डॉ.महेश कदम यांची गोकुळ दूध संघास सदिच्छा भेट
कोल्हापूर/प्रतिनिधी : सहकारी संस्था (दुग्ध) पुणे विभागीय उपनिबंधक डॉ.महेश कदम यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) दूध प्रकल्पास गोकुळ शिरगाव येथे सदिच्छा भेट दिली असता गोकुळ परिवाराच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते गोकुळ प्रधान कार्यालय येथे सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना डॉ.महेश कदम म्हणाले कि, गोकुळने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात आपले नाव शिखरावर पोहोचविलेले आहे. दुग्धव्यवसायामध्ये गोकुळ हा महाराष्ट्रचा अभिमान असून भविष्यात भारताचा अभिमान (Pride of India) होण्यासाठी गोकुळने प्रयत्नशील राहावे व दुग्ध व्यवसायात गोकुळ हा देशाचा ब्रँड व्हावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. पुढे बोलताना म्हणाले कि, गोकुळने दूध उत्पादकांना विविध सेवा सुविधा, उच्चांकी दूध खरेदी दर दिला असून, ग्राहकांना गुणवत्तापूर्ण दूध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून नेहमीच दूध उत्पादक, ग्राहक यांचे हित साधण्याचा प्रयत्न केला आहे. गोकुळने भविष्यात नवनवीन दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करावी व जिल्ह्याबाहेर तसेच मोठ-मोठ्या शहरामध्ये नवीन दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्र काढावी जेणेकरून ग्राहकांना दूध व दुग्धजन्य पदार्थ सहजपणे उपलब्ध होण्यास मदत होईल असे मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांच्या सोबत असणाऱ्या अधिकारी यांनी संघाची दूध उत्पादन प्रक्रिया प्रत्यक्षपणे अनुभवली, तसेच कामकाजाची माहिती घेऊन कामकाजाचे कौतुक केले. यावेळी गोकुळ राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली.याप्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) डॉ.महेश कदम, सहा.निबंधक (कोल्हापूर) प्रदीप मालगावे, सहा.निबंधक (पुणे) सुधिर खंबायत, सहा.निबंधक (सोलापूर) वैशाली साळवे, सहा. निबंधक (सांगली) दिपा खंडेकर, सहा.निबंधक (सातारा) दत्ता मोहिते, सहकार अधिकारी (पुणे) भरत वीर, संतोष दराडे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, प्रकाश आडनाईक, हणमंत पाटील, बाजीराव राणे,श्री.जोशी व संघाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.