Saturday, October 18, 2025
spot_img
Homeमाय मराठीक्रीडा, आरोग्य आणि संस्कारांचा संगम — राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा सिद्धगिरीत भव्य समारोप

क्रीडा, आरोग्य आणि संस्कारांचा संगम — राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा सिद्धगिरीत भव्य समारोप

क्रीडा, आरोग्य आणि संस्कारांचा संगम — राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा सिद्धगिरीत भव्य समारोप

 

कणेरी (कोल्हापूर)/प्रतिनिधी : दोन दिवस चाललेल्या राज्यस्तरीय आंतर विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धा २०२५ चा समारोप समारंभ दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी काडसिद्धेश्वर हायस्कूल,कणेरी येथे अत्यंत दिमाखात पार पडला.या समारोप समारंभास परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी, महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. श्री हसन मुश्रीफ तसेच प्राध्यापक डॉ. मिलिंद निकुंभ (प्र-कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक) उपस्थित होते.
समारोप प्रसंगी विजेत्या खेळाडूंना व संघांना मेडल्स, प्रशस्तीपत्रे आणि पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना मा. हसन मुश्रीफ साहेब म्हणाले —परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी मला एका अत्यंत चांगल्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले, याचा मला आनंद आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेतील सर्व विजेत्या खेळाडूंचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचे कोल्हापूर जिल्ह्यात स्वागत करतो. दोन दिवसांत केलेल्या मैदानाच्या सजावटीसाठी आणि उत्तम नियोजनासाठी मी आयोजकांचे विशेष कौतुक करतो.
हरलेल्यांनी हार न मानता पुन्हा प्रयत्न करावेत, कारण प्रयत्नशील व्यक्तीच खऱ्या अर्थाने विजेते असतात.
कणेरी मठाला तेराशे वर्षांचा वैभवशाली इतिहास लाभला आहे. सिद्धगिरी हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरिबांना कमी दरामध्ये उपचार उपलब्ध करून देणे, हजारो मुलांना दत्तक घेऊन त्यांना अधिकारी बनविणे आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून हजारो मुलींना स्वावलंबी बनविणे — हे सिद्धगिरी संस्थानचे अतुलनीय कार्य आहे.
दोन दिवसांचे हे असाधारण नियोजन हे ईश्वरीय शक्तीचे प्रतीक आहे. अशा ठिकाणी येणे ही प्रेरणादायी बाब आहे.या प्रसंगी परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी आपल्या आशीर्वचनात सांगितले. डेव्हलपमेंट स्पर्धेच्या होत नाही, खेळातून एक मनोभावना तयार होते. राष्ट्रीय भावीक्य निर्माण करणारा हा खेळ आहे. या खेळातून परस्परांचा परिचय होतो, एक नवीन नातं तयार होतं. हरलेल्यांच्या त्यागामुळे जिंकलेल्यांचा विजय होतो.
शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा यांचा संगम समाजाला सबल बनवतो. सिद्धगिरी संस्थान शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सातत्याने जनहिताचे कार्य करत राहील.समारोप सोहळ्याचे सूत्रसंचालन विवेक सिद्ध यांनी केले, तर आभार यशोवर्धन बारामतीकर यांनी मानले. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी डॉ. देवेंद्र पाटील, राजकुमार पाटील, एम डी पाटील, विजय सनगर, यशोवर्धन बारामतीकर, गुंडोपंत वड, गुरुनाथ पांगम,विवेक शेट्ये, निशांत पाटील, अलका शेट्ये, सुजित पाटील, प्रसाद नेवरेकर, रेगिना सातवेकर यांच्यासह महाराष्ट्र भरातून विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.या भव्य स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी, तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिकारी व क्रीडा विभाग यांनी परिश्रम घेतले.या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, संघभावना, शिस्त आणि नेतृत्वगुण वृद्धिंगत झाल्याचे सर्व मान्यवरांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments