Saturday, January 11, 2025
Home ताज्या दौलतनगर येथे झोपडपट्टीधारकांच्या प्रॉपर्टीकार्डसाठी - आ. ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून विशेष शिबिर

दौलतनगर येथे झोपडपट्टीधारकांच्या प्रॉपर्टीकार्डसाठी – आ. ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून विशेष शिबिर

दौलतनगर येथे झोपडपट्टीधारकांच्या प्रॉपर्टीकार्डसाठी – आ. ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून विशेष शिबिर

कोल्हापूर/प्रतिनिधी : पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील यांच्यावतीने सोमवारी दौलतनगर येथे झोपडपट्टीवासियांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रॉपर्टी कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे यावेळी जमा करून घेण्यात आली.दौलतनगर, शाहूनगर परिसरात अनेक वर्षपासून वास्तव्य करत असलेल्या झोपडपट्टीधारकांकडे प्रॉपर्टी कार्ड नसल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मर्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.या प्रयत्नामुळे काही झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्यात यश मिळाले आहे. मात्र शेकडो झोपडपट्टी धारक आजही प्रॉपर्टी कार्डच्या प्रतीक्षेत आहे. या लोकांना हक्काचे प्रॉपर्टीकार्ड मिळवून देण्यासाठी सोमवारी आमदार ऋतुराज पाटील यांच्यावतीने जगदाळे कॉलनी येथील सभागृहात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रॉपर्टी कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे, त्याबाबतची प्रक्रिया याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळी माहिती दिली, तसेच आवश्यक कागदपत्रे जमा करून घेण्यात आली. यावेळी पाचशेहून अधिक झोपडपट्टी धारक उपस्थित होते.

बांधकाम कामगार नोंदणी –  पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकारातून बांधकाम कामगार नोंदणी मोहीम सध्या राबवली जात आहे. या शिबिरावेळी परिसरातील बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली. यावेळी डी.डी. पाटील, तानाजी लांडगे, अनिल कलकुटकी, माजी नगरसेविका छाया पवार, उमेश पवार,  सुरेश माने (अब्बास), अनिल देवकर, अमोल देशिंगकर, जितू ढोबळे, टिंकू दिंडे, विनोद सातपुते व शाहू नगर व दौलत नगर मधील कार्यकर्ते, झोपडपट्टी धारक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे नवीन...

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन – गणी आजरेकर यांनी दिली माहिती

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन - गणी आजरेकर यांनी दिली माहिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूर/ (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.आज सोमवार,दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी...

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान कोल्हापूर/प्रतिनिधी : आरोग्य, पर्यावरण, व्यसनाधीनता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन...

Recent Comments