Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

समृद्ध मातृत्व अभियानाच्या राष्ट्रीय उपक्रमाला कोल्हापुरातून दिशा; नवी दिल्ली येथे ५ व ६ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्तरावर झाली व्यापक चर्चा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी जिल्हा दौरा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शिक्षणमहर्षी डॉ डी. वाय. पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शिक्षणविश्वावर शोककळा! पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अल्ट्राव्हायोलेटने कोल्हापूरमध्ये नवीन एक्स्पिरियन्स सेंटर सुरू करत महाराष्ट्रातील विस्ताराला दिली गती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

घरकुलांमुळे संपूर्ण कुटुंबाचेच जीवनमान आणि राहणीमान उंचावते : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही,मंत्री हसन मुश्रीफ यांची स्पष्टोक्ती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड

Tile List

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पेपरफुटी विरोधात शनिवारी काँग्रेसची धरणे आंदोलन व कॅन्डल मार्च,राजारामपुरीतून सायबर कॉलेजपर्यंत निघणार मार्च

पेपरफुटी विरोधात शनिवारी काँग्रेसची धरणे आंदोलन व कॅन्डल मार्च,राजारामपुरीतून सायबर कॉलेजपर्यंत निघणार मार्च   कोल्हापूर/प्रतिनिधी : देशभरात सातत्याने होणाऱ्या परीक्षांच्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थी व पालकांचे…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून लाखो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देवू : आ.राजेश क्षीरसागर

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना मिळावी विठुरायाला १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सद्बुद्धी दिंडीने साकडे

Tile Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

‘राह-वीर’ नागरिकांना मिळणार २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक

‘राह-वीर’ नागरिकांना मिळणार २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक कोल्हापूर/प्रतिनिधी : रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTI) देशातील रस्ते अपघात आणि…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापूर मधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तारीख पे तारीख

कोल्हापूर मधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तारीख पे तारीख कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरमधील रस्त्यांच्या स्थितीबाबत कोणतेही समाधानकारक काम न करता आज प्रतिवादी महानगर…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गर्भलिंग निदान व अवैध गर्भपाताविरोधातील कारवाईत दोषसिद्धी वाढवा; प्रतिबंधात्मक यंत्रणा अधिक सक्षम करा : डॉ. नीलम गोऱ्हे

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी नतमस्तक; विधानपरिषदेत पुन्हा संधी मिळाल्याबद्दल आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मानले देवीचे आभार

List Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

“स्व. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी”; आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाटील कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट

"स्व. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी"; आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाटील कुटुंबीयांची घेतली…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महान शिल्पकार बी. आर. खेडकर : कलेचा अमूल्य वारसा

महान शिल्पकार बी. आर. खेडकर : कलेचा अमूल्य वारसा शिल्पकार बी. आर. खेडकर यांच्या शताब्दी महोत्सवानिमित्त प्रासंगिक लेख मातीत जन्मलो…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन कोल्हापूर, दि. ९: राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या नर्सरीबाग येथील समाधीस्थळी मुख्यमंत्री…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार

लवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज; थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक,…

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शिक्षणमहर्षी डॉ डी. वाय. पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शिक्षणविश्वावर शोककळा! पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अल्ट्राव्हायोलेटने कोल्हापूरमध्ये नवीन एक्स्पिरियन्स सेंटर सुरू करत महाराष्ट्रातील विस्ताराला दिली गती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

घरकुलांमुळे संपूर्ण कुटुंबाचेच जीवनमान आणि राहणीमान उंचावते : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही,मंत्री हसन मुश्रीफ यांची स्पष्टोक्ती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

श्री एकमुखी दत्त देवस्थान वतीने २७ ऑगस्ट रोजी भव्य कावड यात्रेचे आयोजन – जुन्या आध्यात्मिक परंपरेचा पुन प्रारंभ

श्री एकमुखी दत्त देवस्थान वतीने २७ ऑगस्ट रोजी भव्य कावड यात्रेचे आयोजन – जुन्या आध्यात्मिक परंपरेचा पुन प्रारंभ   ​कोल्हापूर/प्रतिनिधी…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

‘राह-वीर’ नागरिकांना मिळणार २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक

‘राह-वीर’ नागरिकांना मिळणार २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक कोल्हापूर/प्रतिनिधी : रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTI) देशातील रस्ते अपघात आणि…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापूर मधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तारीख पे तारीख

कोल्हापूर मधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तारीख पे तारीख कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरमधील रस्त्यांच्या स्थितीबाबत कोणतेही समाधानकारक काम न करता आज प्रतिवादी महानगर…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गर्भलिंग निदान व अवैध गर्भपाताविरोधातील कारवाईत दोषसिद्धी वाढवा; प्रतिबंधात्मक यंत्रणा अधिक सक्षम करा : डॉ. नीलम गोऱ्हे

गर्भलिंग निदान व अवैध गर्भपाताविरोधातील कारवाईत दोषसिद्धी वाढवा; प्रतिबंधात्मक यंत्रणा अधिक सक्षम करा : डॉ. नीलम गोऱ्हे पीसीपीएनडीटी कायदा व…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी नतमस्तक; विधानपरिषदेत पुन्हा संधी मिळाल्याबद्दल आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मानले देवीचे आभार

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी नतमस्तक; विधानपरिषदेत पुन्हा संधी मिळाल्याबद्दल आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मानले देवीचे आभार कोल्हापूर/प्रतिनिधी…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

“स्व. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी”; आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाटील कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट

“स्व. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी”; आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाटील कुटुंबीयांची घेतली…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महान शिल्पकार बी. आर. खेडकर : कलेचा अमूल्य वारसा

महान शिल्पकार बी. आर. खेडकर : कलेचा अमूल्य वारसा शिल्पकार बी. आर. खेडकर यांच्या शताब्दी महोत्सवानिमित्त प्रासंगिक लेख मातीत जन्मलो…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन कोल्हापूर, दि. ९: राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या नर्सरीबाग येथील समाधीस्थळी मुख्यमंत्री…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार

लवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज; थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक,…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते १८५० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संगीतसूर्य…

श्री एकमुखी दत्त देवस्थान वतीने २७ ऑगस्ट रोजी भव्य कावड यात्रेचे आयोजन – जुन्या आध्यात्मिक परंपरेचा पुन प्रारंभ

श्री एकमुखी दत्त देवस्थान वतीने २७ ऑगस्ट रोजी भव्य कावड यात्रेचे आयोजन – जुन्या आध्यात्मिक परंपरेचा पुन प्रारंभ

 

​कोल्हापूर/प्रतिनिधी : ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या करवीर नगरीला (कोल्हापूर) शतकानुशतकांची उज्ज्वल आणि दैवी परंपरा लाभली आहे. याच परंपरेचा एक मुख्य भाग असलेल्या ‘कावड व जलाभिषेक परंपरेचे’ ऐतिहासिक, धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी येत्या २७ ऑगस्ट रोजी भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे . मंगळ वार पेठेतील श्री एक मुखी दत्त मंदिर यांच्यावतीने आयोजन करण्यात येत आहे अशी माहिती प्रमुख संयोजक संतोष गिरी गोसावी महाराज आणि पारस ओसवाल यांनी दिली.यावेळी किशोर घाटगे, महेश पाटील , संतोष गिरी गोसावी (माऊली ) उपस्थित होते.
२७ रोजी सकाळी नऊ वाजता पंचगंगा घाट येथे दत्तपादुकावर जलाभिषेक करून कावडीने पंचगंगा नदीची पाणी गंगावेस श्रीकृष्ण सरस्वती महाराज मठी छत्रपती शिवाजी महाराज मुजरा गुजरी जैन मंदिर श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिर महाद्वार रोड बिनकामी गेले मंदिर मार्गे एकमुखी दत्त मंदिर येथेही कावड यात्रा येणार आहे त्या ठिकाणी भव्य आरती आणि महाप्रसादाने याची सांगता होणार असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.कोल्हापूरच्या अध्यात्मिक परंपरेची नवी ओळख अधिक व्यापक अशी ही कावड यात्रा आसणार आहे . यांच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते अरुण गवळी, मिलिंद कुलकर्णी,राजेंद्र मकोटे, सागर ठाणेकर यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्ते सक्रियपणे कार्यरत आहेत.या कावड यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व युवकाना एक मुखी दत्त मंदिराच्या वतीने टी-शर्ट देण्यात येणार आहे . यासाठी नाव नोंदणी एकमुखी दत्त मंदिर मिरजकर तिकटी येथे सुरू आहे.या कावड यात्रेची आध्यात्मिकसह विविध पैलूची परंपरा अशी आहे छत्रपती घराण्याची कावड व जलाभिषेक परंपरा,​राजाश्रय आणि संस्कृती संवर्धन: महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर संस्थांनकाळात छत्रपती घराण्याने हिंदू धर्म, संस्कृती आणि प्राचीन परंपरांच्या संवर्धनाला नेहमीच राजाश्रय दिला.
​पंचगंगेचे पवित्र जल व मान-मरातब: श्रावण महिन्यात किंवा विशेष पर्वावर पंचगंगा नदीच्या पात्रातून पवित्र जल कलशात भरून अत्यंत मान-मरातबाने आणि वाजत-गाजत कावड आणली जात असे.​श्री अंबाबाई व जोतिबा मंदिरातील अभिषेक: मोहिमेवर जाण्यापूर्वी किंवा कोणत्याही मोठ्या कार्याची सुरुवात करण्यापूर्वी छत्रपती घराण्याकडून देवीला आणि स्थानिक देवस्थानांना जलाभिषेक केला जाई. श्रावणात विशेष कावडीद्वारे आणलेले जल श्री महालक्ष्मीच्या पिंडीवर आणि उपदेवतांना अर्पण करण्याची प्राचीन परंपरा होती.
​लोकसहभाग: ही राजघराण्याची परंपरा असल्याने कावड यात्रा हा केवळ वैयक्तिक विधी न राहता त्याला एका मोठ्या सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले.
​ प्राचीन करवीर नगरीतील कावड व जलाभिषेकाचे महत्त्व
​शैव आणि शाक्त पीठाचा संगम: करवीर हे क्षेत्र जसे आदिशक्ती श्री महालक्ष्मीचे (अंबाबाई) साडेतीन पीठांपैकी एक प्रमुख पीठ आहे, तसेच ते ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाणारे जागृत शिवक्षेत्रही आहे. कावडीच्या माध्यमातून शिव आणि शक्ती (हर आणि हरी) यांचा एकाच वेळी जलाभिषेकाने अद्वितीय समन्वय साधला जातो.
​नदी संगमाचे पवित्र जल: करवीर क्षेत्र हे पंचगंगा आणि इतर गुप्त प्रवाहांच्या संगमामुळे अत्यंत पवित्र मानले गेले आहे. येथील तीर्थातून जलग्रहण करून अनवाणी चालत जाऊन आराध्य देवतेला जल अर्पण करणे ही कठोर तपश्चर्या आणि आत्मशुद्धी मानली जाते.​भक्ती व संयमाचे प्रतीक: कावड यात्रा ही केवळ शारीरिक श्रम नसून, अत्यंत कठोर व्रतवैकल्ये, संयम आणि निसर्गातील पवित्र जल प्रवाहित करून देवतेप्रति वाहिलेली निस्सीम भक्ती आहे.
पौराणिक व संत परंपरेतील संदर्भ ​पौराणिक संदर्भ: स्कंद पुराण आणि ‘करवीर माहात्म्य’ या ग्रंथांमध्ये येथील तीर्थक्षेत्रांचे वर्णन आढळते. ऋषी-मुनींनी आणि देवतांनीसुद्धा या भूमीत येऊन श्री महालक्ष्मी व विविध शिवलिंगांवर जलाभिषेक केल्याचे उल्लेख धार्मिक ग्रंथांत आहेत.​दत्त संप्रदाय व नाथ पंथ: कोल्हापूर हे श्री दत्तगुरूंची भिक्षाभूमी आणि निवासस्थान मानले जाते. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी करवीर नगरीत वास्तव्य केले. संत ज्ञानेश्वर महाराज, स्वामी समर्थ यांसारख्या अनेक महात्म्यांनी करवीर नगरीत येऊन जलाभिषेक व पूजा केल्याचे दाखले मिळतात.कावड व जलाभिषेकाची ही परंपरा म्हणजे केवळ एक विधी नसून तो आपल्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि अध्यात्माचा अमूल्य वारसा आहे. या प्राचीन सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा वारसा जपणे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे.

‘राह-वीर’ नागरिकांना मिळणार २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक

राह-वीर’ नागरिकांना मिळणार २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक

कोल्हापूर/प्रतिनिधी : रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTI) देशातील रस्ते अपघात आणि मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘राह-वीर’ (पूर्वीची गुड समेरिटन योजना) योजनेची घोषणा केली आहे. अपघातातील गंभीर जखमींना पहिल्या महत्त्वाच्या तासात (गोल्डन अवर) तातडीने मदत करून त्यांचे प्राण वाचवणाऱ्या नागरिकांना या योजनेअंतर्गत आर्थिक प्रोत्साहन दिले जाणार आहे.या योजनेंतर्गत प्रत्येक पात्र ‘राह-वीर’ व्यक्तीला २५ हजार रुपये रोख पारितोषिक आणि प्रशंसा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. एकाच गंभीर अपघातात एकापेक्षा अधिक नागरिकांनी मिळून एखाद्याचा जीव वाचविल्यास २५ हजार रुपयांची रक्कम संबंधित मदतगारांमध्ये समान विभागली जाईल. एका व्यक्तीला एका वर्षात जास्तीत जास्त पाच वेळा या पारितोषिकाचा लाभ घेता येईल. वर्षभरात देशभरातून निवडलेल्या १० उत्कृष्ट ‘राह-वीर’ नागरिकांना प्रत्येकी १ लाख रुपये, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात येणार आहे.
मोटार वाहन अपघातातील गंभीर जखमी व्यक्तीला अपघातानंतरच्या पहिल्या एका तासाच्या आत जवळच्या रुग्णालयात किंवा ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पोहोचवून आवश्यक वैद्यकीय उपचार मिळवून देणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरू शकते. मोठी शस्त्रक्रिया करावी लागलेली व्यक्ती, किमान तीन दिवस रुग्णालयात दाखल असलेली व्यक्ती, मेंदू किंवा पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झालेली व्यक्ती किंवा उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या अपघातांचा गंभीर अपघातामध्ये समावेश होतो.
मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४A नुसार, मदत करणाऱ्या ‘राह-वीर’ नागरिकाला त्याच्या संमतीशिवाय पोलीस किंवा कायदेशीर चौकशीसाठी त्रास दिला जाऊ नये, यासाठी कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. मदतगाराला त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तक्रार निवारण समितीकडे दाद मागता येईल. मदतगाराने दिलेली माहिती गोपनीय ठेवण्यात येणार असून, ती केवळ पारितोषिकाच्या प्रक्रियेसाठी वापरली जाईल.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस ठाणे किंवा संबंधित रुग्णालय मदत करणाऱ्या व्यक्तीची नोंद करून जिल्हास्तरीय समितीकडे प्रस्ताव पाठवेल. जिल्हाधिकारी अथवा जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती प्रस्तावाची छाननी करून मंजुरी देईल. त्यानंतर पात्र मदतगाराच्या बँक खात्यात PFMS/DBT प्रणालीद्वारे पारितोषिकाची रक्कम थेट जमा करण्यात येईल.
रस्ते अपघाताच्या वेळी नागरिकांनी भीती न बाळगता मानवतेच्या भावनेतून पुढे येऊन जखमींना तातडीने मदत करावी आणि ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळवून देऊन त्यांचे प्राण वाचविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे.

कोल्हापूर मधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तारीख पे तारीख

कोल्हापूर मधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तारीख पे तारीख

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरमधील रस्त्यांच्या स्थितीबाबत कोणतेही समाधानकारक काम न करता आज प्रतिवादी महानगर पालिका कोल्हापूर, जिल्हा परिषद कोल्हापूर, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कोल्हापूर, नगर विकास मंत्रालय यांनी पुन्हा त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी पुढील तारीख देण्याची विनंती न्यायालयाला केली आणि पुढील सुनावणीसाठी उच्च न्यायालयाने दिनांक ७ सप्टेंबर ही तारीख नक्की केली आहे. सामाजिक जाणीव असलेले विचारवंत उदय नारकर, डॉ. रसिया पडळकर, डॉ. अनिल माने, भारती पोवार, एड सुनीता जाधव, डॉ. तेजस्विनी देसाई यांनी ॲड. असीम सरोदे यांच्या मार्फत दाखल केलेल्या या जनहित याचिकेतून रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे समस्त कोल्हापूरकरांच्या शारीरिक त्रासाबाबत पुराव्यांसह मांडणी करण्यात आलेली आहे.
खरे तर उच्च न्यायालयातील या जनहित याचिकेमुळे प्रशासनाने कोल्हापुरातील रस्त्यांची कामे सुरु केलेली आहेत. मागील सहा महिन्यांपासून प्रतिवादींतर्फे न्यायालयाची दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे असा आरोप याचिकाकरते उदय नारकर यांनी केला.
कोल्हापूर शहरातील रस्ते गेली अनेक वर्षे खराब होत चाललेले आहेत परंतु रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष केले जातेय असा आरोप करणाऱ्या या जनहित याचिकेवर कुणीच गंभीर विचार करताना आणि सकारात्मक पावले उचलतांना दिसत नाहीत. कोल्हापूरातील रस्ते पावसामुळे खराब झाल्याचे कारण प्रशासनातर्फे देण्यात येते हा बेजाबदारपणा आहे व रस्त्यांची अवस्था अत्यंत गंभीर आहे असे रसिका पडळकर म्हणाल्या.
सध्या अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने केली जाणारी कोल्हापूर शहरातील रस्त्यांची डागडुजी आक्षेपाहार्य आहे त्यामुळे न्यायालय पुढील तारखेला नक्कीच अधिक खोलवर जाऊन सुनावनी करेल असा विश्वास ॲड. असीम सरोदे यांनी व्यक्त केला. कोठेही, कशाही पद्धतीने रस्ते उकरायला दिली जाणारी परवानगी आणि विविध युटिलिटी च्या कामांसाठी उकरलेले रस्ते यामुळे कोल्हापूर शहर हे एखाद्या उध्वस्त झालेल्या शहरासारखे भासू लागलेले आहे. सामान्य माणसांना स्पॉडिलायसिस, सर्दी, डोळेदुखी असे आजार होत आहेत. उपननगरातील रस्त्यांबाबत तर यापेक्षा गंभीर परिस्थिती आहे. रस्त्यांच्या या अत्यंत दर्जाहीन परिस्थितीमुळे, मणक्याचे दुखणे, कमरेचे दुखणे, गाड्यांच्या देखभाल खर्चामध्ये प्रचंड वाढ आणि चिखल व धुळीमुळे हवेच्या प्रदूषणामध्ये कमालीची वाढ झालेली आहे. याशिवाय, खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली असून, वाहतूक कोंडी, त्यामुळे खर्च होणारे अधिकचे इंधन हे सर्व देखील आता नागरिकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलेले आहे असे कोल्हापूरकरांचे दुःख याचिकेतून मांडण्यात आल्याचे ॲड. असीम सरोदे यांचे सहकारी वकील ॲड. श्रीया आवले, ॲड. सकलेन मुजावर म्हणाले.
या जनहित याचिकेतील आरोपांवर उत्तर देण्यासाठी आज महानगर पालिका कोल्हापूर, जिल्हा परिषद कोल्हापूर, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कोल्हापूर, नगर विकास मंत्रालय यांच्या तर्फे पुन्हा अवधी मागून घेतला त्यामुळे पुढील सुनावणी ९ सप्टेंबर ला ठेवण्यात आली.
याचिकेवरील सुनावणी मुद्दाम राखडविणाऱ्या महानगर पालिका कोल्हापूर, जिल्हा परिषद कोल्हापूर, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचा आज समस्त कोल्हापूरकरांच्या वतीने निषेध करण्यात आला. रस्ते कामाकडे प्रशासनाचे गुन्हेगारी स्वरूपाचे दुर्लक्ष होतेय, शहरातील रस्ते सुधारण्याबाबत उच्च न्यायालयातील पहिल्या सुनावणीपासून कमालीची बेपर्वाई दिसून येते आहे.उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या मा. न्यायाधीशांनी प्रशासनाला दर पंधरा दिवसांनी कामाच्या प्रगतीचे लेखी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता मात्र, आजतागायत त्या आदेशाची काडीचीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही असा उद्वेग आज याचिकाकर्त्यांनी व्यक्त केला.
तब्बल आठ महिने उलटून गेले तरी प्रशासनाने एका ओळीचाही अहवाल न्यायालयास सादर केलेला नाही. आता दि. १३ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांना हे अहवाल सादर करण्यासाठी ७ सप्टेंबर ही मुदत न्यायालयाने दिली आहे. याचिकेच्या सुनावणीची पुढील तारीख ९ सप्टेंबर आहे.
कोल्हापूरच्या रस्त्यांबाबत महापालिकेच्या बेफिकिरीचे धिंडवडे रोज वृत्तपत्रे आणि माध्यमांतून निघत आहेत. कोल्हापूरचे रस्ते उत्तम आहेत, अशा विधानावर प्रशासनाचा खरोखरच विश्वास बसत असेल, तर नागरिकांनी या प्रशासनास जाग आणण्यासाठी कृतिशील व्हावे, असे आवाहन आम्ही करत आहोत असे उदय नारकर म्हणाले. शहरातील रस्त्यांबाबत जनतेमध्ये कमालीचा असंतोष आहे. हे महापालिकेने गांभीर्याने घेत तातडीने सर्व रस्ते उत्तम दर्जाचे करण्याचे संविधानदत्त काम हाती घ्यावे. अन्यथा, न्यायालयाचा अवमान केल्याच्या कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा जाहीर इशारा आम्ही देत आहोत असे याचिकाकर्त्यांनी जाहीर केले आहे.

गर्भलिंग निदान व अवैध गर्भपाताविरोधातील कारवाईत दोषसिद्धी वाढवा; प्रतिबंधात्मक यंत्रणा अधिक सक्षम करा : डॉ. नीलम गोऱ्हे

गर्भलिंग निदान व अवैध गर्भपाताविरोधातील कारवाईत दोषसिद्धी वाढवा; प्रतिबंधात्मक यंत्रणा अधिक सक्षम करा : डॉ. नीलम गोऱ्हे

पीसीपीएनडीटी कायदा व विविध प्रकारे मुलींना गर्भातच नष्ट करण्याच्या विरोधातील केसेस साठी प्रत्येक जिल्ह्यात १ विशेष न्यायालयांची शिफारस

पुनरावृत्ती व संघटित गुन्ह्यांसाठी मोका कायद्याच्या धर्तीवर कठोर तरतुदींचा विचार करण्याची मागणी

कोल्हापूर/प्रतिनिधी : गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपाताच्या घटनांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी केवळ कारवाई आणि अटकेपुरते मर्यादित न राहता दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढविणे, पुनरावृत्ती करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आणि कायद्यातील पळवाटा बंद करणे आवश्यक आहे, अशी भूमिका शिवसेना नेत्या, विधान परिषदेच्या माजी उपसभापती तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडली.
गर्भलिंग निदान व अवैध गर्भपाताविरोधातील कारवाईचा आढावा घेण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांच्या पुढाकाराने कोल्हापूर येथे विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी सातारा , सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापुर आरोग्य संचालक व पोलीस अधिक्षक आंतर जिल्हा स्तरावर समन्वयाने काम करून तपासाची गुणवत्ता आणि न्यायालयात सादर करण्यात येणारे पुरावे अधिक भक्कम करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.पोलीस महानिरीक्षक श्री. रंजनकुमार शर्मा यांनी या बैठकीचे संयोजक म्हणून काम केले . या बैठकीस आरोग्य उपसंचालक दिलीप माने, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, कोल्हापूरच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात, साताऱ्याचे डॉ. राहुल जाधव, डॉ. विक्रमसिंह कदम आणि डॉ. वर्षा डोईफोडे प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच अतिरिक्त आरोग्य संचालक डॉ. संदीप सांगळे, सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी, पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्यासह संबंधित जिल्ह्यांतील पोलीस व आरोग्य विभागाचे अधिकारी ऑनलाइन माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते.
गर्भलिंग निदान रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, ज्या महिलेला पहिले अपत्य मुलगी आहे आणि ती दुसऱ्यांदा गर्भवती आहे, अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर तरतुदी व गोपनीयतेच्या नियमांचे काटेकोर पालन करून आरोग्य यंत्रणेमार्फत आवश्यक देखरेख व समुपदेशनाची व्यवस्था अधिक प्रभावी करता येईल का, याचा अभ्यास करण्यात यावा.
गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपाताचे प्रकार संघटित स्वरूपात करणाऱ्या तसेच वारंवार अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी होणाऱ्यांवर केवळ अटक व जामीन एवढ्यापुरती कारवाई मर्यादित राहू नये. पुनरावृत्ती करणाऱ्या आणि संघटित पद्धतीने हे गैरप्रकार करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईसाठी कायदेशीर पर्यायांचा अभ्यास करावा, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.गर्भलिंग निदान व स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी मोका कायद्याच्या धर्तीवर कठोर तरतुदी करता येतील का, याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर प्रत्येक दाखल गुन्ह्याचा गुणवत्तापूर्ण तपास, तांत्रिक व अन्य पुराव्यांची मजबूत साखळी आणि प्रभावी न्यायालयीन तातडीचे निर्णय होण्यास प्रत्येक जिल्ह्यात पीसीपिएनजीटी व अवैध गर्भपात तसेच आयव्हीएफ सेंटर्स मधुनही गुप्तपणे फक्त मुलगा होण्यास प्राधान्य देण्याची पद्धती या विषयांवर विशेष न्यायालय करण्यात यावे अशी गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली .

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी नतमस्तक; विधानपरिषदेत पुन्हा संधी मिळाल्याबद्दल आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मानले देवीचे आभार

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी नतमस्तक; विधानपरिषदेत पुन्हा संधी मिळाल्याबद्दल आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मानले देवीचे आभार

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्रावणातील पहिल्या गुरुवारनिमित्त शिवसेना नेत्या तथा माजी विधानपरिषद उपसभापती व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी आदिशक्तीचे श्रद्धापूर्वक दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवी मातेच्या चरणी विधीवत साडी, नैवेद्य व महाप्रसाद अर्पण करून मनोभावे प्रार्थना केली.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या निर्णयानुसार पुन्हा एकदा विधानपरिषदेत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी महालक्ष्मी मातेचे मनापासून आभार मानले. आजवरच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत आलेल्या विविध सुख-दुःखांच्या प्रसंगांचे स्मरण करत त्यांनी देवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार तसेच राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना आणि उपक्रम राबविले जात आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेसह महिलांसाठी क्लस्टर, आरोग्यविषयक योजना आणि महिला सुरक्षिततेच्या प्रश्नावर सरकारकडून काम सुरू असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.महिला सुरक्षिततेच्या विषयावर आज बैठक घेण्यात येणार असून, या बैठकीस पोलीस महानिरीक्षक उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही यावेळी घेण्यात आली.
कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरात सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामाचा आढावाही डॉ. गोऱ्हे यांनी घेतला. मंदिरातील जीर्णोद्धाराचे काम लवकर सुरू होऊन ते वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी सरकारच्या वतीने आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
“श्रावणातील पहिल्या गुरुवारी महालक्ष्मी मातेचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. देवीच्या चरणी प्रार्थना करून मनामध्ये अत्यंत समाधान आणि कृतज्ञतेची भावना निर्माण झाली,” असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

“स्व. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी”; आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाटील कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट

“स्व. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी”; आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाटील कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट

कोल्हापूर/प्रतिनिधी : शिक्षण महर्षी स्व. डी. वाय. पाटील यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी शिवसेना नेत्या तथा माजी विधान परिषद उपसभापती व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज भेट देऊन पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी मा. श्रीमती शांताबाई पाटील , मोठ्या आईसाहेब, आ. सतेज पाटील , ऋतुराज पाटील , यांचे आ. नीलम गोर्हेंनी सांत्वन केले .
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्व. डी. वाय. पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या निधनाने शैक्षणिक, सामाजिक आणि विविध क्षेत्रांची मोठी हानी झाली असल्याचे सांगितले. शिक्षणाचा प्रसार आणि विद्यार्थ्यांसाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत त्यांनी स्व. डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.स्व. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात उभे केलेले मोठे कार्य आणि त्यातून घडलेल्या असंख्य विद्यार्थ्यांचे भवितव्य हीच त्यांच्या कार्याची मोठी ओळख आहे. त्यांच्या निधनाचे दुःख मोठे असून, या दुःखाच्या प्रसंगी आपण पाटील कुटुंबीयांसोबत आहोत, अशी भावना आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

महान शिल्पकार बी. आर. खेडकर : कलेचा अमूल्य वारसा

महान शिल्पकार बी. आर. खेडकर : कलेचा अमूल्य वारसा

शिल्पकार बी. आर. खेडकर यांच्या शताब्दी महोत्सवानिमित्त प्रासंगिक लेख

मातीत जन्मलो मी….,
ही मातीच झाली माझी मैत्रीण ….,
दिला तिला आकार सूंदर मूर्तीरुपाने….,
अखेर ती मातीच राहील माझ्या संगती…. शिल्पकार बी आर खेडकर यांच्या या ओळी त्यांची कलासक्ती सांगतात. कलेला अक्षरशः वाहून घेतलेला एक अवलिया म्हणजे महाराष्ट्रातील सूप्रसिध्द शिल्पकार बी आर खेडकर तथा आप्पासाहेब….“                      कलाकार आपल्या कलेतून सदैव जिवंत राहतो….” तसेच ज्येष्ठ शिल्पकार बी आर खेडकर तथा आप्पासाहेब सदैव कलाक्षेत्रात जिवंत राहिले आहेत. १२ ऑगस्ट १९२६ ते १२ ऑगस्ट २०२६ आज त्यांच्या शताब्दी पूर्ण होत आहे. शिल्पकलेचा वारसा जपणारे महान शिल्पकार आपल्यात नसले तरी कलेने जिवंत आहे. शिल्पकलेमुळे समाजाला समृद्ध करणाऱ्या अनेक कलाकारांमध्ये शिल्पकार बी. आर. खेडकर यांचे नाव आदराने घेतले जाते.
बी. आर. खेडकर यांनी आपल्या कलाकृतींमधून सौंदर्य, भावना आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर मिलाफ साधला. मातीला कल्पकतेने आकार देऊन त्यांनी अनेक संस्मरणीय शिल्पे साकारली. त्यांच्या शिल्पांमध्ये बारकावे, प्रमाणबद्धता आणि कलात्मकता यांचा उत्कृष्ट संगम दिसून येतो. त्यांच्या कार्यामुळे शिल्पकलेला नवी ओळख मिळाली आणि अनेक नवोदित कलाकारांना प्रेरणा मिळाली.                                             शिल्पकार बी. आर खेडकर उर्फ आप्पासाहेब यांचा
जन्म १२ ऑगस्ट १९२६ रोजी राजगुरूनगर खेड येथे झाला. आई-वडिलांचे छत्र लहानपणीच हरवले. त्यांच्या मोठ्या भावाने त्यांचा सांभाळ केला. इयत्ता दुसरी झालेले आप्पासाहेब लहान असताना किल्ल्यावरची लहान लहान चित्रे करीत असत मातीमध्येच त्यांचे मन रमत असे. थोडे मोठे झाल्यावर त्यांनी गणपती व त्यांचे देखावे करण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्री मध्ये पाऊल ठेवले. मोगले आजम, पाकीजा सारख्या चित्रपटांच्या सेट उभारणीसाठी शिल्पकार म्हणून कामही केले. बी. आर. खेडकर यांनी आजिवन शिल्पकलेला वाहून घेतले होते. वयाच्या ५ वर्षांपासून मातीत हात रुतवलेल्या या कलाकारांने ९० वर्षापर्यंत ५०० हून अधिक पुतळे साकारून त्यांना आपल्या कलेतून जिवंत केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे पुतळे साकारले आहेत. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यांची संख्या मोठी आहे.
महाराष्ट्रातील विविध प्रमुख शहरांमध्ये तसेच कर्नाटकात त्यांच्या कलाकृती आजही पाहायला मिळतात. तसेच त्यांच्या अनेक कलाकृती परदेशी देखील आहेत. त्यांच्या शिल्पांमधून संबंधित महापुरुषांचे व्यक्तिमत्त्व, विचार आणि कर्तृत्व प्रभावीपणे प्रतिबिंबित होते. त्यांच्या कलाकृतींमध्ये बारकावे, प्रमाणबद्धता आणि वास्तवदर्शीपणा यांचा सुंदर मिलाफ दिसून येतो.
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात उभारण्यात आलेला अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा ही त्यांच्या कलेची विशेष ओळख आहे. हा पुतळा पाहताना छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, नेतृत्व आणि स्वराज्याची प्रेरणा यांचा प्रत्यय येतो. बी. आर. खेडकर यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून इतिहास आणि वर्तमान यांच्यात सुंदर सेतू निर्माण केला. त्यांचा कलावारसा जपणे, त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला करून देणे आणि शिल्पकलेची प्रेरणा पुढे नेणे हीच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना खरी आदरांजली ठरेल.
शिल्पकलेच्या क्षेत्रात आपल्या प्रतिभेचा अमिट ठसा उमटविणारे महान शिल्पकार बी. आर. खेडकर यांचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यांच्या जन्मशताब्दी पूर्ती निमित्त त्यांच्या कलाप्रवासाचे स्मरण करणे आणि त्यांच्या कर्तृत्वाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही अभिमानाची बाब आहे. बी. आर. खेडकर यांनी नवोदित शिल्पकारांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यासाठी शिल्पकलेच्या कार्यशाळा , स्पर्धा घेण्यात याव्यात तसेच त्यांच्या कलागुणांना उत्तम व्यासपीठ मिळावे या उद्देशाने “शिल्पकार बी .आर. खेडकर कला प्रतिष्ठान” या नावे फॅमिली ट्रस्ट स्थापन केला. यातून पहिली कार्यशाळा शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे घेण्यात आली. या शताब्दी वर्षात अशा विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुणे ,कोंढवा कात्रज येथे खेडकर यांनी केलेल्या विविध शिल्पाकृती पुतळ्यांचे कलादालन उभे करण्यात आले आहे. बी आर खेडकर यांच्या नऊ कन्या त्यांच्यापैकी सीमा खेडकर यांनी वडिलांच्या कलेचा वारसा जोपासला आहे.

– तृप्ती पुरेकर, कोल्हापूर.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन

कोल्हापूर, दि. ९: राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या नर्सरीबाग येथील समाधीस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सह पालकमंत्री तथा राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, अशोकराव माने, राहूल आवाडे, महापौर रूपाराणी निकम, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल आदी उपस्थित होते.यावेळी समाधीस्थळाअंतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचेही उद्घाटन करण्यात आले. शाहू समाधीस्थळ विकसित करण्याअंतर्गत नियोजित कामे व पूर्ण करण्यात आलेल्या कामांची माहिती आयुक्त डॉ. भारुड यांनी यावेळी दिली.

देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार

लवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज; थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली

देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार

राजर्षी शाहू महाराजांनी शेतकरी हितासाठी केलेले कार्य आधुनिक काळातही प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

कोल्हापूर/कागल/ (जिमाका): शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करत राज्य शासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी दिली असून, यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौर कृषी वाहिनी योजनेला गती देण्यात आली असून, सध्या ७४ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. यावर्षाअखेर ९० टक्के आणि पुढील वर्षी १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कागल नगरीत विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी कागल नगरपरिषदेच्या वतीने हिंदूराव घाटगे विद्यालयाच्या जीर्णोद्धार कामाचा लोकार्पण सोहळा तसेच लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार होत्या.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्रांतीच्या माध्यमातून बहुजन समाजासाठी शिक्षण आणि रोजगाराची दारे खुली केली. १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या क्रांतिकारी पर्वाच्या स्मरणदिनी अशा थोर समाजसुधारकाच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मिळणे ही आपल्यासाठी विशेष बाब आहे. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या काळातील चुकीची सामाजिक व्यवस्था झुगारून नवी सामाजिक व्यवस्था निर्माण केली. त्यांनी आरक्षणाचा क्रांतिकारी निर्णय घेतला, मोफत शिक्षण सुरू केले, वंचितांसाठी विविध आनुषंगिक योजना राबवल्या आणि अस्पृश्यतेला गुन्हा मानून त्यावर बंदी घातली, असे त्यांनी नमूद केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला वारसा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आणि राजर्षी शाहू महाराजांनी दिलेले विचार या त्रिसूत्रीच्या आधारावर राज्य शासन काम करीत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. राधानगरी धरण हा राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि अभियांत्रिकी कौशल्याचा अविष्कार असून, त्यांनी निर्माण केलेल्या जलसाठ्यांमुळे आजही जनतेला त्याचा लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करून आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी देण्यात आली असून, ५६ हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी शासन दरवर्षी २५ हजार कोटी रुपये खर्च करीत असून, ५८ हजार कोटी रुपयांची थकबाकीही शासनाने दिली आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी इथेनॉल धोरण महत्त्वाचे असून, इथेनॉलशिवाय साखर कारखानदारी टिकवणे अवघड आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत असल्या तरी, त्याबाबत पेट्रोलियम किंवा वाहन उत्पादक कंपन्यांकडे कोणताही अधिकृत पुरावा उपलब्ध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इथेनॉल धोरणामुळे साखर कारखानदारी टिकून राहिली असून, ऊस उत्पादकांना एफआरपी देणे शक्य झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एफआरपीचे नवे उच्चांक गाठले गेले असून, त्याचा लाभ ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि शेतकऱ्यांना झाला आहे.
साखर कारखानदारी अधिक सक्षम करण्यासाठी ‘झिरो वेस्ट’ संकल्पनेतून स्पेंट वॉश आणि प्रेस मडपासून सीबीजी व सीएनजी निर्मिती करण्यात येणार आहे. या उपउत्पादनातून मिळणारा अतिरिक्त निधी कारखान्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासह शेतकऱ्यांच्या एफआरपीसाठी उपयोगात आणला जाणार आहे. देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

राजर्षी शाहू महाराजांनी शेतकरी हितासाठी केलेले कार्य आधुनिक काळातही प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

राजर्षी शाहू महाराजांनी शेतकरी हितासाठी केलेले कार्य आधुनिक काळातही अत्यंत प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीनंतर आता पुढील टप्प्यातील कल्याणकारी कामांना सुरुवात झाली असून, महाराष्ट्र विकासाच्या दिशेने अधिक वेगाने वाटचाल करत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, राजर्षींच्या या पावन भूमीत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी कटिबद्ध होण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू महाराजांचे विचार, कर्तृत्व आणि कागल तालुक्याशी संबंधित विविध विकासकामांचा आढावा घेतला. तसेच, शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची सविस्तर माहिती त्यांनी या वेळी विशद केली.
समरजितसिंह घाटगे यांनी आपल्या मनोगतात शेतकरी कर्जमुक्तीच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तसेच, राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी कागल तालुक्यात अत्यंत यशस्वीपणे सुरू असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा विशेष सत्कार करण्यात आला.कागल नगरपरिषदेच्या वतीनेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा देऊन भव्य सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक कागल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सविता माने यांनी केले, तर आभार उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांनी मानले.
कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक, खासदार शाहू महाराज छत्रपती, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, आमदार डॉ. विनय कोरे-सावकर, राहुल आवाडे, शिवाजीराव पाटील,
आमदार अशोकराव माने, कोल्हापूर महापालिका महापौर रूपराणी निकम, राजे समरजितसिंह घाटगे, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, कागल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण आणि मुख्याधिकारी अजय पाटणकर उपस्थित होते.

कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते १८५० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन

कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह संपूर्ण महाराष्ट्राचा मानबिंदू

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या आद्ययावतीकरणामुळे आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावेल

कोल्हापूर दि.९ ऑगस्ट (जिमाका): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते कोल्हापूर शहरातील १८५० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न झाले. कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ करणे गरजेचे असून त्यादृष्टीने हद्दीबाहेरील लोकांच्या अडीअडचणी शंभर टक्के सोडविण्यात येतील, असे सांगून कोल्हापूर शहराला अधिक सुनियोजित करण्यासाठी टप्प्या-टप्प्याने आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.वैद्यकीय शिक्षण विभाग, कोल्हापूर महानगरपालिका व महाराष्ट्र पोलीस यांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम प्रायव्हेट हायस्कूलच्या पटांगणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, आरोग्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास राज्यमंत्री व कोल्हापूरच्या सह पालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, राहुल आवाडे, शिवाजी पाटील, अशोकराव माने, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव धीरजकुमार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन, पोलीस अधीक्षक निलोत्पाल, उपमहापौर अक्षय जरग उपस्थित होते.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे संपूर्ण महाराष्ट्राचा मानबिंदू आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या देदिप्यमान नाट्य परंपरेमध्ये या नाट्यगृहाचा फार मोठा इतिहास आहे. १४ ऑगस्ट १९१५ रोजी छत्रपती राजाराम महाराज यांच्याहस्ते त्याचे उद्घाटन झाले. पूर्वी ‘पॅलेस थिएटर’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या नाट्यगृहाला १९५७ पासून ‘संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह’ म्हणून ओळखले जाऊ लागले. दुर्दैवाने दोन वर्षांपूर्वी या नाट्यगृहाला लागलेल्या आगीप्रसंगी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळ भेट देऊन पाहणी केली आणि कोल्हापूरचे वैभव असलेल्या आणि कोल्हापूरकरांचे प्रचंड प्रेम असलेल्या या नाट्यगृहाच्या पुनर्निर्माणासाठी राज्य सरकारने २५ कोटी रुपये तात्काळ दिले. या नाट्यगृहाचे पुनर्निर्माण आधीचेच बाह्यस्वरुप जतन करत वारसामूल्य जपून अत्यंत चांगल्या प्रकारे करण्यात आले आहे.
कोल्हापूरमध्ये खऱ्या अर्थाने संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे योगदान कोणी विसरू शकत नाही, असे सांगून श्री. फडणवीस म्हणाले, संगीत मानापमान या नाटकामधील बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांच्यातली जुगलबंदी ही मराठी संगीत नाटकाच्या इतिहासातील एक मर्मबंधाची ठेव आहे. संगीतसूर्य भोसले यांच्या नावाच्या नाट्यगृहाने संगीत, शास्त्रीय संगीत, लोकनाट्य, लावणी, पोवाडा, तमाशा, दशावतार अशा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असलेल्या बाबी पाहिल्या आहेत. या नाट्यगृहाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक त्या बाबी करण्यात येतील. नाट्य चळवळ, रंगभूमी असो किंवा चित्रपट या सर्व बाबींमध्ये कोल्हापूरचे मोठे योगदान नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाबुराव पेंटर, भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम यांनी कोल्हापूरला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. पंडित विष्णू पलुसकर, दिगंबर पलुसकर, सुधीर उर्फ बाबुजी फडके, सुरेश वाडकर, वामनराव सडोलीकर असे अनेक दिग्गज गायक हे कोल्हापुरातले. पिराजीराव सरनाईक, अरुण सरनाईक, रमेश देव हे कलावंत याच कोल्हापुरातले. भारताला पहिल्यांदा ऑस्कर मिळवून देणाऱ्या वेशभूषाकार भानू अथय्या यांचीही कर्मभूमी कोल्हापूर शहर राहिली आहे, असे सांगून संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या नावाने असलेल्या या नाट्यगृहाचे पुन्हा एकदा नवनिर्मित रूपात उद्घाटन होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
आई महालक्ष्मी अंबाबाईंच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. या मंदीर परिसराच्या विकासाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले असून निश्चित वेळेत ते काम पूर्ण करण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच आले असून त्यासाठी शेंडा पार्क येथे ७५ एकर जागा दिली आहे. या न्यायालयामुळे शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक येणार आहेत. शेंडा पार्क येथे आयटी पार्क, कन्व्हेन्शन सेंटर ठिकाणी करतो आहोत या सर्व बाबींमुळे कोल्हापूरच्या विकासाला गती मिळणार असून त्यासाठी शहराच्या हद्दवाढीची गरज आहे. नव्याने हद्दवाढी मध्ये समावेशित कराव्या लागणाऱ्या नागरिकांच्या सर्व अडचणी शंभर टक्के सोडविण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.सीपीआर म्हणजेच छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे वारसा स्वरुप जतन करून चांगल्या प्रकारे पुनुरूज्जीवन करण्यात आले आहे, असे सांगून ते म्हणाले, येथे ८ मॉड्युलर थिएटर्स असलेल्या ऑपरेशन थिएटर्सचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. चांगला मॉड्युलर बर्न वॉर्ड तयार झालेला आहे. ३० मॉड्युलर बेडचा अपघात विभाग, डायलिसिसची सुविधा आदी अनेक गोष्टींमुळे कोल्हापूरच्या आरोग्य सेवेमध्ये गुणात्मक बदल होत आहे. आता शेंडा पार्कमध्ये देखील ६०० बेड सर्वोपचार रुग्णालय करण्यात येणार असून २५० बेड कर्करोग रुग्णालय आणि २५० बेडच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा यात समावेश आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये ज्याप्रमाणे सर्वात चांगली आरोग्याची व्यवस्था ही कोल्हापूरला उभी झाली होती, त्याचकडे आता पुन्हा कोल्हापूरने वाटचाल सुरू केलेली आहे, असेही त्यांनी सांगितले.
आपल्यासाठी २४ तास काम करणाऱ्या पोलीसांसाठी चांगल्या प्रकारची घरे असावित ही भूमिका घेऊन राज्य सरकार काम करत असून महाराष्ट्रामध्ये पोलिसांकरता ५० हजार घरांचे नियोजन केले आहे. कोल्हापूर येथील पोलीसांसाठी घराची १७ मजली सुंदर इमारत तयार झाली आहे. जवळपास २०४ सदनिका महाराणी ताराराणी पोलीस गृहसंकुलात तर इचलकरंजीमध्ये २१० सदनिका अशा जवळपास ४१४ सदनिका पोलिसांकरता आज या जिल्ह्यामध्ये आपण उपलब्ध करून दिल्या आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, कोल्हापूर हे कुस्तीचे माहेरघर आहे. मात्र, फुटबॉल, हॉकी आणि क्रिकेट खेळाचे प्रेमीही येथे आहेत. त्यामुळे केंद्र शासनाच्या खेलो इंडिया योजनेतून व महानगरपालिकेच्या निधीतून ६ कोटी ९६ लाख रुपयातून मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऍस्ट्रोटर्फ मैदान विकसित केले आहे. राज्य व आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील हॉकीच्या स्पर्धा कोल्हापुरात घेता येईल. तसेच कोल्हापूरला क्रिकेटचे स्टेडियम बांधण्याकरता जागा उपलब्ध करून दिली आहे. स्टेडियमसाठी बीसीसीआयला विनंती केली असून त्या माध्यमातून देशातील आधुनिक अशा प्रकारचे उत्तम दर्जाचे क्रिकेट स्टेडियम बांधण्यात येईल. फुटबॉल खेळासाठीही आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील.
कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलेल्या पुरामुळे लोकांचा आक्रोश आणि नुकसान आम्ही पाहिला असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यावर मात करण्यासाठी जागतिक बँकेच्या साह्याने पुराच्या पाण्यावर उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र रेझिलिएन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमआरडीपी) तयार केला. यापूर्वी रखडलेल्या या प्रकल्पाला पुन्हा या सरकारने ‘मित्रा’च्या (महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन) माध्यमातून मान्यता मिळवली असून केवळ कोल्हापूर आणि सांगली शहरच नव्हे तर या भागातील संपूर्ण पाणलोट क्षेत्रावर पूरनियंत्रणाच्या दृष्टीने काम करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत पुराचे वाहून जाणारे अतिरिक्त पाण्यापैकी सुमारे ३५ ते ४० टीएमसी पाणी आता डायव्हर्शन कॅनलने पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांना आणि पुढे उजनी धरणात आणि पुढे मराठवाड्यामध्ये नेण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांचे समाधी स्थळ, मेजर ध्यानचंद स्टेडियमवर एस्ट्रोटर्फ, रंकाळा तलावतील संगीत कारंजे, अंबाबाई मंदिर परिसरात बहुमजली पार्किंग, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प एमआरडीपी अंतर्गत ४८४ कोटींचे रस्ते व नागरी सुविधा, मेकॅनिकल पार्किंग यासह विविध कामांचे लोकार्पणही या कार्यक्रमांमध्ये झाले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या उद्घाटनातून जिल्ह्याला नवी दिशा व सांस्कृतिक, क्रीडा, पर्यटन व नागरिक सुविधांना बळकटी मिळेल. सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कला वैभवाची समृद्ध परंपरा असलेल्या करवीर नगरीतील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणीमुळे अमूल्य सांस्कृतिक ठेव्याचे नव्याने जतन संवर्धन आणि पुनरुज्जीवन होत आहे. हा क्षण सर्वांसाठी अभिमानाचा आणि समाधानाचा आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले १३६ व्या जयंतीनिमित्त हे नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभे राहिले आहे. हा क्षण केवळ पुनर्बांधणीचाच क्षण नाही तर हा महाराष्ट्र आणि कोल्हापूरच्या समृद्धीचा पुनर्जन्म सोहळा आहे. उपमुख्यमंत्री म्हणाल्या, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कला, क्रीडा आणि सांस्कृतिक प्रेमी दूरदृष्टीचे हे नाट्यगृह मूर्तिमंत प्रतीक आहे. नाट्यगृह पूर्वीच्या दिमाखदार ऐतिहासिक स्वरूपात जपणे, या वैभवाची निगा राखणे तसेच याचे सौंदर्य अबाधित ठेवणे, हे कोल्हापूर वासियांसाची सामाजिक जबाबदारी आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी मराठी संगीत नाट्यपरंपरेसाठी दिलेले योगदान अनमोल आहे त्यांच्या नावाने ओळखले जाणारे हे नाट्यगृह पुढील अनेक पिढ्यांसाठी कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेचे प्रेरणास्थान राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने पुढाकार घेतल्याचे सांगून त्या म्हणाल्या, नाट्यगृहासोबतच राजर्षी शाहू महाराज खासबाग मैदानाच्या नूतनीकरणाचे काम होत असून ही बाब आपल्यासाठी आनंदाची आहे. कोल्हापूरचा सांस्कृतिक, क्रीडा, आणि पर्यटन विकास अधिक वेगाने व्हावा, यासाठी राज्य शासन कटिबध्द आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, कोल्हापूर बदलत आहे. अनेक वर्षांची स्वप्न साकार करणारे एकापेक्षा एक चांगले निर्णय होत आहेत. दीड- दोन महिन्यापूर्वी महालक्ष्मीच्या आराखड्याला मान्यता मिळाली आणि त्यानंतरच्या कामाचा शुभारंभ झाला. या शुभारंभाच्या बरोबर अनेक विकासकामांच्या उद्घाटनाची सुरुवातही झाली आहे. सीपीआरच्या माध्यमातून लोकांना आरोग्याच्या दर्जेदार वैद्यकीय सेवांबरोबरच वैद्यकीय शिक्षणामध्ये सुद्धा कोल्हापूरचे नाव महाराष्ट्रात अग्रेसर राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भस्मस्थानी पडल्यानंतर निधीसाठी सातत्याने पाठपुरवा केल्याचे सांगून लवकरच डीपी आणि ट्रान्सफॉर्मर कामांसाठीही निधी उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापूरची नवी ओळख बनत आहे. आयटी सेंटरसाठी ८० एकर जागा उपलब्ध करुन दिल्यामुळे नवीन पिढीसाठी प्रचंड मोठे काम उभे राहत आहे. कोल्हापूरच्या विकासाची खूप मोठी गरज, खूप मोठी आवश्यकता आणि खूप मोठी भूक आम्हा सगळ्यांची आहे. सन १९३९ ला आणखी कुठे नव्हते त्यावेळेला राजाराम महाराजांनी विमानतळाची सुरुवात इथे केली. पण आज पुणे फार पुढे गेले आहे. बेळगावला सुद्धा कोल्हापूरपेक्षा चांगल्या पद्धतीचे फ्लाईट्स आहेत. कोल्हापूर येथे आता मोठे एअरबस यायला हवेत. १७०० मीटरचा रनवे २३०० मीटरचा करण्यासाठी आवश्यक परवानगी द्यावी. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या निमित्ताने व सर्कीट बेंचच्या निमित्ताने भविष्यकाळामध्ये येणाऱ्या आयटी सेंटरच्या माध्यमातून कोल्हापूरची गरज, कोल्हापूरची ओळख आणि कोल्हापूरचे महत्व वाढणार आहे. या ठिकाणी हजारो लोक दररोज येणार आहेत. फ्लोटिंग पॉप्युलेशन वाढत जाणार आहे. त्यासाठी रस्ते व अन्य दळणवळण्याच्या सुविधा दर्जेदार असणे आवश्यक आहे, असे सांगून प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयामध्ये सर्व अद्ययावत वैद्यकीय सुविधा आणलेल्या आहेत. शेंडा पार्कमध्ये अमेरिकेच्या ‘ह्यूस्टन’ शहराच्या धर्तीवर मेडिकल हब बनविण्यात येत आहे. एक-दोन वर्षांनी कोल्हापूर शहर, कर्नाटक आणि आपल्या कोकणातील कुठल्याही माणसाला वैद्यकीय उपचारांसाठी मुंबई आणि पुण्याला जावे लागणार नाही, अशी व्यवस्था उभारण्यात येईल. यासाठी जवळपास ४७३ कोटी रुपयांचा निधी शासनाने दिला आहे. शेंडा पार्कमध्ये ६०० बेडचे सामान्य, २५० बेडचे कॅन्सर आणि २५० बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल साकारत आहे. आगीत भस्मसात झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची इमारत दोनच वर्षांमध्ये त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने रंगकर्मींमध्ये सादर करत असताना कोल्हापूर महानगरपालिकेसह आम्हा सर्वांना मनापासूनचा आनंद होत आहे. अत्यंत दिमाखदार असे केशवराव भोसले नाट्यगृह उभे केलेले आहे, असे सांगून ते म्हणाले, कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापूर शहराची प्रगती होणार नाही. यासाठी आमदार चंद्रदीप नरके व आमदार अमल महाडिक यांनी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, सीपीआर इमारतीप्रमाणे ७४ हेरिटेज इमारती कोल्हापूरमध्ये आहेत. तसेच अनेक मोठे तलाव यामध्ये रंकाळा, कळंबा, राजाराम तलाव, कोटितीर्थ, हनुमान तलाव असे अनेक तलाव छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी दिलेले आहेत. शासनाच्या वतीने या सर्व गोष्टींचे जतन व संवर्धन करत, पर्यटन वाढीसाठी कोल्हापूरला ‘हेरिटेज सिटी’ घोषित करावी. ‘हेरिटेज संवर्धन प्लॅन’ (Heritage Conservation Plan) अंतर्गत भरीव निधीची तरतूद करून देशामध्ये कोल्हापूरचा एक नाव लौकिक वाढवावा, अशी विनंती केली. कोल्हापूरची रस्त्याची परिस्थिती अत्यंत खराब आहे. कोल्हापूरमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकची समस्या आहे. कोल्हापूरमध्ये अंडरपास, ओव्हरब्रिज, त्याचबरोबर सिमेंट काँक्रीटचे रोड, कोल्हापूरची हद्दवाढ—या गोष्टी अत्यंत होणे गरजेचे आहे. कोल्हापूरमध्ये आज ५० लाख भाविक येत असताना प्रचंड मोठी वाहतुकीची कोंडी आहे, असे सांगून शहराच्या हद्दवाढीची आवश्यकता व्यक्त केली.श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा करत असताना जर आपण ते १० मीटरवर ॲक्वीझिशन आणले तर ६०० कोटी रुपये वाचतील. तसेच शिवाजी स्टेडियमपर्यंत अंडरग्राउंड रस्ता, शिवाजी स्टेडियमपासून शाहू मिलपर्यंत अंडरग्राउंड रस्ता आणि शाहू मिलपासून ओव्हरब्रिजने युनिव्हर्सिटी जवळ ब्रिज काढल्यास शहरातलं ट्रॅफिक पूर्ण संपून जाईल आणि कोल्हापूर शहर हे या महाराष्ट्रातील एक चांगलं शहर म्हणून उदयास येईल.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापौर रुपाराणी निकम यांनी केले आभार महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी मानले. यावेळी माजी खासदार संजय मंडलिक, कृष्णराज महाडिक, जयंत पाटील, विशाल शिराळे, समित कदम, विजय जाधव, यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.