Sunday, January 19, 2025
Home ताज्या भाजप नेते राहुल देसाई यांचा काँग्रेसमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश

भाजप नेते राहुल देसाई यांचा काँग्रेसमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश

भाजप नेते राहुल देसाई यांचा काँग्रेसमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश

कोल्हापूर/प्रतिनिधी : भाजपचे कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल बजरंग देसाई यांनी राधानगरी, भुदरगड विधानसभा मतदार संघातील आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज आणि माझ्या उपस्थितीमध्ये आज सोमवार 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी देसाई कुटुंबियांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या तीन पिढ्यांनी काँग्रेस पक्षासाठी काम केले आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेल्या राहुल यांच्या स्वगृही परतण्याने या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे बळ मिळाले आहे.
यावेळी माजी आमदार बजरंग आण्णा देसाई, पी.डी. धुंदरे, सदाशिवराव चरापले, आर. के. मोरे, शामराव देसाई, प्रकाश देसाई, प्रकाश कुलकर्णी, सचिन घोरपडे, विश्वजीत जाधव, जीवन पाटील, दिनकर कांबळे, धोंडीराम मगदूम, हिंदुराव चौगुले, संजयसिंह पाटील, विश्वनाथ पाटील, एस. एन. पाटील, पांडुरंग भांदिगरे, संजय सावंत, दिग्वीजय कुऱ्हाडे, नौशाद बुडेखान, बाळासाहेब गुरव, भुजंगराव मगदुम, संजय सरदेसाई यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कंदमुळे आणि औषधी वनस्पतींचे भव्य प्रदर्शन १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी

कंदमुळे आणि औषधी वनस्पतींचे भव्य प्रदर्शन १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी १०० हून अधिक कंदमुळे आणि १५० हून अधिक औषधी वनस्पती होणार प्रदर्शित   कोल्हापूर/प्रतिनिधी :...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिप्लोमा अभियांत्रिकी, शॉर्ट-टर्म विभाग, आयटीआय सर्व शाखांच्या क्रीडा स्पर्धा २०२४-२५ इन्स्टिट्यूटचे...

ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स” या CBSE प्रशिक्षण कार्यक्रमाचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन

ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स" या CBSE प्रशिक्षण कार्यक्रमाचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन   कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे "ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स" या सीबीएसई...

सीमा लढ्याच्या खटल्यात महाराष्ट्र सरकारने अनास्था दूर करून मराठी भाषिकांना न्याय द्यावा ! – मनोहर किणेकर, महाराष्ट्र एकीकरण समिती

सीमा लढ्याच्या खटल्यात महाराष्ट्र सरकारने अनास्था दूर करून मराठी भाषिकांना न्याय द्यावा ! - मनोहर किणेकर, महाराष्ट्र एकीकरण समिती कोल्हापूर, १७ जानेवारी (वार्ता.) - महाराष्ट्र...

Recent Comments