संघवी मीनाबाई पोपटलाल शहा हॉस्पिटलच्या वतीने ज्येष्ठ नागरिक महिला यांच्यासाठी १ जुलै ते ३० जुलै मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
कोल्हापूर/प्रतिनिधी : मंगळवार पेठ येथील सांगवी मीनाबाई पोपटलाल शहा हॉस्पिटलच्या वतीने १ जुलै ते ३० जुलै २०२५ या कालावधीसाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी संपूर्ण आरोग्य तपासणी आणि उपचार मोफत करण्याचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती डॉ. राजेंद्र महादेव वराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.या शिबिरामध्ये जनरल तपासणी इंजेक्शन औषधे तसेच रक्तातील शुगर अन्य रक्त तपासण्या केल्या जाणार आहेत शिवाय अन्य तपासणीसाठी वेगवेगळ्या रुग्णालयाच्या माध्यमातून २० टक्के सवलत दिली जाणार आहे.तसे पत्र तपासणी शिबिरामध्ये तपासणी करणाऱ्या व्यक्तीला दिले जाणार आहे.
या हॉस्पिटलच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष वैद्यकीय क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. २९ जून २०२५ रोजी संघवी रौनक पोपटलालजी शहा यांचा जन्मदिन होता या जन्मदिनाच्या औचित्य साधून हे एक महिन्याचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.सध्या पावसाळा असल्यामुळे आजारी पडणे,व्हायरल इन्फेक्शन वाढत चालले आहे शिवाय तपासणी आणि उपचार हे महिला आणि.जेष्ठ नागरिक यांना परवडत नसल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आतापर्यंत या हॉस्पिटलच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविले गेले आहेत गेली सहा वर्षापासून हे शिबिर घेतले जात आहे. येथील पद्माराजे गर्ल्स हायस्कूल मधील मुलींनाही या शिबिर च्या माध्यमातून लाभ देण्यात आलेला आहे खास करून या शिबिरामध्ये महिलांच्या आरोग्य तपासणीला अधिक भर दिला जाणार आहे. आतापर्यंत एक हजार रुग्णांची डोळ्यांची तपासणी केली गेली आहे. या मोफत आरोग्य शिबिरासाठी डॉ.प्रकाश चौगुले डॉ.सुशांत पाटील सहकार्य करणार आहेत.शिवाय या जन्मदिनाचे औचित्य साधून देवाळी ग्रामपंचायत येथे ७०० जंगली रोपे लावण्याचा उपक्रमही पार पडलेला आहे. असे डॉक्टर रवींद्र वराळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी गणेश पाटील उपस्थित होते.