“स्वर्गीय. कै. अभिजित कदम यांच्या जयंतीनिमित्त भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल, कोल्हापूर वतीने विनम्र अभिवादन ”
कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल, कोल्हापूर येथे गुरूवार दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी स्वर्गीय कै. अभिजित कदम (दादा) यांच्या जयंतीनिमित्त भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचे, प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे, उपप्रचार्य डॉ. एम. एस. भाटीया, प्रा. आर. जे. जरग यांच्या हस्ते कै. अभिजित कदम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या जयंतीच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे सरांनी कै अभिजित दादांच्या आठवणींना उजाळा दिला, राज्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री, भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती मा. डॉ. पतंगरावजी कदमसाहेब यांना तीन मुले त्यामध्ये सर्वात ज्येष्ठ कै. अभिजित कदम, डॉ. अस्मिता जगताप संचालक, भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेस, डॉ. विश्वजीत कदम भारती विद्यापीठाचे कार्यवाह, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू. भारती विद्यापीठाच्या सुरूवातीच्या कालखंडामध्ये कै. अभिजित कदम यांच्या रूपाने भारती विद्यापीठास उच्चशिक्षित विनयशील नेत्तृव लाभले, त्यांनी भारती विद्यापीठाच्या विकासाची धुरा समर्थपणे पेलली होती. भारती विद्यापीठाची कालानुसार पुननिर्मिती करण्याचे कार्य केले. आधुनिक शिक्षण प्रणाली, तंत्रज्ञान, संगणीकरणाव्दारे या रोपट्याचे जाळे वटवृक्षात केले आहे. परंतु नियतिने त्यांना अल्पआयुष्य दिले. कै. अभिजित दादांच्या जाण्याने विद्यापीठामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली.परंतु त्यांची शिकवण, विचारधारा आणि कार्यपद्धती आपणा सर्वासाठी प्रेरणादायी ठरतील हीच दादांना खरी आदरांजली…!
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच.एन.मोरे, उपप्राचार्य डॉ. एम. एस. भाटीया, प्रा. डॉ. एन. एम. भाटीया, प्रा. आर. जे. जरग, प्रा. डॉ. ए. जे. शिंदे, प्रा. डॉ. डी. ए. भागवत, प्रा. डॉ. एफ. ए. तांबोळी, प्रा.पी. पी. चौधरी, प्रा. डी. व्ही. माऊली, प्रा. आशा जाधव, प्रा. विशिन पाटील, प्रा. एस. एम. रजपूत, श्री. किशोर हराळे तसेच शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते.