Wednesday, October 22, 2025
spot_img
Home Blog Page 2

क्रीडा, आरोग्य आणि संस्कारांचा संगम — राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा सिद्धगिरीत भव्य समारोप

0

क्रीडा, आरोग्य आणि संस्कारांचा संगम — राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा सिद्धगिरीत भव्य समारोप

 

कणेरी (कोल्हापूर)/प्रतिनिधी : दोन दिवस चाललेल्या राज्यस्तरीय आंतर विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धा २०२५ चा समारोप समारंभ दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी काडसिद्धेश्वर हायस्कूल,कणेरी येथे अत्यंत दिमाखात पार पडला.या समारोप समारंभास परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी, महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. श्री हसन मुश्रीफ तसेच प्राध्यापक डॉ. मिलिंद निकुंभ (प्र-कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक) उपस्थित होते.
समारोप प्रसंगी विजेत्या खेळाडूंना व संघांना मेडल्स, प्रशस्तीपत्रे आणि पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना मा. हसन मुश्रीफ साहेब म्हणाले —परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी मला एका अत्यंत चांगल्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले, याचा मला आनंद आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेतील सर्व विजेत्या खेळाडूंचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचे कोल्हापूर जिल्ह्यात स्वागत करतो. दोन दिवसांत केलेल्या मैदानाच्या सजावटीसाठी आणि उत्तम नियोजनासाठी मी आयोजकांचे विशेष कौतुक करतो.
हरलेल्यांनी हार न मानता पुन्हा प्रयत्न करावेत, कारण प्रयत्नशील व्यक्तीच खऱ्या अर्थाने विजेते असतात.
कणेरी मठाला तेराशे वर्षांचा वैभवशाली इतिहास लाभला आहे. सिद्धगिरी हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरिबांना कमी दरामध्ये उपचार उपलब्ध करून देणे, हजारो मुलांना दत्तक घेऊन त्यांना अधिकारी बनविणे आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून हजारो मुलींना स्वावलंबी बनविणे — हे सिद्धगिरी संस्थानचे अतुलनीय कार्य आहे.
दोन दिवसांचे हे असाधारण नियोजन हे ईश्वरीय शक्तीचे प्रतीक आहे. अशा ठिकाणी येणे ही प्रेरणादायी बाब आहे.या प्रसंगी परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी आपल्या आशीर्वचनात सांगितले. डेव्हलपमेंट स्पर्धेच्या होत नाही, खेळातून एक मनोभावना तयार होते. राष्ट्रीय भावीक्य निर्माण करणारा हा खेळ आहे. या खेळातून परस्परांचा परिचय होतो, एक नवीन नातं तयार होतं. हरलेल्यांच्या त्यागामुळे जिंकलेल्यांचा विजय होतो.
शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा यांचा संगम समाजाला सबल बनवतो. सिद्धगिरी संस्थान शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सातत्याने जनहिताचे कार्य करत राहील.समारोप सोहळ्याचे सूत्रसंचालन विवेक सिद्ध यांनी केले, तर आभार यशोवर्धन बारामतीकर यांनी मानले. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी डॉ. देवेंद्र पाटील, राजकुमार पाटील, एम डी पाटील, विजय सनगर, यशोवर्धन बारामतीकर, गुंडोपंत वड, गुरुनाथ पांगम,विवेक शेट्ये, निशांत पाटील, अलका शेट्ये, सुजित पाटील, प्रसाद नेवरेकर, रेगिना सातवेकर यांच्यासह महाराष्ट्र भरातून विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.या भव्य स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी, तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिकारी व क्रीडा विभाग यांनी परिश्रम घेतले.या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, संघभावना, शिस्त आणि नेतृत्वगुण वृद्धिंगत झाल्याचे सर्व मान्यवरांनी नमूद केले.

दाम दुप्पटचे आमिष दाखवून १२ कोटी पेक्षा जास्त रक्कमेची आर्थिक फ़सवणूक प्रकरणी फरारी आरोपीला अटक

0

दाम दुप्पटचे आमिष दाखवून १२ कोटी पेक्षा जास्त रक्कमेची आर्थिक फ़सवणूक प्रकरणी फरारी आरोपीला अटक

कोल्हापूर/प्रतिनिधी : विविध कंपन्या आणि फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली ४५ दिवसात गुंतवणूक केलेली रक्कम दाम दुप्पटीचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करून फरार झालेला मुख्य आरोपी राजेंद्र भिमराव नेर्लीकर याला आर्थिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली.त्याला इचलकरंजी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १८ तारखे पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या गुन्हयांतील मुख्य आरोपी राजेंद्र नेर्लीकर आणि त्याचा मुलगा बालाजी नेर्लीकर हा फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये पारंगत होते.त्यांनी गुंतवणूकदारांना ४५ दिवसात गुंतवणूक केलेली रक्कम दाम दुप्पट देतो असे सांगून फिर्यादी विनायक पाटील यांच्यासह इतर गुंतवणूकदारांची १२ कोटी ३५ लाख ३५ हजार १३८.रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याने फिर्यादी विनायक पाटील यांनी हुपरी पोलिस ठाण्यात दि.२२/१०/२४ रोजी फिर्याद दिल्याने हुपरी पोलिसांनी नेर्लीकर बाप-लेका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे चालू असताना मुख्य आरोपी राजेंद्र नेर्लीकर याचा मुलगा बालाजी नेर्लीकर याला पोलिसांनी अटक केली होती.मात्र मुख्य आरोपी राजेंद्र नेर्लीकर हा पसार झाला होता.आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांना दि.१२ ऑक्टोबर २५ रोजी फरार असलेला मुख्य आरोपी राजेंद्र नेर्लीकर याचा ठावठिकाणाची माहिती पोलिस अंमलदार विजय काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक महेश इंगळे यांच्या निरीक्षणाखाली तपास पथक तयार करून रवाना केले असता राजेंद्र नेर्लीकर हा आदमापूर येथील हॉटेल त्रिशा येथे मिळून आल्याने त्याला अटक केली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता,आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश इंगळे,पोलिस विजय काळे,राहुल गायकवाड,रविंद्र गायकवाड,विपूल माळी आणि चालक सुनिल गावडे यांनी केली.
अटक केलेल्या राजेंद्र नेर्लीकर व बालाजी नेर्लीकर यांच्या कडुन आणखी काही गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असेल तर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : आमदार सतेज पाटील

0

महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : आमदार सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्य सरकारने महापुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जाहीर केलेली नुकसानभरपाईची मदत म्हणजे तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे अशी टीका काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.
आमदार पाटील म्हणाले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत अपेक्षित असताना महायुती सरकारने जाहीर केलेली नुकसानभरपाई तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्याला ३.४७ लाखांची मदत मिळेपर्यंत मनरेगामध्ये मजुरी करावी लागणार. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच आहे. महापुराने जी शेती उध्वस्त झाली त्यावरील पीककर्ज माफ होणार नाहीच; उलट या कर्जाचे पुनर्गठन होऊन शेवटी तो भार शेतकऱ्यावरच येणार आहे. त्यामुळे घोषणा झाली खरी; पण शासनाच्या जीआरमधील अटी- शर्तीं लागू होऊन शेवटी शेतकऱ्याच्या हातात काहीच पडणार नाही असे दिसते. त्यामुळे महायुती सरकारने ही मदत जाहीर करुन शब्दांमधून दिलासा आणि हिशेबात फसवणूक केली असल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी केली.

राष्ट्र सेविका समितीचे संचलन उत्साहात संपन्न

0

राष्ट्र सेविका समितीचे संचलन उत्साहात संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्र सेविका समितीचे , विजयादशमी च्या निमित्ताने आयोजित केलेले स-घोष पथ संचलन आज सकाळी उत्साहात संपन्न झाले. या संचलनात कोल्हापूर शहर व उत्तर कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी , हूपरी , पन्हाळा आदि गावांतून , १५० हून अधिक सेविका पूर्ण गणवेशात सहभागी झाल्या होत्या.
या संचलनाचा प्रारंभ प्रायव्हेट हायस्कूल येथे झाला. मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर , महाद्वार रोड , जोतिबा रोड , बिंदू चौक या शहरातील प्रमुख नागरी व व्यापारी भागातून मार्गक्रमण करत संचलनाची प्रायव्हेट हायस्कूल येथे सांगता झाली.संचलनाच्या मार्गावर नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने रांगोळया काढून , फटाके वाजवून व भगव्या ध्वजावर पूष्पवृष्टी करून संचलनाचे स्वागत करण्यात आले.
राष्ट्रसेविका समिती ही अखिल भारतीय स्तरावर काम करणारी संघटना असून यंदा ९० व्या वर्षात पदार्पण करत आहे . वंदनीय लक्ष्मीबाई तथा मावशी केळकर यांनी १९३६ साली सुरु केलेल्या या संघटनेचा आज सर्व भारतात शाखा विस्तार झाला आहे. महिलांनी शारिरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम व्हावे व संघटित होऊन ‘राष्ट्र प्रथम’ या विचाराने सक्रिय व्हावे , या उदात्त हेतू ने समिती काम करते.
आजच्या संचलनानंतर प्रायव्हेट हायस्कूल मध्ये समितीचा विजयादशमी चा उत्सव संपन्न झाला. या उत्सवासाठी जमलेल्या सेविका व उपस्थित नागरिकांना प्रमुख वक्त्या डाॅ. जूई कुलकर्णी यांनी ‘ संघ विचार हाच राष्ट्र विचार ‘ या विषयावर संबोधित करताना, संघाची कार्यपद्धती , व्यक्ती निर्माण , सशक्त संघटन व राष्ट्रहीताची जोपासना या मुद्द्यांचे उद्बोधक विवेचन केले.
यावेळी बोलताना त्यांनी कुटुंब प्रबोधन, पर्यावरण रक्षण, सामाजिक समरसता , स्व -बोध व नागरी कर्तव्ये या पंचपरिवर्तनाची आवश्यकता विषद केली .उत्सवाचे प्रमुख पाहुणे , माजी नगरसेवक श्री अजित ठाणेकर यांनी संघविचाराने प्रेरित होऊन उपस्थित माता-भगिनींनी आपापल्या ठिकाणी सक्रिय कार्यरत राहून राष्ट्रहीताचे काम करावे असे आवाहन केले.
या संचलन व दसरा उत्सवासाठी समितीच्या प्रांत बौद्धिक प्रमुख सौ. मैत्रेयी शिरोळकर विशेष उपस्थित होत्या.
या संचलन व दसरा उत्सवाच्या कार्यक्रमाचे नियोजनात , उत्तर कोल्हापूर जिल्हा कार्यवाह सौ गौरी मुजुमदार, दक्षिण कोल्हापूर जिल्हा कार्यवाह सौ अनघा नाईक , शहर कार्यवाहीका सौ प्रज्ञा परांजपे , यांच्यासह सौ चिन्मयी कोटी , सौ देवयानी पलूस्कर, सौ प्राची जोशी , सौ सविता चरपल्ले, सानिका लाड , ऋतुजा दोरकर आदि सेविकांचा सहभाग होता.

कोल्हापूरच्या यतीराज पाटोळे व अभिषेक आंब्रे यांची १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघात विनु मकंड स्पर्धेसाठी निवड

0

कोल्हापूरच्या यतीराज पाटोळे व अभिषेक आंब्रे यांची १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघात विनु मकंड स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू कु यतीराज पाटोळे व कु अभिषेक आंब्रे यांची १९ वर्षाखालील विनु मकंड एकदिवशीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र १९ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड झाली आहे सदरची स्पर्धा एकदिवशीय साखळी पध्दतीची असुन या स्पर्धेतील सामने दि ९ ते १७ ऑक्टोबंर २०२५ रोजी पर्यत रांची येथे होणार आहे या स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ ई ग्रुप मध्ये असुन यामध्ये महाराष्ट्र बरोबर उत्तर प्रदेश, दिल्ली, आसाम, राजस्थान व पंजाब या पांच राज्य संघाचा समावेश असुन पहिला सामना ९ ऑक्टोबंर २०२५ रोजी उत्तर प्रदेश बरोबर दुसरा सामना ११ ऑक्टोबंर २०२५ रोजी दिल्ली बरोबर तिसरा सामना १३ ऑक्टोबंर २०२५ रोजी आसाम बरोबर चौथा सामना १५ ऑक्टोबंर २०२५ रोजी राजस्थान बरोबर व पांचवा सामाना १७ ऑक्टोबंर २०२५ रोजी पंजाब बरोबर रांची येथे खेळविणेत येणार आहे बाद फेरीे, उंपात्य व अंतीम सामने राजकोट येथे २५ ते ३० ऑक्टोबंर २०२५ रोजी पर्यत होणार आहेत
यतीराज पाटोळेची सन २०२२/२३ यापुर्वी १६ वर्षाखालील महाराष्ट्र संघात व सन २०२२-२३, २०२३-२४ या सलग दोन वर्षी महाराष्ट्र १९ वर्षाखालील संघाच्या कॅम्पसाठी निवड झाली होती अभिषेक आंब्रेची यापुर्वी महाराष्ट्र १४ वर्षाखालील व १६ वर्षाखालील संघाच्या कॅम्पसाठी निवड झाली होती| अभिषेक आंब्रेला यावर्षी प्रथमच १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघात संधी मिळाली आहे.

रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या “यामिनी” प्रदर्शनास मिळाला भरघोस प्रतिसाद महिलांनी केली भरघोस खरेदी

0

रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या “यामिनी” प्रदर्शनास मिळाला भरघोस प्रतिसाद महिलांनी केली भरघोस खरेदी

 

कोल्हापूर / प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ गार्गीजने आयोजित केलेल्या यामिनी प्रदर्शनात महिलांनी केली भरघोस खरेदी १९ ते २१ सप्टेंबर आयोजित केलेल्या या प्रदर्शनात स्टॉल धारकांना चांगला प्रतिसाद मिळाला.दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापूरच्या जनतेला या यामिनी प्रदर्शनाचे वेध लागतात.दरवर्षीच्या वाढत्या प्रतिसादामुळे रोटरी क्लब ऑफ गार्गीजने याहीवर्षी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
.यावर्षीच्या यामिनी प्रदर्शनाचे हे बारावे यशस्वी वर्ष होते.
प्रदर्शनात पुणे येथील एक्सकॅलुसिव्ह रिअल ज्वेलर्स विथ युनिक डिझाइन्स, मुंबई पोल्की, रिअल डायमंड्स, लॅबग्रोन डायमंड्स, संपूर्ण भारतामधील तसेच इंदोर, जयपूर, गोआ, बेंगलोर, दिल्ली येथील विविध प्रकारच्या होम डेकोर्स फॉर फेस्टीव्हस स्टॉल्स असे १०० हुन अधिक स्टॉल्स सहभागी झाले होते.स्वयंम,अंकुर, तनिष या शाळेतील मुलांचेही ही स्टॉल होते.
या प्रदर्शनाला डी.वायं.पी. हॉस्पिटॅलिटी, चंद्ररूप आणि हॉटेल सयाजी,मोहिते सुझुकी यांचे सहकार्य लाभले होते.
आजपर्यंत रोटरी क्लब ऑफ गार्गिजने विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.अनेक गरजूंना मदत केली आहे.शिवाय समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची उमेद देणे हा मुख्य उद्देश प्रदर्शनाचा असतो. त्यामुळे बचत गट यांनीही बनविलेल्या वस्तू प्रदर्शनात पहायला मिळाल्या.या प्रदर्शनातून या प्रदर्शनातून उपलब्ध निधीतून विविध सामाजिक उपक्रम, महिला सबलीकरण, गरजूंसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, मुलींसाठी सर्वाइकल कॅन्सरचे वैक्सिंन याबाबत सहकार्य केले जाणार आहे.
या प्रदर्शनासाठी क्लबच्या अध्यक्षा रो.अंजली मोहिते,को चेअरमन डॉ.हेमलता कोटकर,चेअर पर्सन बिना जनवाडकर,सेक्रेटरी सविता पदे,रो.सौ साधना घाटगे, रो. शोभा तावडे याचबरोबर यामिनीच्या सदस्य रो. रेणुका सप्रे, रो. दीपिका कुंभोजकर,रो.कल्पना घाडगे,रो.गीता पाटील,रो.योगिनी कुलकर्णी, रो.जया महेश्वरी,रो.सुरेखा इंग्रोळे,रो.सुजाता लोहिया, रो.गिरिजा कुलकर्णी, रो.नंदिनी पटोडीया यांच्याचबरोबर सर्व क्लब मेंबर्सनी अथक परिश्रम घेतले होते.

१५ वर्षापेक्षा अधिक काळ महापालिका ताब्यात असूनही कॉंग्रेसच्या नेत्यांकडून आजवर केवळ भ्रष्टाचार, विकासाचा एकही प्रकल्प शहरात राबवला नाही, खासदार धनंजय महाडिक यांचे टीकास्त्र

0

१५ वर्षापेक्षा अधिक काळ महापालिका ताब्यात असूनही कॉंग्रेसच्या नेत्यांकडून आजवर केवळ भ्रष्टाचार, विकासाचा एकही प्रकल्प शहरात राबवला नाही, खासदार धनंजय महाडिक यांचे टीकास्त्र

कोल्हापूर/प्रतिनिधी : १५ वर्षापेक्षा अधिक काळ कोल्हापूर महापालिका कॉंग्रेसच्या ताब्यात होती. पण कॉंग्रेसच्या नेत्यांनी कोल्हापूरच्या विकासाचा एकही प्रकल्प राबवला नाही. माजी गृह राज्यमंत्र्यांनी फक्त थेट पाईप लाईनचा एक प्रकल्प आणला. तोही अपूर्णावस्थेत असल्याने, शहरातील महिला आजही घागर घेऊन पाण्यासाठी भटकत आहेत. त्यामुळे कोल्हापूर महापालिका महायुतीच्या ताब्यात द्यावी. शहराच्या प्रश्‍नांची कालबध्द सोडवणूक करु, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात विविध विकासकामांच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
आमदार अमल महाडिक यांच्या निधीतून, कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक ६५ मध्ये ७ कोटी ६७ लाख रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. तसेच प्रभाग क्रमांक ६६ मध्ये २ कोटी ७६ लाख रुपयांच्या निधीतून, स्वातंत्र्य सैनिक वसाहतीत अंतर्गत रस्ते, गटारी, शाळा कपौंड, स्वच्छतागृह अशी कामे झाली आहेत. या कामांचे आज लोकार्पण करण्यात आले. एसएससी बोर्ड ते राजेंद्रनगर जकात नाकापर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे लोकार्पण आणि रेव्हेन्यू कॉलनी ड्रेनेज कामाचा शुभारंभ, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील, भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा रुपाराणी निकम, संग्राम निकम, महेश वासुदेव, प्रा. रमेश मिरजकर, नामदेव नागटिळे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी सिंगापूरमध्ये झालेल्या जागतिक मास्टर्स जलतरण स्पर्धेत २०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात रौप्य पदक मिळवलेल्या, आयकर विभागाचे अधीक्षक रोहीत हवालदार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच लेफ्टनंट पदी निवड झालेल्या शर्विल लाड याला गौरवण्यात आलं. येत्या काही दिवसांत महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरु होणार आहे. कोल्हापूरवासीयांनी भाजप आणि महायुतीला महापालिकेची सत्ता द्यावी. त्यातून शहराचे प्रश्‍न साेडवले जातील, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. यावेळी त्यांनी आमदार सतेज पाटील आणि कॉंग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. दरम्यान प्रभाग क्रमांक ६६ मध्ये पूर्ण झालेल्या विकासकामांचे लोकार्पण खासदार महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. तर नव्या विकासकामाचा शुभारंभ झाला. त्यामध्ये शाहू पार्क मधील रेव्हेन्यू कॉलनीतील रस्त्याचा आणि मोरेवाडी रस्त्याचा समावेश आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील अंतर्गत रस्ते, गटारीसह पायाभूत सुविधांची पूर्तता करु, अशी ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी दिली. तर महापालिकेत महायुतीला सत्ता मिळाल्यास केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांद्वारे शहराचा गतीमान विकास होईल, असं प्रा. जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मनीषा वास्कर, संजय वास्कर, पाचगावचे भिकाजी गाडगीळ, उज्ज्वल लिंग्रस, प्रशांत शिंदे, सुखदेव बुध्याळकर, इस्माईल बागवान यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या “यामिनी” प्रदर्शनास हॉटेल सयाजी येथे प्रारंभ २१ सप्टेंबर पर्यंत चालणार प्रदर्शन,प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन

0

रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या “यामिनी” प्रदर्शनास हॉटेल सयाजी येथे प्रारंभ २१ सप्टेंबर पर्यंत चालणार प्रदर्शन,प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन

 

कोल्हापूर / प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापूरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी या प्रदर्शनाचे. दरवर्षीच्या वाढत्या प्रतिसादामुळे रोटरी क्लब ऑफ गार्गीजने या ही वर्षी हे प्रदर्शन भरविले असून आज १९ रोजी या प्रदर्शनास प्रारंभ झाला आहे आज या प्रदर्शनाचे उद्घाटन डी. वाय. पाटील ग्रुपच्या सौ. शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते फित कापून झाले. उद्घाटन प्रसंगी डिस्ट्रिक गव्हर्नर अरुण भंडारी,असिस्टंट गव्हर्नर हर्षवर्धन तायवडे पाटील, रोटरी मुव्हमेंट कोल्हापूरचे प्रेसिडेंट रो. शितल दुगे यांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना डिस्ट्रिक गव्हर्नर अरुण भंडारी यांनी रोटरी क्लबचा इतिहास सांगितला.आणि रोटरी क्लब ऑफ गार्गीजने अनेक विधायक उपक्रम राबविण्यावर नेहमीच भर दिलेला आहे. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून गरजूंना सहकार्य केलेले आहे.आता ही आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या माध्यमातून विधायक कामासाठी निधी दिला जाणार आहे. असे सांगून त्यांच्या या कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलताना क्लबच्या अध्यक्षा रो.अंजली मोहिते यांनी रोटरी गार्गीजच्या कार्याचा आढावा घेतला.आणि क्लब राबवित असलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही मुलांचे स्वास्थ्य शिक्षण आणि महिला सबलीकरन हा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले आणि या यामिनी प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन केले.चेअर पर्सन बिना जनवाडकर यांनी यामिनी प्रदर्शनाची व्याप्ती वाढली असून यावर्षी ११० स्टॉल सहभागी झाले आहेत.आणि या स्टॉलच्या माध्यमातून महिलांना त्यांच्यासाठी उपयुक्त वस्तू खरेदी करता येणार असल्याचे सांगितले.
हे प्रदर्शन २१ सप्टेंबर २०२५ पर्यंत हे प्रदर्शन चालू राहणार आहे.यावर्षीच्या यामिनी प्रदर्शनाचे हे बारावे यशस्वी वर्ष असून या वर्षी प्रदर्शनात पुणे येथील एक्सकॅलुसिव्ह रिअल ज्वेलर्स विथ युनिक डिझाइन्स, मुंबई पोल्की, रिअल डायमंड्स, लॅबग्रोन डायमंड्स, संपूर्ण भारतामधील तसेच इंदोर, जयपूर, गोआ, बेंगलोर, दिल्ली येथील विविध प्रकारच्या होम डेकोर्स फॉर फेस्टीव्हस स्टॉल्स असे १०० हुन अधिक स्टॉल्स सहभागी झाले आहेत.स्वयंम,अंकुर, तनिष या शाळेतील मुलांसाठी ही स्टॉल याठिकाणी आहेत.
या प्रदर्शनाला डी.वायं.पी. हॉस्पिटॅलिटी, चंद्ररूप आणि हॉटेल सयाजी,मोहिते सुझुकी यांचे सहकार्य लाभले आहे.
आजपर्यंत रोटरी क्लब ऑफ गार्गिजने विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.अनेक गरजूंना मदत केली आहे.शिवाय समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची उमेद देणे हा मुख्य उद्देश प्रदर्शनाचा असतो. त्यामुळे बचत गट यांनीही बनविलेल्या वस्तू प्रदर्शनात बघायला मिळणार आहेत.या प्रदर्शनातून या प्रदर्शनातून उपलब्ध निधीतून विविध सामाजिक उपक्रम, महिला सबलीकरण, गरजूंसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, मुलींसाठी सर्वाइकल कॅन्सरचे वैक्सिंन याबाबत सहकार्य केले जाणार आहे.
या प्रदर्शनासाठी क्लबच्या अध्यक्षा रो.अंजली मोहिते,को चेअरमन डॉ.हेमलता कोटकर,चेअर पर्सन बिना जनवाडकर,सेक्रेटरी सविता पदे,रो.सौ साधना घाटगे, रो. शोभा तावडे याचबरोबर यामिनीच्या सदस्य रो. रेणुका सप्रे, रो. दीपिका कुंभोजकर,रो.कल्पना घाडगे,रो.गीता पाटील,रो.योगिनी कुलकर्णी, रो.जया महेश्वरी,रो.सुरेखा इंग्रोळे,रो.सुजाता लोहिया, रो.गिरिजा कुलकर्णी, रो.नंदिनी पटोडीया यांच्याचबरोबर सर्व क्लब मेंबर्सनी अथक परिश्रम घेतले आहेत.हे प्रदर्शन २० व २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे. तरी सर्व कोल्हापूरवासीयांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.आभार सेक्रेटरी सविता पदे यांनी मानले आहे.

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे बारावे “यामिनी” प्रदर्शन १९,२०.२१ सप्टेंबर रोजी आयोजित

0

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे बारावे “यामिनी” प्रदर्शन १९,२०.२१ सप्टेंबर रोजी आयोजित

 

कोल्हापूर / प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापूरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी या प्रदर्शनाचे. दरवर्षीच्या वाढत्या प्रतिसादामुळे रोटरी क्लब ऑफ गार्गीजने या ही वर्षी हे प्रदर्शन १९, २०, २१ सप्टेंबर २०२५ रोजी मेघमल्हार हॉल, सयाजी हॉटेल, कोल्हापूर येथे आयोजित केले आहे. यामिनी प्रदर्शनाचे हे बारावे यशस्वी वर्ष असून या वर्षी प्रदर्शनात पुणे येथील एक्सकॅलुसिव्ह रिअल ज्वेलर्स विथ युनिक डिझाइन्स, मुंबई पोल्की, रिअल डायमंड्स, लॅबग्रोन डायमंड्स, संपूर्ण भारतामधील तसेच इंदोर, जयपूर, गोआ, बेंगलोर, दिल्ली येथील विविध प्रकारच्या होम डेकोर्स फॉर फेस्टीव्हस स्टॉल्स असे १०० हुन अधिक स्टॉल्स असलेले हे यामिनी प्रदर्शन भरविण्यात आले आहे.अशी माहिती क्लब अध्यक्षा सौ. अंजली मोहीते, इव्हेन्टचे चेअरमन बिना जनवाडकर, को-चेअरमन डॉ. हेमलता कोटकर, सेक्रेटरी सविता पदे, रोटरी सदस्य सौ. साधना घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या सर्व सदस्य उपस्थित होत्या.
या प्रदर्शनाचे उद्घाटन ४ वाजता डी. वाय. पाटील ग्रुपच्या सौ. शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार सतेज पाटील,डी वाय पाटील ग्रुपचे संजय डी. पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील डिस्ट्रिक गव्हर्नर अरुण भंडारी,
असिस्टंट गव्हर्नर हर्षवर्धन तायवडे पाटील, रोटरी मुव्हमेंट कोल्हापूरचे प्रेसिडेंट रो. शितल दुगे यांची उपस्थिती असणार आहे.

या प्रदर्शनाला डी.वायं.पी. हॉस्पिटॅलिटी, चंद्ररूप आणि हॉटेल सयाजी,मोहिते सुझुकी यांचे सहकार्य लाभले आहे.
आजपर्यंत रोटरी क्लब ऑफ गार्गिजने विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.अनेक गरजूंना मदत केली आहे.शिवाय समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची उमेद देणे हा मुख्य उद्देश प्रदर्शनाचा असतो. त्यामुळे बचत गट यांनीही बनविलेल्या वस्तू प्रदर्शनात बघायला मिळणार आहेत.या प्रदर्शनातून या प्रदर्शनातून उपलब्ध निधीतून विविध सामाजिक उपक्रम, महिला सबलीकरण, गरजूंसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, मुलींसाठी सर्वाइकल कॅन्सरचे वैक्सिंग, पोलिओ मुक्तीसाठी रोटरी समूहाचा सिंहाचा वाटा आहे.महिलांसाठी उपयुक्त असणारी माहिती मिळावी यासाठी चर्चासत्र आयोजित केले जातात.सामाजिक भान ठेऊन सामजिक प्रकलप राबविण्यावर अधिक भर दिला जातो.अशा विविध उपक्रमासाठी वापरला जातो. शिवाय कॅन्सर सेंटर लाही मशिनरी दिलेली आहे त्याचा उपयोग हॉस्पिटल मध्ये कॅन्सर रुग्णांना होत आहे.स्वयंम,अंकुर, तनिष या शाळेतील मुलांसाठी ही स्टॉल देण्यात आले आहेत.

या प्रदर्शनासाठी क्लबच्या अध्यक्षा रो.अंजली मोहिते,को चेअरमन डॉ.हेमलता कोटकर,चेअर पर्सन बिना जनवाडकर,सेक्रेटरी सविता पदे,रो.सौ साधना घाटगे, रो. शोभा तावडे याचबरोबर यामिनीच्या सदस्य रो. रेणुका सप्रे, रो. दीपिका कुंभोजकर,रो.कल्पना घाडगे,रो.गीता पाटील,रो.योगिनी कुलकर्णी, रो.जया महेश्वरी,रो.सुरेखा इंग्रोळे,रो.सुजाता लोहिया त्याचबरोबर सर्व क्लब मेंबर्सनी अथक परिश्रम घेतले आहे.हे प्रदर्शन १९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री ९ आणि २० व २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे. तरी सर्व कोल्हापूरवासीयांनी या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

तब्बल ५ लाख रूपयांची बक्षिसे असलेल्या झिम्मा-फुगडी स्पर्धेचे १६ सप्टेंबरला आयोजन

0

तब्बल ५ लाख रूपयांची बक्षिसे असलेल्या झिम्मा-फुगडी स्पर्धेचे १६ सप्टेंबरला आयोजन

महासैनिक दरबार हॉलमध्ये रंगणार स्पर्धा- सौ. अरूंधती महाडिक यांची माहिती

कोल्हापूर/प्रतिनिधी : धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्था, भागीरथी युवती मंच, भागीरथी नागरी सहकारी पतसंस्था आणि भाजपच्यावतीने दरवर्षी पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठया झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा १६ व्या वर्षी मंगळवार दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी, महासैनिक दरबार हॉल सर्किट हाऊस शेजारी लाईन बाजार येथे झिम्मा – फुगडीसह महिलांच्या पारंपारिक खेळांच्या स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धेसाठी तब्बल ५ लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.अशी माहिती भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी दिली.
धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित, भागीरथी महिला संस्था, गेल्या १२ वर्षापासून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन करते. खासदार धनंजय महाडिक आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा प्रचंड यशस्वी आणि लोकप्रिय बनली आहे. स्पर्धेला प्रत्येक वर्षी महिला भगिनींचा प्रतिसाद वाढत आहे. यावर्षीही होणार्‍या स्पर्धेत झिम्मा, घागर घुमविणे, उखाणे, सूप नाचविणे, काटवट काणा, छुई फुई, जात्यावरील ओव्या, फुगडी, घोडा घोडा आणि पारंपारिक वेशभूषा अशा गटांमध्ये ही स्पर्धा होत असून, या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाच्या संघाला २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, दुसर्‍या क्रमांकासाठी २० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, तिसर्‍या क्रमांकासाठी १५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, तर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी ५ हजार एक रुपये आणि सन्मानचिन्ह तसंच ५०१ रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंतची वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नाही. सहभागी सर्व महिलांसाठी चहा, नाष्टा आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. नेहमीच्या दिनचक्रात गुरफटलेल्या महिलांना विरंगुळा मिळावा, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि मराठी संस्कृतीचे जतन व्हावे, यादृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील खेळामुळे शरीराचा व्यायाम होण्याबरोबरच सांघिक भावना आणि आत्मविश्‍वासामध्ये वाढ होत असल्यामुळे, जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असा भागीरथी महिला संस्थेचा प्रयत्न असतो. त्याला जिल्हयातील शहरी आणि ग्रामीण भागातील हजारो महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो, असे सौ. अरूंधती महाडिक यांनी सांगितले. गेल्या १५ वर्षांत युवती आणि महिलांसाठी कळी उमलताना… हा प्रबोधनात्मक उपक्रम, मोफत शेळी वाटप, मोफत आरोग्य शिबिर, मोफत हेल्मेट वाटप, वृक्षारोपण, महिलांसाठी रोजगारपूरक मोफत प्रशिक्षण, बचत गटांना मोफत स्टॉल, मिस आणि मिसेस भागिरथी स्पर्धा, युवतींसाठी मोफत स्वसंरक्षण शिबिर, रक्तदान शिबिर, वाचनाची सवय वाढीला लागावी, यासाठी गावोगावी वाचनालय सुरू करणे असे उपक्रम राबवण्यात आले आहेत. हजारो महिला आणि युवतींना या उपक्रमाचा लाभ मिळाला आहे, असे सौ. महाडिक यांनी सांगितले. यावर्षी स्पर्धेचे फॉर्म भरण्याची सोय तालुकानिहाय प्रतिनिधींकडे आणि भागीरथीच्या ताराराणी चौकातील कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. शुक्रवार १२ सप्टेंबर २०२५ ही फॉर्म भरून देण्याची अंतिम तारीख आहे. स्पर्धेसाठी सुमारे ४० परीक्षक, १५ निवेदिका आणि ६० स्वयंसेविकांची टीम सज्ज आहे. या स्पर्धेचा आनंद घरबसल्या लुटता यावा, यासाठी चॅनल बी च्यावतीने संपूर्ण स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेमध्ये सहभागी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध टिव्ही मालिकांमधील लोकप्रिय कलाकारांसह काही चित्रपट कलाकार या स्पर्धेत उपस्थिती लावणार आहेत.स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी ०२३१- २६२५५७७ किंवा ९०७५२१७७८८ या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन सौ. अरुंधती महाडिक यांनी केले. सौ वैष्णवी महाडिक,सौ मंजिरी महाडिक उपस्थित होते.