Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्यारूईकर कॉलनी मैदानावर साकारणार दीडशे फुट बाय दीडशे फुट इतक्या भव्य आकाराची...

रूईकर कॉलनी मैदानावर साकारणार दीडशे फुट बाय दीडशे फुट इतक्या भव्य आकाराची दिव्यांची रांगोळी

रूईकर कॉलनी मैदानावर साकारणार दीडशे फुट बाय दीडशे फुट इतक्या भव्य आकाराची दिव्यांची रांगोळी

कोल्हापूर/प्रतिनिधी : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळयानिमित्त कोल्हापुरात विविध उपक्रम होत आहेत. भाजपतर्फे खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकाराने रूईकर कॉलनी मैदानावर दीडशे फुट बाय दीडशे फुट इतक्या भव्य आकाराची दिव्यांची रांगोळी साकारली जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रसिध्द संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांच्या गीतरामायण कार्यक्रमांचे प्रक्षेपण होणार आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता होणार्‍या या सोहळयासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
अयोध्येमध्ये २२ जानेवारीला होणार्‍या प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त, कोल्हापुरातील रूईकर कॉलनी मैदानावर १५० फूट बाय १५० फूट इतक्या भव्य आकाराची दिव्यांची रांगोळी साकारणार आहे. तसेच प्रसिद्ध संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांच्या गीत रामायणाच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता रांगोळी आणि सात वाजता गीत रामायणाच्या प्रक्षेपण कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments