Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्याउद्योगपती आण्णासाहेब चकोते यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

नांदणी/प्रतिनिधी : चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज व गणेश बेकरी नांदणीचे चेअरमन, बेकरी उद्योगाचे महामेरु, आण्णासाहेब चकोते यांचा वाढदिवस उत्साहात विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमीत्त नांदणी गावामध्दे आयोजीत केलेल्या रक्तदान शिबीरामध्दे २६५ रक्तदात्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. यावेळी रुग्णा-लयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले. वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून प्रत्येकाने एक तरी वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन केले पाहिजे ह्या विचाराची अंमलबजावणी करत आपल्या नांदणी येथील नवीन प्रकल्प व परिसरात वृक्षारोपण करणेत आले.
चकोते उद्योग समुहातील सर्व कर्मचारी यांचे उपस्थितीत व गतीमंद मुलांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सर्व चकोते परिवार उपास्थित होते. यावेळी सन्मती विध्यालय इचलकरंजी येथील विद्यार्थानां मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. ऑल इंडीया ब्रेड मॅन्युफॅक्चरीग असोशिएशन दिल्लीच्या सिनियर व्हाईस प्रेसिडेंट या पदावर सलग सातव्यांदा फेरनिवड झालेबद्दल मॅनेजमेंट ग्रुप, ऑफीस स्टाफ व सर्व कर्मचारी वर्गाकडून आण्णासाहेब चकोते यांचा भव्य सत्कार करणेप्त आला.
-सत्काराला उत्तर देताना औद्योगीक क्षेत्रात यशस्वीरित्या काम करत असताना सामाजिक कर्तव्याची जाण ठेवून कुटुंब प्रमुख म्हणूण माझ्या गणेश बेकरी कुटुंबांप्रती, समाजाप्रती माझी भुमिका मी निभावित आहे. त्याचा आनंद व समाधान मला परत उत्साह आणि उर्मी देत असतात आणि त्यांचे प्रेम व सहकार्य हीच माझी खरी ताकत आहे. चकोते ग्रुपच्या माध्यमातून जे पुरस्कार व सन्मान प्राप्त होतात याचे सर्व श्रेय आपले कर्मचारी वर्ग यांचे आहे. अशी भावना चकोते यांनी व्यक्त केली. आज मार्केटमध्ये मंदीचे सावट आहे, कच्च्या मालाचे दर वाढत आहेत अशा स्पर्धेच्या युगात आपल्या क्वालिटी मध्ये कोणतीही तडजोड न करता ग्राहकांच्या आवडीची व ग्राहकाना परवडणारी उत्पादने देणेच्या दृष्टीने आपली योग्य वेळेत सर्विस देने ही काळाची गरज आहे त्यादृष्टीने आपले योगदान मिळावे अशी अपेक्षा करून कर्मचारी हिताच्या योजना आपण सक्षमपणे राबविलेल्या असून सर्वांची स्वप्ने, आशा-अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्ठीने आपण प्रयल करु अशी ग्वाही दिली.
दिवसभरामध्ये माजी आरोग्य राज्य मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, जि.प. सदस्य राहुल आवाडे, शेखर पाटील, संजय शिदे आदींनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या तर माजी गृहराज्य मंत्री
सतेज उर्फ बंटी पाटील, उद्योगपती संजय घोडावत, माजी खासदार राजु शेट्टी, जेष्ठ नेते बाबा देसाई यानी फोनवरून शुभेच्छा दिल्या सर्वच स्थरातून शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संखेने विविध मान्यवर, सामाजीक, राजकीय शैक्षणीक, औद्योगीक, व नांदणी ग्रामस्थ, नरुण मंडळे पदाधिकारी पत्रकार बंधु, वितरक, व्यापारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments