Wednesday, November 19, 2025
spot_img
Homeताज्याडी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा बीव्हीजी कंपनीसोबत सामंजस्य करार

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा बीव्हीजी कंपनीसोबत सामंजस्य करार

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा बीव्हीजी कंपनीसोबत सामंजस्य करार

कसबा बावडा/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण व उत्तम इटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथील बीव्हीजी इंडिया लि. कंपनीसोबत सामंजस्य करार केला. २००० कोटींच्यावर उलाढाल असलेला बीव्हीजी उद्योग समुह विविध क्षेत्रात कार्यरत आहे. या समुहात सध्या ७०,००० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीच्यावतीने पुणे येथे आयोजित ‘ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिट’ वेळी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हा करार करण्यात आला.
यावेळी बोलताना बीव्हीजी इंडिया लि चे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड म्हणाले, विविध कौशल्यप्राप्त युवक युवतींना मोठ्या संधी आहेत. विद्यार्थ्यानी नियमित
अभ्यासाबरोबरच छोटे छोटे कॉर्सेस करुन स्वतःला अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. या प्रक्रियेमध्ये बीव्हीजी इंडिया लि. आपणास आवश्यक ते सर्व सहकार्य करेल. कौशल्ययुक्त सेवेच्या माध्यमातून जगावर ठसा उमटविण्याची अनोखी संधी प्राप्त झाली आहे. त्यासाठी उद्योग, महाविद्यालयांनी एकत्रित आले पाहिजे.यावेळी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे अध्यक्ष डॉ. शीतलकुमार रवांदळे, सचिव डॉ. संजय जाधव, उपाध्यक्ष व कॅम्पस टीपीओ श्री.सुदर्शन सुतार, बीव्हीजी च्या ग्लोबल प्रेसिडेंट रूपल सिन्हा, संचालक वैशालीताई गायकवाड, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मकरंद काईंगडे उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे यांचे सहकार्य व प्रोत्साहन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments