गोकुळचा १७ लाख लिटर दूध संकलनचा टप्पा पूर्ण
गोकुळचे शिल्पकार मा. स्व. आनंदराव ज्ञा. पाटील (चुयेकर) यांची १० वी पुण्यतिथी अमृत कलश पूजन कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ) च्या वतीने स्वर्गिय आनंदराव ज्ञा.पाटील (चुयेकर) यांच्या १० व्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या १७ लाख लिटर्स दूध संकलन पूर्तीचा अमृत कलश पूजन कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफसो यांच्या शुभहस्ते व माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटीलसो यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार संजय मंडलिकसो, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व सर्व संचालक मंडळ, प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.यावेळी बोलताना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफसो म्हणाले कि, स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या १० व्या पुण्यतिथी दिवशी १८ लाख ४२ हजार लिटर दुध संकलनाचा टप्पा पूर्ण झाला हा एक चांगला योगायोग आहे. स्वर्गीय आनंदराव पाटील (चुयेकर)यांच्या अथक प्रयत्नातूनच मुंबई येथे गोकुळची दूध विक्री चालू झाली, त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने या संघाचे मार्केट निर्माण झालं. गोकुळच्या दूध उत्पादकांच्या घामाला आणि श्रमाला खऱ्या अर्थाने किंमत ही मुंबई पुणे येथील दुध विक्रीमुळे मिळाली आणि याचं सगळं श्रेय हे आनंदराव चुयेकर यांना जाते.त्यांचे योगदान गोकुळ च्या जडणघाडणी मध्ये मोलाचे आहेअडीच वर्षांपूर्वी सत्ता परिवर्तन झालं आणि दूध उत्पादकांनी नवीन संचालक मंडळाच्या हातामध्ये सत्ता दिली त्यावेळी संघाचे संकलन सरासरी १२ लाख लिटर होते. मुंबईमध्ये गोकुळच्या म्हैस दुधाला फार मोठी मागणी असून जिल्ह्यातील दूध उत्पादकांना दुध उत्पादन वाढीसाठी चालना देण्याचे काम आम्ही गेली अडीच वर्ष केले. म्हैस दुध वाढी साठी मनापासून प्रयत्न करायचे ठरवलं आणि म्हैस दूध वाढीसाठी जातिवंत म्हैस खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यात आली. यामध्ये दुध उत्पादक,नेतेमंडळी संचालक मंडळ , , कर्मचारी, यांनी हि म्हैस खरेदी करण्यास सुरुवात केली. याचा परिणाम परराज्यातील जातिवंत म्हैशी दुध उत्पादकांनी मोठया प्रमाणात खरेदी केल्या. यामुळे संघाच्या म्हैस दूध संकलनात वाढ होण्यास मदत झाली. मुंबईमधील अमुलचे म्हैस दुध विक्रीचे आवाहन गोकुळने आपल्या गुणवत्तेच्या जोरावरती परतून लावले आहे.असे मनोगत व्यक्त केले. व भविष्यात दूध उत्पादकांच्या सहकार्याने वीस लाख लिटर दुध संकलनाचा टप्पा पूर्ण करू असा विश्वास यावेळी व्यक्त केला.यावेळी बोलताना माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटीलसो म्हणाले कि स्वर्गीय आंनदराव पाटील-चुयेकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक क्रांती घडवण्याचे काम केले तसेच आपल्या कर्तुत्वाने या गोकुळचा पाया रचला व गोकुळला खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या पुढे घेऊन जाऊन मुंबई आणि राज्यभर पोचवायचं काम केले आहे. महाराष्ट्राचा ब्रँड म्हणून गोकुळला आपल्याला पुढे नेण्यासाठी येणाऱ्या भविष्यकाळात अगदी मायक्रो प्लॅनिंग करून संघाच्या विविध योजना राबवून दूध उत्पादन वाढवणे,दूध विक्री वाढविणे, कमीत कमी खर्च, काटकसर व बचतीचे धोरण अवलंबने महत्वाचे आहे. येणाऱ्या भविष्यकाळात २५ लाख लिटर दूध संकलनासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.दूध उत्पादक हिताचे निर्णय प्रामुख्याने गोकुळच्या सत्तेमध्ये आल्यानंतर आपण करू शकलो आणि म्हणून येणाऱ्या भविष्यकाळात देखील गोकुळच्या माध्यमातून चार पैसे शेतकऱ्याला जास्तीचे कसे देता येईल यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे मनोगत व्यक्त केले.यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी प्रस्ताविक भाषणामध्ये म्हणाले कि, प्रतिदिनी २० लाख लिटर्स दूध संकलनाचा संकल्प करण्यात आला होता. लाखो दूध उत्पादकांच्या सहकार्याने तो संकल्प पूर्णत्वाकडे जात असताना आज गोकुळच्या इतिहासातील दूध संकलनाचा उच्चांक झाला असून आज गोकुळने १७ लाख लिटर्स दूध संकलानाचा टप्पा पार केला आहे. यामध्ये म्हैस दूध संकलन ९ लाख लिटर्स व गाय दूध ८ लाख लिटर्सचा समावेश आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफसो, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटीलसो व आघाडीचे सर्व नेते मंडळी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गेल्या अडीच वर्षात राबविलेल्या सभासद हिताच्या विविध योजना, प्रभावी कामकाज, संचालक मंडळाचा काटकसरीचा कारभार व माझ्या सर्व सहकारी संचालक यांनी दिलेल्या बहुमोल सहकार्याने तसेच दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, कर्मचारी यांच्या योगदानाने ‘गोकुळ’ची दिमाखात वाटचाल सुरु आहे याचा मला मनस्वी आनंद आहे असे मनोगत व्यक्त केले.यावेळी १७ लाख लिटर दूध संकलनचा टप्पा पूर्ण करण्यासाठी योगदान दिलेले दूध उत्पादक, दूध संस्था, संघाचे सुपरवायझर, पशु वैद्यकीय अधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच खासदार संजय मंडलिक, बिद्री कारखान्याचे चेअरमन के.पी.पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमाचे स्वागत माजी चेअरमन व जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी केले.तर आभार संघाचे संचालक किसन चौगले यांनी मानले. तसेच सूत्र संचालन एम.पी.पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफसो, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटीलसो, खासदार संजय मंडलिक, चेअरमन अरुण डोंगळे, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के.पी. पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, जेष्ठ संचालक विश्वास पाटील, के.डी.सी.सी.बँकेचे संचालक भैय्या माने कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व संघाचे संचालक मंडळ व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.