दौलतनगर येथे झोपडपट्टीधारकांच्या प्रॉपर्टीकार्डसाठी – आ. ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून विशेष शिबिर
कोल्हापूर/प्रतिनिधी : पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील यांच्यावतीने सोमवारी दौलतनगर येथे झोपडपट्टीवासियांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रॉपर्टी कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे यावेळी जमा करून घेण्यात आली.दौलतनगर, शाहूनगर परिसरात अनेक वर्षपासून वास्तव्य करत असलेल्या झोपडपट्टीधारकांकडे प्रॉपर्टी कार्ड नसल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मर्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.या प्रयत्नामुळे काही झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्यात यश मिळाले आहे. मात्र शेकडो झोपडपट्टी धारक आजही प्रॉपर्टी कार्डच्या प्रतीक्षेत आहे. या लोकांना हक्काचे प्रॉपर्टीकार्ड मिळवून देण्यासाठी सोमवारी आमदार ऋतुराज पाटील यांच्यावतीने जगदाळे कॉलनी येथील सभागृहात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रॉपर्टी कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे, त्याबाबतची प्रक्रिया याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळी माहिती दिली, तसेच आवश्यक कागदपत्रे जमा करून घेण्यात आली. यावेळी पाचशेहून अधिक झोपडपट्टी धारक उपस्थित होते.
बांधकाम कामगार नोंदणी – पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकारातून बांधकाम कामगार नोंदणी मोहीम सध्या राबवली जात आहे. या शिबिरावेळी परिसरातील बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली. यावेळी डी.डी. पाटील, तानाजी लांडगे, अनिल कलकुटकी, माजी नगरसेविका छाया पवार, उमेश पवार, सुरेश माने (अब्बास), अनिल देवकर, अमोल देशिंगकर, जितू ढोबळे, टिंकू दिंडे, विनोद सातपुते व शाहू नगर व दौलत नगर मधील कार्यकर्ते, झोपडपट्टी धारक उपस्थित होते.