु झाली, मॉल उघडलले, बार उघडले पण सर्व धर्मांची श्रद्धास्थाने असलेली मंदिरे, प्रार्थनास्थळे यापूर्वीच सुरु करायला पाहिजे होती कारण त्याठिकाणी सोशल डीस्टनसिंगचे भान पाळण्याची शक्यता जास्त होती. पण उद्धव ठाकरे सरकारनी फक्त भारतीय जनता पार्टी मंदिरे उघडा म्हणत आहे म्हणून मंदिरे उघडली नाहीत असे आमचे मत आहे. या सरकारला मंदिरांच्या बाबतीत एवढी उदासीनता का हा येणारा काळ ठरवेल. आज वेळानं का होईना मंदिरे सुरु झाली त्यामुळे आई अंबाबाई या सरकारला जनतेची काम करण्याची सुबुद्धी द्यावी अशी प्रार्थना केली. मद्यालये लवकर उघडली पण मंदिरे उघडली नाही हे सरकारचे अपयश म्हणावे लागेल. तरीसुद्धा आम्ही आज मंदिरे उघडल्याचा आनंदोत्सव साजरा करत असल्याचे सांगितले. तसेच चांगल्या विचारांचे, कामाचे भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत यावे अशी प्रार्थना उपस्थित सर्वांच्या वतीने देवीकडे करण्यात आली.
याप्रसंगी भाजपा प्रदेश ओ.बी.सी.मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर, सरचिटणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, उपाध्यक्ष मारुती भागोजी, राजू मोरे, अमोल पालोजी, विजय आगरवाल, सचिन तोडकर, चिटणीस सुलभा मुजूमदार, प्रमोदिनी हार्डीकर, प्रदीप उलपे, सुनीलसिंह चव्हाण, दिग्विजय कालेकर, नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, मंडल अध्यक्ष डॉ.राजवर्धन, प्रग्नेश हमलाई, रविंद्र मूतगी, भरत काळे, संतोष माळी, संदीप कुंभार, संजय जासूद, ओंकार खराडे, अतुल चव्हाण, सुधीर देसाई, राहूल पाटील, शैलेश जाधव, किरण कुलकर्णी, रविंद्र घाटगे, मोहित चिटणीस, नजीर देसाई, सौ सुनिता सूर्यवंशी, सौ लता बर्गे, सौ विजयमाला जाधव, सौ शोभा कोळी, सौ शारदा लोहार, विशाल शिराळकर, बापू राणे, दिलीप बोंद्रे, निलेश आजगांवकर, विवेक वोरा, सुमित पारखे, प्रसाद मोहिते, गिरीश साळोखे, अशोक लोहार, इकबाल हकीम, विराज चिखलीकर, सुनील पाटील, सयाजी आळवेकर, शारुख गडवाले, प्रवीणचंद्र शिंदे, सुशांत पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.