Thursday, January 2, 2025
Home माय मराठी ग्रामविकास मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्यामुळेच आंबेओहोळ प्रकल्प पूर्णत्वाला....

ग्रामविकास मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्यामुळेच आंबेओहोळ प्रकल्प पूर्णत्वाला….

ग्रामविकास मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्यामुळेच आंबेओहोळ प्रकल्प पूर्णत्वाला

आजरा, गडहिंग्लजमधील प्रमुख कार्यकर्त्यांचा पलटवार

मंत्री मुश्रीफसाहेबांनीच प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणले दृष्टिक्षेपात

गडहिंग्लज :  ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्यामुळेच आंबेओहळ प्रकल्प पूर्णत्वाला गेला आहे, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी केला आहे. मंत्री मुश्रीफसाहेब यांनीच प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनही दृष्टिक्षेपात आणले आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे.
या पत्रकावर माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील -गिजवणेकर, विजय वांगणेकर, बबन पाटील आदी प्रमुखांच्या सह्या आहेत.
पत्रकात पुढे म्हटले आहे, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील या भागाच्या शेतीला पाणी मिळूच नये, या राजकीय आकसातून काहीजण खटाटोप करत होते. परंतु; मोठ्या महत्प्रयासाने मंत्री श्री. मुश्रीफसाहेब यांनी हा प्रकल्प पूर्णत्वाला नेला आहे. तुडुंब भरलेल्या प्रकल्पातील पाणी आणि हिरवेगार झालेले शेतमळे बघून त्यांच्या पोटात जास्तच दुखत आहे. यावर आमच्याकडे औषध नाही.
पत्रकात पुढे म्हटले आहे, या प्रकल्पाची पायाभरणी साली २००० ला झाली. त्यानंतर २००९ साली मंत्री श्री. मुश्रीफ या भागाचे आमदार झाले. त्यानंतर, २०१४ या वर्षी ते जलसंपदामंत्री झाले. दरम्यान; लाभक्षेत्रातील लोक जमिनी द्यायला तयार नसल्यामुळे कोणताही प्रकल्प मार्गी लागत नव्हता. त्यावेळी जलसंपदामंत्री या नात्याने कृष्णा खोरे महामंडळाचे अध्यक्ष असलेल्या श्री. मुश्रीफसाहेब यांनी जमिनीच्या बदल्यात मोबदला म्हणून पॅकेज देण्याचे ठराव करून घेतले. काही प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन धोरणात्मक निर्णयामुळे अडले आहे, त्यासाठी राज्याचे धोरण बदलण्याची गरज आहे. काही प्रकल्पग्रस्तांच्या घरामधील वादामुळे पुनर्वसन अडले आहे. मंत्री श्री. मुश्रीफसाहेबांनी पुनर्वसन हे शेतकरी बघून केलेले आहे, पक्ष बघून नव्हे.
यापूर्वी पिण्याच्या पाणीटंचाईवर इलाज म्हणून मंत्री श्री. मुश्रीफसाहेबांनी हजारो बोअर मारलेले आहेत. यावर्षी एक ही बोअर मारावा लागलेला नाही. शेतकऱ्यांचे हे वैभव बघून विरोधकांच्या पोटात दुखत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे.

चोरांच्या उलट्या बोंबा….”
पत्रकात म्हटले आहे, राजकीय द्वेषातून काही लोक प्रकल्प पूर्ण होऊच नये म्हणून न्यायालयात गेले होते. प्रकल्पाच्या पूर्णत्वाला आडकाठी आणत होते. तेच लोक प्रकल्पग्रस्तांचा कळवळा दाखवत आहेत. हा प्रकार म्हणजे चोरांच्याच उलट्या बोंबा आहेत.

पुनर्वसन प्रकल्पग्रस्तांचे “

आंबेओहोळ प्रकल्पाचे एकूण ८४९ प्रकल्पग्रस्त आहेत. त्यापैकी, ३५७ स्वेच्छा घेतलेले आहेत. दरम्यान; ४६० मूळ पात्र प्रकल्पग्रस्त व संकलनानंतर त्यामध्ये ५४ ने वाढ झाली आहे. ८८ प्रकल्पग्रस्तांना ५२.२९ हेक्टर जमिनीचे वाटप पूर्ण झाले. २८६ प्रकल्पग्रस्ताना १५६.६० हेक्टर जमीनीसह ५७ कोटींचे पॅकेजवाटप पूर्ण झाले आहे. ४३ प्रकल्पग्रस्तांना १९ हेक्टर जमीन व सात कोटी रकमेचे पॅकेज वाटप झाले आहे. अशा पद्धतीने एकूण ४४६ शेतकऱ्यांना ६३ कोटी रक्कम वाटप झाली आहे. अशापद्धतीने ११७ जणांना जमीन वाटप,२८६ शेतकऱ्यांना पॅकेज वाटप व ४३ शेतकऱ्यांना जमीनीसह पॅकेज वाटप असे ४४६ शेतकऱ्यांचे पुनर्वसन झाले आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांना एकूण ६३ कोटी रकमेचे वाटप पूर्ण झाले आहे. अध्याप ५४ हेक्टर जमीन शेतकऱ्यांना देय आहे. तर अंशता जमीन वाटप झालेल्या व जमीन मागणाऱ्या २९ प्रकल्पग्रस्तांना २० हेक्टर जमीन देय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोरगावकर ग्रुपचे  आचला फार्म हाऊस  पर्यटकांच्या सेवेत दाखल

कोरगावकर ग्रुपचे  आचला फार्म हाऊस  पर्यटकांच्या सेवेत दाखल कोल्हापूर/प्रतिनिधी : मसाई पठार जवळ कोरगावकर ग्रुप कडून उभा करण्यात आलेल्या *आचला फार्म हाऊस* पर्यटकांचा सेवेत दाखल...

सतेज कृषी प्रदर्शनास सुरुवात,३० डिसेंबर पर्यंत चालणार प्रदर्शन

तपोवन मैदानावर दि. २७ ते ३० डिसेंबर २०२४ चार दिवस सतेज कृषी प्रदर्शन सतेज कृषी प्रदर्शनास सुरुवात,३० डिसेंबर पर्यंत चालणार प्रदर्शन कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली...

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम   कोल्हापूर/प्रतिनिधी : मोटोहॉस, केएडब्लू व्हेलोसे मोटर्स प्रा. लि....

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले ईलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने संपूर्ण भारतात ४,००० स्टोअरच्या...

Recent Comments